Home » M.V. Sita Lakshmi : भीक मागून देवळाला लाखो दान करणारी महिला कोण ?

M.V. Sita Lakshmi : भीक मागून देवळाला लाखो दान करणारी महिला कोण ?

by Team Gajawaja
0 comment
Share

एक भिकारी, ज्याचे कपडे फाटलेले आणि चेहऱ्यावर जीवनाची कठोरता स्पष्टपणे दिसत असते आणि तो मंदिराच्या दारावर बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात दुःख, संघर्ष, आणि आशा एकत्र मिसळलेली असते. भक्त हे मंदिरात पूजा करण्यासाठी येतात आणि या भिकाऱ्याच्या कुटुंबाची त्याच्या जीवनाची कहाणी वेगळीच असते. भिकाऱ्याच्या हातात अर्धवट भिक घेतलेल तांब्याचं बरणं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दुर्बल हसू, जे जीवनातील दु:खावर मात करण्याच प्रतीक आहे. पण असेही काही भिकारी असतात, ज्यांची संवेदनशीलता नेहमीच जिवंत असते. दक्षिण भारतातील एका मंदिराबाहेरील एका महिलेन चक्क भीक मागून मंदिरात लाखो दान केल्याची घटना मैसूरमध्ये घडली. पण नेमकी काय आहे ही घटना ? आणि ती दानशुर महिला आहे तरी कोण जीने लाखोंचं दान मंदिरात केलं ? जाणून घेऊ. (M.V. Sita Lakshmi)

मंदिर म्हटलं की, देव-धर्माच्या पवित्रतेसोबतच एक वेगळी सामाजिक वास्तवताही समोर येते, ती म्हणजे मंदिराच्या समोरील बसणारे भिकारी. हे भिकारी, विशेषतः वृद्ध माणस, आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जीवनाच्या कठीण परिस्थितीला तोंड देत असतात. मंदिरात आल्यावर आम्ही देवाला पूजेच फूल अर्पण करतो, पण त्याच वेळी मंदिराच्या बाहेर ते भिकारी आपला अन्नाचा तुकडा मिळवण्यासाठी आशेने उभे असतात. दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर, मंदिरात दान देण ही एक परंपरा आहे. रोज, अनेक भक्त आपल्या आर्थिक क्षमतेनुसार दान करतात, आणि देवाच्या आशिर्वादाची अपेक्षा करतात. दानाच महत्त्व असल तरी, आपला मन आणि हृदय किती मोठे आहे, हिच खरी मोजणी असते. परंतु , मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना दिलेल्या दानाची शंभर टक्के निश्चितता नसते की ते पैसे थोडं चांगलं वापरतील किंवा त्यांची परिस्थिती सुधारेल. पण एक गोष्ट नक्की आहे, की ज्या दानाचं मोल आणि विचार असतो, तो दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात एक मोठा बदल घडवू शकतो. दान देणाऱ्यांचा मुख्य उद्देश फक्त त्याच्या धार्मिक कर्तव्याची पूर्तता करण नाही, तर समाजात एक सकारात्मक बदल घडवणं हा आहे.(Marathi News)

अशीच एक घटना मैसूर येथील वौटीकोप्पल येथील प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिरात घडली (Venugopala Swamy Temple) . ही घटना आपल्याला मानवतेच्या गोड गोष्टींचा अनुभव देते. इथल्या एका ८५ वर्षीय सीतालक्ष्मी नावाच्या भिकारीनं अडीच लाख रुपये मंदिराला दान दिले. यावर विश्वास बसणं कठीण आहे, कारण सीतालक्ष्मी ही महिला भिक मागणारी आहे. तिच्या जीवनातील संघर्ष आणि परिश्रम यांना पाहता, इतकी मोठी रक्कम दान करण्याच धाडस घेणारी ही महिला खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हैसूरमधील यादवगिरी येथे राहणारी एम. व्ही. सीतालक्ष्मी गेल्या दशकापासून शारीरिक दुर्बलतेमुळे घरोघरी कामासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे सीतालक्ष्मी ही महिला प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिराच्या गेटवर रोज भिक मागायची, परंतु त्याच मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून तिने हे पैसे दान केले. तिच्या या कृतीमागे एक गोड कारण आहे ते म्हणजे – ती अशी महिला आहे जिने देवावर अढळ विश्वास ठेवलाय आणि तिच सर्व काही तिने देवाच्या चरणी अर्पण केल आहे. ज्याठिकाणी मंदिर प्रशासन तिची देखभाल करत होत, तिथे तिने हे पैसे दिले.(M.V. Sita Lakshmi)

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एम. बसवराज म्हणतात की, “सीतालक्ष्मी वेगळी आहे आणि कधीही भक्तांकडून काही मागणी करत नाही. भक्त आपल्या इच्छेनुसार जे काही देतात ते ती स्वीकारते.” तिचा आणखी एक उल्लेख करत ते म्हणाले, “आमच्या मंदिर कार्यक्रमादरम्यान आमदार वासू यांच्या हस्ते तिच्या महान कार्याचा सत्कार करण्यात येईल.” तिचे योगदान मंदिरासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि लोक तिला अधिक देणग्या देत आहेत. काही भक्त १०० रुपयांपर्यंत देतात आणि त्या बदल्यात तिचे आशीर्वाद घेतात. एवढच नाही तर बसवराज पुढे असही म्हणाले, “आम्ही सीतालक्ष्मी यांच्या दिलेल्या पैशाचा योग्य वापर करू आणि त्याची काळजी घेऊ… (M.V. Sita Lakshmi)

=============

हे देखील वाचा : Premanand : स्थानिकांच्या विरोधामुळे प्रेमानंद महाराजांची लोकप्रिय पदयात्रा बंद!

=============

अशी एक परिस्थिती, जिथे अनेक लोक पैशांसाठी एकमेकांशी भांडतात, त्याच ठिकाणी सीतालक्ष्मी या भिकारीन तिची कमाई देवळात दान दिली. तिने मागील काही काळात गणेशोत्सवाच्या वेळी ३० हजार रुपये दान दिले होते आणि त्यानंतर २ लाख रुपये बँकेत जमा करून मंदिराला दिले. तिच्या या कृत्यामुळे मंदिर प्रशासन आणि भाविक तिला भेटायला गेले आणि तिचे आभार मानले. सीतालक्ष्मीच्या या कृत्यामुळे समाजाला एक मोठा संदेश दिला जातो तो म्हणजे खरी दानशीलता ती आहे जी परिस्थितीची पर्वा न करता दिली जाते. आजच्या युगात जिथे लोक आपापसात स्पर्धा करतात, तिथे एका भिकारीनं तिच्या मेहनतीचे पैसे देवाच्या कार्यात अर्पण केले, आणि हे खूपच प्रेरणादायी आहे. सीतालक्ष्मी यांच्या आयुष्याचा प्रवास आणि दानाच्या भावनेचा आदर्श आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.