4 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या New York शहरात एक हत्याकांड झाले. युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांच्यावर एका तरुणानं गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात Brian Thompson यांचा मृत्यू झाला. पण या हत्येनंतर ब्रायन यांच्याबाबत कुठलिही सहानुभूती व्यक्त करण्यात आली नाही. उलट त्यांना ठार करणारा तरुण हिरो ठरला आहे. या सर्वाला कारण ठरली आहे, ती अमेरिकेतील हेल्थकेअर पॉलिसी. हेल्थकेअर पॉलिसी का काढली जाते, अर्थातच गरजेच्यावेळी पैसे मिळावे आणि उपचारात मदत व्हावी यासाठी. पण नेमक्या गरजेच्यावेळीच या पॉलिसीचे पैसे मिळाले नाहीत तर आणि हा दावाच फोल असल्याचे ठरवत नाकारला गेला तर अर्थातच या तर मध्येच ब्रायन यांच्या हत्येचे कारण दडले आहे. आणि त्यांना मारणारा तरुण हिरो का झाला, याचेही उत्तर आहे. अमेरिकेमध्ये अलिकडच्या काळात हेल्थकेअर पॉलिसी काढलेल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळवण्यासाठी अक्षरशः न्यायालयातही लढा द्यावा लागत आहे. (International News)
पॉलिसीचे हफ्ते योग्यवेळी घेणा-या हेल्थकेअर संस्था त्यांची परतफेड करतांना मात्र चौकशीच्या जाळ्यात संबंधित ग्राहकाला अडकवत आहेत. ब-याचवेळा हे दावे चुकीचे असल्याचा ठपका ठरवत हेल्थकेअर पॉलिसी अंतर्गत येणारे फायदे नाकारण्यात येत आहेत. अशा घटना वाढल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. ब्रायन यांच्या हत्येमागेही असाच राग होता. त्यामुळेच ब्रायन यांची हत्या झाल्यावर त्यांच्या मारेक-याला नागरिकांनी हिरो केले आहे. हा मारेकरु किती देखणा आहे, तो कसा हुशार आहे अशा गोष्टी आता तेथील सोशल मिडियामध्ये चर्चिल्या जात आहेत. फारकाय या मारेक-याच्या आर्थिक मदतीसाठी एक मोहीमही चालवण्यात येत आहे.
4 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 26 वर्षीय लुईगी मँगिओनचे याने ही हत्या केली. त्याला पोलीसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर अमेरिकेतील जनता लईगीचा हिरो म्हणून गौरव करीत आहे. लुईगीनं सर्वसामान्यांच्या मनातील राग व्यक्त केला आहे. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे, असे सांगून अमेरिकेत लईगीच्या खटल्यासाठी निधी गोळा केला जात आहे. लुईगीनं जे काम केलं आहे, ते खूप मोठं आहे, त्यामुळे त्याला मुक्त करावे यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली जात आहे. लुईगीच्या समर्थनार्थ लाखो Dollars गोळा झाले आहेत. एखाद्या खुन्याला एवढा जाहीर पाठिंबा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामागे नेमकं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेत हेल्थकेअर पॉलिसीमध्ये होणारी चालढकल.
युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉमसन यांनी अनेकांच्या Healthcare Policy अडकवून ठेवल्या होत्या. त्यात गरजवंतांचा समावेश आहे. अनेकांना Cancer सारखा रोग झाला आहे. काहींना ऑपरेशन करायची आहेत, तर काहींना ह्दयरोगावर उपचार करुन घ्यायचे आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे पैसे वेळेवर न मिळाल्यानं काहींचा मृत्यूही झाला आहे. अशी प्रकरणं अमेरिकेत वाढत असून जनतेमधून राग व्यक्त होऊ लागला आहे. आरोग्य विमा कंपन्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या नफ्याची जास्त प्राधान्य देत आहेत. म्हणूनच आपण हेल्थकेअर सीईओंचा खून केल्याचे लुइगी मॅनझिओनी यांनी सांगितल्यावर लोकांनी त्यालाच हिरो करुन टाकले आहे. लुइगीचा या सर्वांवर एवढा राग होता की, त्यानं ज्या गोळ्या झाडल्या, त्यावर ‘विलंब, नकार’ आणि ‘शक्यतो डिपोज’ असे लिहिले होते.
Insurance companies त्यांच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी विलंब करतात, नाकारतात, बचाव करतात आणि नंतर युक्तिवाद करतात. हेच लुइगीनं आपल्या गोळ्यावर समर्पक शब्दात लिहिले होते. America त या हेल्थकेअर पॉलिसीचे जाळे नागरिकांभोवती चांगलेच गुंफण्यात आले आहे. अमेरिकेतील सुमारे 50 दशलक्ष लोकांना आरोग्य विमा संरक्षण आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल $281 अब्ज आहे. परंतु गेल्या काही वर्षांत, त्या कंपनीचे दावे नाकारण्याचे प्रमाण दुप्पट वेगाने वाढले आहे. यासंदर्भात सिनेटमध्ये अहवालही देण्यात आला आहे. त्यात कंपनीचा दावा नाकारण्याचे प्रमाण 2020 मध्ये 10% होते, 2022 पर्यंत हे प्रमाण 20% पर्यंत वाढले. (International News)
==============
हे देखील वाचा : अरकान आर्मी आली कुठून ?
ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
===============
सध्या यापेक्षाही त्यात भर पडली आहे. ब्रायन थॉमसन 2021 मध्ये कंपनीचे सीईओ बनले आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीने खूप प्रगती केली आणि नफा $12 बिलियन वरून $16 बिलियन झाला. याच नफ्याच्या शर्यतीमध्ये मात्र गरजवंतांचा बळी गेला आहे. मात्र आता ब्रायन यांची हत्या झाल्यावर अमेरिकन आरोग्य विमा कंपन्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांची माहिती वेबसाइटवरून काढून टाकली आहे. असे असले तरी ब्रायन थॉम्पसनच्या हत्येनंतर आरोग्य विमा उद्योगाविरोधात लोकांमधील प्रचंड राग सोशल मिडियावर व्यक्त होत आहे. अनेक लोक विमा संरक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. तर दुसरीकडे ही हत्या करणा-याला योग्य मदत मिळावी म्हणून मदतनिधी गोळा कऱण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले आहेत.
सई बने