उत्तरप्रदेशचे प्रयागराज आता महाकुंभमय झाले आहे. प्रयागराजच्या पवित्र संगम काठावर अनेक भाविकांसह साधु संतही दिसू लागले आहेत. यात काही महिला साधुंचीही संख्या आहे. विशेषतः महिला नागा साधूही मोठ्या संख्येनं दिसत आहेत. महाकुभमेळ्याच्या निमित्तानं नागा साधू प्रयागराजमध्ये येऊ लागले आहेत. या साधूंसोबत नागा महिला साधूही आहेत. आधीच नागा साधूंबाबत अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात. अशावेळी महिला नागा साधूंबाबत अधिक रहस्य आहेत. नागा साधू हे अंगावर कोणताही कपडा न घालता, राख फासून घेतात. तर महिला नागा साधू आपली साधना कशी करतात, अशा प्रश्न विचारण्यात येतो. महिला नागा साधूंची साधना अधिक कडक असते. त्या अंगावर फक्त एक भगवा कपडा लपेटून घेतात. गावा, पाड्यापासून दूर राहत या महिला साधूही ध्यान धारणा करतात आणि कठोर नियम पाळतात. (Uttar Pradesh)
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यासाठी प्रयागराजची पावन भूमी तयार झाली आहे. 13 जानेवारीपासून या महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार असली तरी आत्तापासूनच त्यातील अनेक धार्मिक विधी सुरु झाले आहेत. महाकुंभमेळ्यात साधु-संताच्या आखाड्यांचे प्रवेश सुरु झाले आहेत. यात महिला साधूंचीही संख्या अधिक आहे. नागा साधुंबाबत अनेकांना उत्सुकता असते. महाकुंभमेळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं येणारे हे साधू ऐरवी कुठे राहतात, हा प्रश्न असतो. असाच प्रश्न महिला साधूंच्या बाबत विचारला जातो. या महिला साधू कशा आणि कुठे राहतात. त्यांचे नित्यक्रम काय असतो, हे प्रश्न विचारले जातात. नागा साधूंपेक्षा महिला नागा साधूंची साधना अधिक कठोर मानली जाते. ज्या महिलांना नागा साधू व्हायचे आहे, त्यांना 12 वर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. नंतर त्यांची परीक्षा होते, आणि मग त्यांना नागा साधू म्हणून मान्यता देण्यात येते. (Social News)
या महिला साधूंना पहिली सहा वर्ष संसाराचा त्याग करावा लागतो. या काळात त्या फक्त भिक्षा मागून अन्न मिळवू शकतात. दिवसातून फक्त एकदाच त्या भोजन ग्रहण करतात. त्यांची दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असते. त्या कुठल्याही सुखसोयींचा वापर करु शकत नाहीत. रोज थंड पाण्यानं तीन वेळा स्नान करुन धार्मिक विधी करावे लागतात. झोपण्यासाठीही कुठल्याही साधनाचा वापर न करता, गवताच्या पेंढ्यावर त्यांना आराम करावा लागतो. रोज ठरावीक वेळी ध्यान धारणा आणि आध्यात्मिक वाचन करावे लागते. सहा वर्ष असे जीवन व्यतित केल्यावर ज्या महिलांना त्याची सवय होते, आणि या जीवनाबाबत अधिक रुची वाटते, त्या मग जिवंतपणीच आपले पिंडदान करतात. केसांचे मुंडन करता आणि तर्पण विधी करतात. यानंतर या महिलेचे गुरू तिला नागा साधू ही पदवी देतात. नागा साधू झालेल्या महिलेच्या भूतकाळाची माहिती घेतली जाते. तसेच, जी स्त्री नागा साधू बनते तिला तिची क्षमता तिच्या गुरूंना पटवून द्यावी लागते. अशी दीक्षा दिल्यावरही मग या महिला नागा साधूंची तपश्चर्या अधिक कठिण होते. दीक्षा मिळाल्यावर पुढचे 6 महिने अधिक साधना करावी लागते. आपले शरीर उष्णता, थंडी आणि पाऊस अशा सर्व प्रकारचे हवामान सहन करण्यास सक्षम बनवण्यासाठी त्या प्रयत्न करतात. (Uttar Pradesh)
========
हे देखील वाचा : पंचयाती निरंजनी आखाडा !
======
महिला नागा साधू आपल्या शरीराभोवती न शिवलेले भगव्या रंगाचे कापड लपेटून घेतात. त्या कपाळावर टिलक, भस्म लावतात. महिला नागा साधांना आश्रमात मोठ्या आदराने पाहिले जाते आणि इतर साधू त्यांना आई किंवा मां म्हणून संबोधन करतात. नागा साधू शक्यतो संगमस्थळावरील आश्रमात राहून आपले जीवन जगत असतात. महाकुंभमेळ्यासाठी या साधू येतात, आपापल्या आखाड्यामध्ये राहतात आणि मग पुन्हा रहस्यमयरित्या गायब होतात. महिला नागा साधू देखील त्यांचे संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात. त्याही आयुष्यभर भगवंताची आराधना करतात. महाकुंभमेळ्यात या महिला नागा साधूही मोठ्या प्रमाणात शाही स्नानासाठी जातात. मात्र त्यांचे स्नानाचे स्थान हे अन्य साधूंपेक्षा वेगळे असते. या महिला साधूही एकधान्य सेवन करतात. महाकुंभमेळा झाला की त्या आपल्या आश्रमस्थळी निघून जातात. (Social News)
सई बने