आज पासून पौष महिन्याची समाप्ती होऊन माघ महिन्याची सुरुवात होत आहे. माघ महिना हा मराठी वर्षाचा अकरावा महिना असून, इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जानेवारी -फेब्रुवारी महिन्यादरम्यान येतो. माघ हा थंडीचा शेवटचा महिना असतो. या महिन्यामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे याकाळात अनेक धार्मिक विधी केले जातात. याच महिन्यात एक गुप्त नवरात्री देखील साजरी केली जाते. (Gupta Navratri)
एका वर्षात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री. या दोन गुप्त नवरात्रींपैकी एक नवरात्री माघ महिन्यात आणि एक नवरात्री आषाढ महिन्यात येते. आजपासून माघ महिन्याची आणि गुप्त नवरात्रीची सुरुवात झाली आहे. हे गुप्त नवरात्र १९ जानेवारी २०२६ पासून सुरु होत असून ते २७ जानेवारी रोजी संपत आहे. गुप्त नवरात्रात दहा महाविद्यांची पूजा केली जाते. गुप्त नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांचीही पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते. घरात घटस्थापना केल्यामुळे वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. गुप्त नवरात्री तंत्रविद्येवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी अत्यंत खास मानली जाते. जाणून घेऊया याच गुप्त नवरात्रीची माहिती. (Marathi)
नवरात्रीत, देवी दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर एका किंवा दुसऱ्या आसनावर बसून अवतरण करते. तिच्या प्रत्येक वाहनाचे विशेष महत्त्व आणि एक वेगळे प्रतीकात्मकता आहे. देवी दुर्गेचे पृथ्वीवर आगमन होण्यासाठी कोणते आसन अधिक शुभ मानले जाते. १० महाविद्या काली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या देवींच्या साधना-आराधनेचा हा उत्सव असतो. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीत देवीच्या दिव्य रूपांची गुप्त पद्धतीने पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते असे सांगितले जाते. (Todays Marathi Headline)

१९ जानेवारी २०२६, सोमवार पासून या गुप्त नवरात्रीची सुरुवात होत आहे. त्यामुळेच आज गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ०६.४३ वाजेपासून ते सकाळी १०:२४ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. माघ गुप्त नवरात्री घटस्थापनेसाठीचा अभिजीत मुहूर्त हा सकाळी ११:५२ वाजेपासून दुपारी १२:३६ वाजेपर्यंत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजेच्या जागी कलश स्थापना करावी. कलशावर नारळ आणि कडुनिंबाची किंवा आंब्याची पाने ठेवावीत. शक्य असल्यास नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गुप्त नवरात्रीत साधकाने सात्त्विक आहार घ्यावा आणि शक्य तितके मौन पाळावे. (Top Stories)
दुर्गा देवीला लाल रंगाची फुले त्यंत प्रिय आहेत. पूजेत या फुलांचा वापर करा. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे किंवा ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा जप करणे अत्यंत प्रभावी ठरते. तर शेवटच्या दिवशी किंवा अष्टमीला नऊ कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन दिल्याने देवी प्रसन्न होते. या नवरात्रीच्या काळात दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. शक्य नसल्यास देवीच्या कोणत्याही मंत्राचा श्रद्धेने जप करावा. पूजा झाल्यानंतर देवीला लवंग आणि बताशे यांचा विशेष नैवेद्य अर्पण करावा. गुप्त नवरात्रीत दररोज संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून मंत्रजप किंवा भजन करावे. (Top Trending News)
गुप्त नवरात्रीमध्ये ‘सत्व’ गुणांऐवजी ‘तामस’ आणि ‘राजस’ शक्तींची उपासना केली जाते. ही नवरात्री विशेषतः साधू, संन्यासी आणि तंत्र-मंत्राची साधना करणाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. या नवरात्रीमध्ये केलेली पूजा जितकी ‘गुप्त’ ठेवली जाते, तितके त्याचे फळ जास्त मिळते अशी मान्यता आहे. म्हणूनच याला गुप्त नवरात्री म्हणतात. कौटुंबिक शांतता, शत्रूंवर विजय आणि कठीण आजारांतून मुक्ती मिळवण्यासाठी ही नवरात्री फलदायी ठरते. मध्यरात्रीची पूजा या काळात विशेष फलदायी मानली जाते. या ९ दिवसांत सात्त्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. तसेच केस आणि नखे कापू नयेत असे मानले जाते. (Social News)
========
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
========
गुप्त नवरात्रीमध्ये पुढील मंत्रांचे जप करणे लाभदायक असते.
१) ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
२) या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
३) या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
