उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये पुन्हा एक अनोखा विक्रम होणार आहे. या प्रयागराजमध्ये ३ जानेवारी २०२६ पासून माघ मेळा सुरु होत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भरणा-या या माघमेळ्यासाठी देशभरातील साधू येऊ लागले आहेत. सोबतच देश विदेशातील अनेक भाविक येथे कल्पवासासाठी येत आहेत. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीला हा माघमेळा संपन्न होणार आहे. या माघमेळ्यातही महाकुंभमेळ्याप्रमाणे मोठ्या संख्येनं भाविक येणार आहेत. आत्तापर्यंत येथील प्रशासनाकडे झालेल्या नोंदणीनुसार भाविकांची ही संख्या १५ कोटीपर्यंत असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच २०२६ मध्ये होणारा हा प्रयागराज माघ मेळा ऐतिहासिक होणार आहे. या संगमच्या काठावर श्रद्धा, परंपरा आणि भव्य व्यवस्थेचा संगम पहायला मिळणार आहे. या माघमेळ्याची भव्यता पाहण्यासाठी येथे आत्तापासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. भाविकांचा हा उत्साह पाहून माघ मेळ्याला येथील प्रशासनाने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (Uttar Pradesh)

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधील माघ मेळा शतकानुशतके चालू आहे. माघ महिन्यात, संगम तीरावर दरवर्षी भक्ती, संयम यांचा संगम पहायला मिळतो. येथे लाखो भाविक संगममध्ये स्नान करतात आणि संपूर्ण महिना कल्पवासात घालवतात. या दरम्यान हे भाविक अत्यंत कठिण जीवनक्रम व्यतित करतात. या सर्वांसाठी संगमच्या काठावरील वालुकामय मैदानावर एक तात्पुरते शहर बांधले जाते. आत्ताही प्रयागराजमध्ये या माघमेळ्याच्या महिनाभरासाठी एक मोठे शहर तयार करण्यात आले आहे. त्यात निवास, अन्न, वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि स्वच्छता यासारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. (Social News)
पौर्णिमेला या प्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू होतो. हा मेळा महाशिवरात्रीपर्यंत, म्हणजेच सुमारे दीड महिना सुरु रहाणार आहे. याच काळात महिनाभर कल्पवास देखील होणार आहे. कल्पवासी प्रयागराजमध्ये येतात. या वर्षी, माघ मेळा ३ जानेवारी २०२६ रोजी सुरू होईल आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपेल. पुढच्या वर्षी होणा-या या माघ मेळ्यातही शाही स्नानासारखीच परंपरा आहे. यासाठी येथे भारताच्या कानाकोप-यातील साधूही मोठ्या संख्येनं यातात. सोबतच महिला नागा साधूही या माघमेळ्यासाठी मोठ्या संख्येनं या प्रयागराज नगरीमध्ये दाखल होत आहेत. (Uttar Pradesh)
साधू संतांसोबत या माघमेळ्यासाठी भाविकही मोठ्या संख्येनं येणार असल्यानं प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या नोंदीनुसार या दीड महिन्यात १५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार या माघनगरीमध्ये रस्ते, घाट, निवासस्थाने, शौचालय आदींची व्यवस्था कऱण्यात येत आहे. २०२५ च्या महाकुंभाच्या ऐतिहासिक यशानंतर, स्थानिक प्रशासन प्रयागराजला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे. त्यानुसारच आता माघमेळ्यातील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. माघ मेळ्या दरम्यान गंगेत स्नान करणे खूप महत्वाचे मानले जाते. कल्पवासी तर गंगेमध्ये दिवसातून तीन वेळा स्नान करतात. त्यामुळेच गंगा घाटांची पुन्हा पुन्हा स्वच्छता करण्यात येत आहे. या माघमेळ्यामध्ये काही दिवस हे शाही स्नानांसारखे असतात. त्यादिवशी प्रयागराजमध्ये संगमस्थानावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होते. यात ३ जानेवारी २०२६ पौष पौर्णिमा, १४ जानेवारी २०२६, मकर संक्रांती, १८ जानेवारी २०२६ मौनी अमावस्या, २३ जानेवारी २०२६ बसंत पंचमी, १ फेब्रुवारी २०२६ माघ पौर्णिमा आणि १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री या प्रमुख तारखा असणार आहेत. (Social News)

या वर्षी, माघ महिना ४ जानेवारी २०२६ रोजी पुनर्वसु नक्षत्रात सुरू होईल. त्यामुळे हा माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो. शिवाय, मकर संक्रांतीच्या दिवशी, भगवान शनिदेवाच्या अधिपत्याखालील अनुराधा नक्षत्र प्रभावी असते. मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य शनीच्या राशीत, मकर राशीत संक्रमण करतो, ज्यामुळे अशा प्रसंगी शनि नक्षत्राची उपस्थिती अत्यंत शुभ होते. याच सर्व शुभमुहूर्तावर प्रयागराजमध्ये गंगा नदीवर स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येणार आहेत. या भाविकांना सुविधा व्हावी म्हणून आंबेडकर नगरमधील अकबरपूर बस डेपो ते प्रयागराज पर्यंत एकूण १२० बसेस रोज धावणार आहेत. या बसेस दर अर्ध्या तासाने उपलब्ध असतील. शिवाय विशेषतः गंगा स्नानाच्या तारखांना या बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे. (Uttar Pradesh)
====
हे देखील वाचा : Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !
======
सोबतच त्रिवेणी नदीच्या काठावर ४४ दिवसांच्या माघ मेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तंबू शहराचा प्रत्येक कोपरा प्रकाशित ठेवण्यासाठी वीज विभागाने जवळजवळ तयारी पूर्ण केली आहे. वीज विभागाने माघ मेळ्यात प्रथमच एक उच्च-तंत्रज्ञानाची “बारकोड प्रणाली” लागू केली आहे, यातून कोणत्याही वीज-संबंधित समस्येचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. मेळा परिसरात बसवलेल्या प्रत्येक खांबावर, लाईनवर आणि कनेक्शनवर विशेष बारकोड लावले जातील. हे स्कॅन करून, वीज कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षाकडून थेट समस्या माहिती मिळेल आणि रेकॉर्ड वेळेत त्यांचे निराकरण होईल. मेळा परिसरात असे १५,००० हून अधिक बारकोड बसवण्यात आले आहेत. माघ मेळ्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर २५,००० हून अधिक एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या माघ मेळ्याच्या दीड महिन्यात १५ कोटी हून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. म्हणजेच दिवसाला येथे एक कोटीच्या आसपास भाविक येतील, या सर्व भाविकांना सर्वप्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रयागराज माघमेळा प्रशासन सज्ज आहे. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
