Home » दिवाळीच्या १५ दिवसानंतर लागणार अखेरचे चंद्र ग्रहण, सूतक काळापूर्वी साजरी होणार देव दिवाळी

दिवाळीच्या १५ दिवसानंतर लागणार अखेरचे चंद्र ग्रहण, सूतक काळापूर्वी साजरी होणार देव दिवाळी

by Team Gajawaja
0 comment
Lunar Eclipse 2022
Share

ज्योतिष शास्रात ग्रहणाचे विशेष महत्व आहे. ग्रहणासंदर्भात हिंदू धर्मात काही नियमांचे पालन केले जाते. शास्रानुसार याला एक अशुभ घटना असल्याचे मानले जाते. या दरम्यान कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य केली जात नाहीत यंदाच्या वर्षी एकूण ४ ग्रहम पडणार आहेत. दोन ग्रहण झाली आणि आता दोन शिल्लक आहेत. तर सूर्य ग्रहणाच्या बरोबर १५ दिवसानंतर चंद्र ग्रहण लागते. अशातच यंदा दिवाळीला सूर्य ग्रहण असणार आहे आणि त्याच्या १५ दिवसानंतर देव दिवाळीवेळी चंद्र ग्रहण असणार आहे. (Lunar Eclipse 2022)

दिवाळी यंदा २५ ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. याच्या बरोबर १५ दिवसानंतर देव दिवाळी वेळी चंद्र ग्रहण असणार आहे. सूर्य ग्रहण नेहमीच अमावस्येच्या वेळी तर चंद्र ग्रहण नेहमी पौर्णिमेला असते. देव दिवाळी ८ नोव्हेंबरला आहे. पण चंद्र ग्रहणाच्या सूतकापूर्वी देव दिवाळी साजरी केली जाईल. त्यामुळेच विद्वानांनुसार देव दिवाळी ७ नोव्हेंबरला साजरी केली जाईल.

Lunar Eclipse 2022
Lunar Eclipse 2022

चंद्र ग्रहणाची वेळ
वर्ष २०२२ मधील दुसरे आणि अखेरचे चंद्र ग्रहण भारतात दिसणार आहे. याची वेळ ८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ३२ मिनिटांपासून ते संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.

या’ ठिकाणी दिसणार चंद्र ग्रहण
वैज्ञानिकांच्या मते वर्षातील दुसरे आणि अखेरचे चंद्र ग्रहण हे भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पेसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागरच्या ठिकाणी दिसणार आहे. (Lunar Eclipse 2022)

चंद्र ग्रहणाचा सूतक काळ
चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ९ तासांपूर्वी लागतो. अशातच सूतक काळ लागण्यापूर्वी देव दिवाळी साजरी केली जाणार आहे.

हे देखील वाचा- आंतराळात कचरा पसरवणाऱ्या अमेरिका-चीनसह ‘हा’ देश सुद्धा सर्वाधिक पुढे

ग्रहणासंबंधित खास गोष्टी
-वैज्ञानिकांच्या मते चंद्र ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत येतात. त्यामुळे चंद्र ग्रहण लागते.
-चंद्र ग्रहणादरम्यान ज्योतिषनुसार काही प्रकारच्या सावधगिरी बाळगल्या पाहिजेत असे सांगितले जाते.
-ग्रहणानंतर हिंदू धर्मात दान आणि स्नानाचे विशेष महत्व आहे.
-असे सांगितले जाते की, ग्रहणाचा सूतक काळ हा अशुभ असतो. त्यादरम्यान कोणतेही शुभ काम किंवा पूजा केली जात नाही. ग्रहण संपेपर्यंत सूतक काळ असतो.
-चंद्र ग्रहणावेळी गर्भवती महिलांनी खासकरुन काळजी घ्यायची असते, या दरम्यान देवाचे नामस्मरण करावे.
-सूतक काळात पूजा करु शकत नाही.
-या दरम्यान झोपू सुद्धा शकत नाहीत.
-ग्रहणादरम्यान, कोणत्याही धारधार वस्तूचा वापर केला नाही पाहिजे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.