आजपासून माघ महिन्याला सुरुवात झाली. आज माघ महिन्याचा पहिला दिवस असून आजपासून गुप्त नवरात्रीची देखील सुरुवात होत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार अकरावा महिना हा माघ महिना आहे. पौष पौर्णिमेनंतर हा महिना सुरू होतो. माघ महिना पूर्वी ‘तपस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी मघा नक्षत्र पूर्वेला उगवते व रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच माघ महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘माघ’ हे नाव प्राप्त झाले आहे. माघ महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Magh Month)
माघ या महिन्याच्या जेवढे जास्त दान कराल तेवढे अधिक लाभदायक ठरते. त्याचबरोबर व्यक्तीला भगवान विष्णूची विशेष कृपाही प्राप्त होते. माघ महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना समजला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा महिना येतो. श्रावण महिन्यासारखेच माघ महिन्याला मोठे महत्त्व आहे. माघ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. याशिवाय भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचीही पूजा या महिन्यात करावी. असे केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम होतात. (Top Trending News)
एका पौराणिक कथेनुसार माघ महिन्यात गौतम ऋषींनी इंद्रदेवांना शाप दिला होता. यानंतर इंद्रदेवांना आपली चूक लक्षात येत त्यांनी गौतम ऋषींची माफी मागितली. त्यानंतर, गौतम ऋषींनी इंद्रदेवांना माघ महिन्यात गंगेत स्नान करून प्रायश्चित्त करण्यास सांगितले. त्यानुसार, माघ महिन्यात इंद्रदेवांनी गंगेत स्नान केल्याने ते शापापासून मुक्त झाले होते. तेव्हापासून या महिन्यात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्याच्या सकाळी श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करून पंचामृत अर्पण करावे. माघ महिन्यात कृष्णाच्या मंत्रांचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावे. एखाद्या गरीबाला नियमित अन्नदान करावे. शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करा. (Marathi News)
तिलकुंद चतुर्थी, वसंत पंचमी, आणि भीमाष्टमी या महिन्यात पडणारे प्रमुख सण आहेत. या महिन्याच्या द्वादशीला यमाने तिळाची निर्मिती केली आणि राजा दशरथाने त्यांना पृथ्वीवर शेतात पेरले होते. म्हणून या महिन्यात व्रत तसेच तीळ दान करणे व तिळाचे सेवन करणे याचे अधिक महत्त्व आहे. पुराणांप्रमाणे या महिन्यात शीतल पाण्यात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होऊन स्वर्गलोकात जातो. माघ महिन्यात स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या महिन्यात गंगा स्तोत्र आणि गंगा स्तुती केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते. त्याचबरोबर त्या व्यक्तीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि ती व्यक्ती जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होते. (Todays Marathi Headline)

स्कंधपुराणातील रेवाखंडात माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगणारी एक कथा आढळते. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करत होता. त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते. मात्र, पूजा विधी करण्यात त्यांचे मन रमेना. पैसा कमवण्यात ते नेहमी व्यस्त असत. मात्र, वृद्धावस्थेत पूजा विधी कर्म केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे, यासाठी ते नियमितपणे पूजा-विधी करू लागले. ‘माघे निमग्ना: सलिले सुशीते विमुक्तपापास्त्रिदिवं प्रयान्ति।।’ या श्लोकाचा त्यांनी जप सुरू केला. सलग नऊ दिवस या श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले. यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. (Top Marathi News)
पैसे कमवण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला. मात्र, माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मुक्ती मिळाली, अशी कथा आहे. माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळून येते. राणी कैकयी यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधीत झाला. या रागाच्या भरात भरताने कैकयीला, तुझी सर्व पुण्य कर्मे नष्ट होतील. माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही, असा शाप दिला. (Latest Marathi Headline)
माघ महिन्यात जर कोणी तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तसेच या महिन्यात तामसी आहार टाळावा. तसेच या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. हा महिना परोपकार कमावण्याचा महिना आहे. अशा वेळी साधकाने कठोर शब्द बोलणे टाळावे तसेच मोह, मत्सर, लोभ इत्यादी गोष्टींचा त्याग करावा. माघ महिन्यात तीळ आणि गुळाचे सेवन करावे. तसेच त्यांचे दान करणे विशेष फायदेशीर ठरते. (Top Stories)
========
Gupt Navratri : माघ गुप्त नवरात्रींचा आजपासून आरंभ
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
========
या महिन्यात भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होते. माघ महिन्यात तामसिक आहार, मांसाहार, मद्य व इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे. ज्योतिषाच्या मते माघ महिन्यात आंघोळीनंतर तेलाचा वापर करू नये. भाज्यांमध्ये मुळा अजिबात वापरू नका. तामसिक अन्न, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. असे केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. माघ महिना पुण्य मिळवण्याचा आणि साधना करण्याचा महिना आहे. म्हणून या महिन्यात खोटे बोलणे, कठोर शब्द, मत्सर, आसक्ती, लोभ, वाईट संगत इत्यादी गोष्टींचा त्याग करावा. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
