देशात ८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण होते. त्यावेळी चंद्राचा रंग हा लाल झाला होता. याच दिवशी रात्री उत्तर भारतात रात्री जवळजवळ दोन वाजता जोरदार भुकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ मध्ये यामुळे फार मोठे नुकसान ही झाले. त्यानंतर अशी चर्चा वेग धरु लागली की, ग्रहण आणि भुकंप यांच्यामध्ये एक खास कनेक्शन असते. जेव्हा खास चंद्रग्रहण असते तेव्हा पृथ्वीवर भुकंप जरुर येतो. दरम्यान, ही गोष्ट सुद्धा तितकीच योग्य आहे की भुकंप अशा दिवसांमध्ये सुद्धा येतो जेव्हा चंद्रग्रहणासाठी खुप काळ असतो. (Lunar Eclipse & Earthquakes)
भुकंप आणि चंद्रग्रहण मधील संबंध भारतीय ग्रंथ आणि पुराण सुद्धा मानतात. ज्योतिषांनी या मधील संबंध मानण्यासाठी जोर ही दिला पण विज्ञान काय सांगते? जगातील काही युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिक यासंदर्भात जाणून घेण्यासाठी एकत्रित आले आणि त्यांनी नंतर असा निष्कर्ष काढला की, या दोघांमध्ये काहीही संबंध नाही.

सोशल साइट्स आणि काही ठिकाणी असा दावा करणाऱ्या पोस्ट सातत्याने प्रकाशित झाल्या की, विज्ञानावर विश्वास ठेवा अथवा नाही मात्र संबंध आहे. पण याबद्दल प्राचीन भारताचे विद्वान वराह मिहिर यांनी अधिक सांगितले आहे.
वराह मिहिर यांनी आपला ग्रंथ बृहत्संहिता मध्ये भुंकप आणि ग्रहणातमधील नात्याबद्दल सविस्तर लिहिले आहे, वराह मिहिर हे ईसवीसन पाचव्या-सहाव्या शतकातील भारतीय गणितज्ञ आणि खलोगलज्ञ होते. त्यांनी आपल्या पंचसिद्धान्तिका मध्ये सर्वात प्रथम असे सांगितले की, अयनांशचा मान ५०.३२ सेकंदासमान आहे. तसेच ते चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या नवरत्नांमध्ये एक होते. (Lunar Eclipse & Earthquakes)
उज्जैनमध्ये त्यांच्या द्वारे विकसित गणितीय विज्ञान गुरुकुल ७०० वर्षापर्यंत अद्वितीय राहिले. ५५० ई. च्या जवळजवळत्यांनी तीन महत्वाची पुस्तके बृहज्जातक, बृहत्संहिता आणि पंचसिद्धांतिका लिहिले. या पुस्तकांमध्ये त्रिकोणमितीच्या महत्वपूर्ण सुत्रांबद्दल सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा- भारतात सर्वाधिक भूकंप कुठे आणि का येतात?
वैज्ञानिक हे मानत नाहीत
दरम्यान जगातील काही वैज्ञानिक याचा स्विकार करत नाहीत. भारतीय वैज्ञानिकांनी सुद्धा नेहमीच चंद्रग्रहण आणि भूकंपामध्ये नाते असल्यासंदर्भात गोष्ट फेटाळली आहे. जसे अफगाणिस्तान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील चंद्रग्रहणाच्या आधी किंवा नंतर आलेल्या भुकंपाची वेळ ही लोक यासोबत जोडतात.
हवाई युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी काही वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला आणि त्यांनी याबद्दल स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान. विदेशात सुद्धा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. पण त्यापैकी काही भविष्यवक्ते मानत होते की, चंद्रग्रहणाच्या १६ दिवसानंतर भुकंप होण्याची शक्यता असते.