रविवार, १ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ०५.५२ वाजता सुरू होणार आहे आणि २ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.३८ ला संपणार आहे. या माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू स्वत: गंगेच्या पाण्यात येतात आणि स्नान करतात. त्यामुळे गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान, स्नान आणि उपवास अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळवतात. या दिवशी देव पृथ्वीवर अवतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते शिवाय जीवनात याचा लाभ देखील चांगला होतो. त्यामुळे या दिवशी काही उपाय करणे लाभदायक ठरते. मग माघी पौर्णिमेला कोणते उपाय करावे? (Magha purnima)
– असे मानले जाते की माघी पौर्णिमेला केलेल्या उपायांनी पितृदोषापासून मुक्तता मिळते.आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. या दिवशी पवित्र नदीत, विशेषत: गंगेत स्नान करावे. शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून घरीच आंघोळ करावी. त्यानंतर पितरांसाठी तर्पण विधी करावे आणि पाण्यात तीळ अर्पण करावे.
– माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावावे. तसेच दारावर हळदीने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते. (Marathi)
– माघ पौर्णिमेचे पुण्यफळ मिळवण्यासाठी भगवान श्री सत्यनारायणांची पूजा करावी. त्यांची कथा पठण करावी किंवा ऐकावी, हवन -आरती करावी. मान्यतेनुसार भगवान सत्यनारायणांच्या पूजेमुळे मिळणारे पुण्य साधकाच्या सुख-समृद्धीत वाढ करते.
– माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री सूक्ताचे पठण करावे. या दिवशी कनकधारा स्तोत्र आणि विष्णु सहस्त्रनाम पाठ करणेही शुभ मानले जाते. या तीन स्तोत्रांचे पठण केल्यावर त्या लगेच प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात. (Todays Marathi Headline)

– माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास दूध आणि पाणी अर्पण करावे. यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
– माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पितरांना काळे तीळ आणि पाणी अर्पण करा, यामुळे पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गरीब आणि गरजूंना दान द्या. (SOcial Updates)
– पौर्णिमेची रात्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास असते. निशिता काळात रात्री लक्ष्मीची पूजा करून तिला गाई अर्पण करा आणि नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे संपत्ती येण्याचे मार्ग तयार होतात. (Marathi)
– पौर्णिमा तिथी चंद्राच्या प्रभावाखाली मानली जाते. या दिवशी चंद्र देवाची विशेष पूजा केल्याने मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी मिळते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने अनेकविध फल प्राप्त होतात. (Top Marathi Headline)
– या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला ११ प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. शिवाय पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून किमान १०८ वेळा चंद्राच्या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. ॐ सों सोमाय नमः । हा जप करावा. (Latest Marathi News)
– माघ पौर्णिमेला शिवपूजा केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र, पाणी आणि दूध अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. (Top Trending Headline)
========
Magh Purnima : जाणून घ्या माघ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
========
– माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र, पितृकवच किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. (Top Stories)
– मान्यतेनुसार माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गरजू व्यक्तीला किंवा मंदिरातील पुजाऱ्याला तीळ, उबदार कपडे, गूळ, तूप, फळे, धान्य, धन, अन्न, भोजन, जोडे-चप्पल, कपडे, तूप, तेल, तीळ यांचे दान करावे. इत्यादी गोष्टींचे दान केल्यास पुण्यफळ प्राप्त होते. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
