हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पुजेचा मान हा गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पुजा प्रथम करतो. आपल्या आयुष्यातील आणि प्रत्येक कार्यक्रमातील विघ्न हा विघ्नहर्ता कायमच दूर करत असतो. आपला आराध्य असलेल्या गणेशाच्या गणेशचे वर्षभरात दोन मुख्य गणेशोत्सव साजरे केले जातात, त्यापैकी एक म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे माघ महिन्यातील ‘गणेश जयंती’. यातला भाद्रपदातील गणेशोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र यासोबतच माघ महिन्यात येणारी गणेश जयंती देखील महत्त्वाचा सण आहे. माघ महिना सुरु झाला की, चतुर्थीला माघी गणपतींची स्थापना केली जाते. (Maghi GanpatiAmavasya : पौष महिन्यात येणाऱ्या मौनी अमावस्येचे महत्त्व)
२०२६ मध्ये माघी गणपतीचा उत्सव येत्या गुरुवार, २२ जानेवारी रोजी असणार आहे. या माघी गणेश जयंतीला ‘विनायक चतुर्थी’, ‘तिलकुंद चतुर्थी’ किंवा ‘वरद चतुर्थी’ अशा विविध नावांनी ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच तिथीला गणपतीचा जन्म झाला होता, ज्यामुळे या दिवसाला ‘माघी गणेश जयंती’ असे संबोधले जाते. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. (Todays Marathi Headline)

माघी गणेश जयंतीच्या पूजेसाठी शास्त्रात दुपारची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी चतुर्थी तिथी पहाटे ०२:४७ वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी २३ जानेवारीला पहाटे ०२:२८ वाजता समाप्त होईल. बाप्पाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी ११:२९ ते दुपारी ०१:३७ पर्यंत असेल. या काळात गणेशाची प्राणप्रतिष्ठा किंवा विशेष पूजा-अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरते. विशेष म्हणजे, या दिवशी चंद्र दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण माघी चतुर्थीचे चंद्र दर्शन केल्यास खोटा कलंक लागण्याची शक्यता असते, असे पौराणिक कथांमधून सांगितले जाते. (Latest Marathi Headline)
दरम्यान भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मात्र माघी गणेश जयंतीला ‘तिळाच्या लाडवांचे’ विशेष महत्त्व असते. जानेवारी महिन्यात येणारी ही चतुर्थी कडाक्याच्या थंडीत येते. विज्ञानाच्या दृष्टीने, तिळ आणि गुळ हे उष्णतावर्धक असून शरीराला ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवसाला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने आरोग्याचे रक्षण होते आणि मनाला शांती मिळते, अशी मान्यता आहे. (Top Trending News)
=======
Amavasya : पौष महिन्यात येणाऱ्या मौनी अमावस्येचे महत्त्व
Amavasya : मौनी अमावस्येला करा ‘हे’ सोपे लाभदायक उपाय
=======
माघ महिन्यातील ‘गणेश जयंती’ ही साक्षात गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरी होते. माघ महिन्यातील या तिथीला गणेश लहरी पृथ्वीवर सहस्त्रपटीने कार्यरत असतात, ज्यामुळे या दिवशी केलेले ‘गणेश अथर्वशीर्ष’ पठण किंवा ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. या काळात गणेश मंदिरांमध्ये गणेश तत्व मोठ्या प्रमाणावर जाणवते. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात ‘विनायक’ नावाने अवतार घेतला होता. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
