माघ महिन्याच्या चतुर्थीला सर्वत्र माघी गणपती उत्सव (Maghi Ganesh) साजरा केला जातो. या दिवसाला गणेश जयंती असे देखील म्हटले जाते. या दिवशी माता पार्वतीने शेणाच्या पोळीपासून गणेशाची निर्मिती तयार केली होती, आणि मग या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. माघी गणेश मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. माघी गणेश किंवा गणेश जयंतीला नक्की गणेशाची पूजा कशी करावी चला जाणून घेऊया. (Maghi Ganesh)
गणेश जयंती (Ganesh Jayanti) माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला विनायक चतुर्थी तसेच वरद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीची यथायोग्य पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदा १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती सगळीकडे साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओखळले जाते. (Marathi News)
महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. मुंबईमध्ये खासकरून ठाणे जिल्ह्यात माघी गणेशोत्सव सर्वात मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. वाजत गाजत गणेश मूर्तींचे आगमन होते. या दिवशी श्रीगणरायाची विधिवत पूजा केली जाते. गणेश जयंतीचे व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते. काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात. (Top Stories)
महाराष्ट्रात घरोघरी या दिवशी गणेशाची षोडशोपचारे पूजा केली जाते. यादिवशी गणेशाची कशी पूजा करावी हे जाणून घेऊया. मातीची किंवा घरातील तांबी, पितळ, चांदीची मूर्तीच पूजा करावी. त्यानंतर १६ षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करुन अथर्वशीर्षाचं पठण करावे. यादिवशी आठवणीने बाप्पाला २१ दुर्वा नक्की अर्पण करा. मातृदेवता ही २१ असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला २१ दुर्वा वाहवेत. (Latest Marathi News)
माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा, मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपतीबाप्पाचे विसर्जन केले जाते.
गणेश जयंती मंत्र
-ॐ गं गणपतये नमः
-ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा
-ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
-ॐ गं क्षिप्रप्रसादनाय नमः
-ॐ गणेश ऋणं छिन्धि वरेण्यं हुं नमः फट
-गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्
-श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा
-गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः
-विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धितायं
-अमेयाय च हेरंब परशुधारकाय ते। मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः
====================
हे देखील वाचा : Salt : 30 हजार किलो दर असणारे मीठ असते का ?
===================
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रात आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा साजरा केला जातो. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. मग नक्की भाद्रपद चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव मध्ये नक्की काय फरक आहे. या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे.
गणेश पुराण हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितली. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपतीसंदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात.