Home » Luigi Di Sarno : अरे देवा…ब्रोकोली खाताय, मग हे नक्की वाचा ?

Luigi Di Sarno : अरे देवा…ब्रोकोली खाताय, मग हे नक्की वाचा ?

by Team Gajawaja
0 comment
Luigi Di Sarno
Share

सध्या जेवणाच्या ताटामध्ये अनेक पदार्थांची रेलचेल होत आहे. यातही वेगवेगळ्या भाज्याही बाजारात दाखल झालेल्या आहेत. यातच गेल्या काही वर्षात भारतात ब्रोकोली नावाची भाजी लोकप्रिय ठरली आहे. विशेषतः सूप किंवा डायट फूड ज्यांना खायचे आहे, त्यांना ही ब्रोकोली विशेष आवडू लागली आहे. मात्र या ब्रोकोली खाणा-यांना सावधान करणारी बातमी इटलीवरुन आली आहे. ब्रोकोली चांगली आहे, मात्र ती खातांना कशी काळजी घेतली पाहिजे, हे इटलीमध्ये घडलेल्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. (Luigi Di Sarno)

इटलीमध्ये ब्रोकोलीपासून बनवलेला पदार्थ खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य 9 जण आयसीयूमध्ये दाखल असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. बोटुलिझम नावाच्या धोकादायक आजाराशी आजारामुळे ही वेळ आल्याची माहिती आहे. एक दुर्मिळ परंतु संभाव्य प्राणघातक ठरलेल्या या आजारामुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच तेथील ब्रोकोलीपासून खाद्यपदार्थ बनवतांना काळजी घेण्याचे आवाहनही तेथे करण्यात येत आहे. ब्रोकोली ही आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे. त्यात कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने असे अनेक पोषक घटक असतात. (International News)

अलिकडे स्मार्ट डायट या नावाखाली जे पदार्थ खाल्ले जातात, त्यात ब्रोकोलीपासून बनवलेले अनेक पदार्थ समाविष्ट आहेत. हिरव्या रंगाची फ्लॉवरसारखी दिसणारी ही भाजी बहुधा जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे. पण या भाजीमुळे इटलीमधील एका प्रसिद्ध संगीतकाराचा मृत्यू झाला आहे. इटलीच्या कॅलाब्रियामधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याकडून 52 वर्षीय कलाकार आणि संगीतकार लुइगी डी सारनो यांनी सँडविच विकत घेतले होते. लुइगी हे आपल्या कुटुंबासह कॅलाब्रिया मध्ये सुट्टीसाठी आले होते. तिथे फिरतांना त्यांनी फूड ट्रकमधून ब्रोकोली घातलेले सॉसेज सँडविच घेतले. हे सँडविच खाल्यावर लुइगी यांची प्रकृत्ती अचानक बिघडली. लुइगी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांनाही त्रास झाला. त्यात दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. शिवाय याच खाद्यपदार्थ विक्रेत्याकून अन्य 9 पर्यटकांनीही असेच सॉसेज सँडविच विकत घेतले होते. (Luigi Di Sarno)

त्या सर्वच जणांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगीतकार लुइगी डी हे या अन्य पर्यटकांसारखे भाग्यवान ठरले नाहीत. त्यांना रस्त्यातच त्रास सुरु झाला. उलट्या आणि चक्कर येऊ लागली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या फूड ट्रकमधून या सर्वांनी सॉसेज सँडविच विकत घेतले होते, त्यात प्राणघातक विषारी पदार्थ तयार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मते, रुग्णांमध्ये बोटुलिझमसारखी लक्षणे दिसून आली. हा क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम बॅक्टेरियामुळे निर्माण होणाऱ्या विषामुळे होणारा दुर्मिळ, परंतु संभाव्य प्राणघातक आजार आहे. त्याचवेळी, या सँडविचमध्ये जी ब्रोकोली वापरली होती, ती काही तास मॅरिनेट करुन ठेवण्यात आली होती. यासाठी आलं, लसूण आणि तेलाचा वापर करण्यात आला होता. या सर्वामुळे ब्रोकोली विषारी झाल्याचा निष्कर्ष संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय पथकानं काढला आहे. (International News)

बोटुलिझम म्हणजे काय? हेही जाणून घेतलं पाहिजे, बोटुलिझम हा एक दुर्मिळ आजार आहे. हा आजार झाल्यावर शरीराच्या स्नायूंना अर्धांगवायू आल्यासारखे होते. तसेच रुग्णांचा श्वासह कोंडला जातो. रुग्णाच्या नसांमधून वेदना सुरु होतात. वेळीच या रुग्णावर उपचार झाले नाहीत, तर त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो. असाच प्रकार संगीतकार लुइगी डी यांच्याबाबत झाला. बोटुलिझमचे पाच मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी अन्नजन्य बोटुलिझम हा एक आहे. बोटुलिझम दूषित अन्न खाल्ल्याने होऊ शकतो. त्याचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर साठवलेल्या अन्यपदार्थांची योग्य निगा राखणे आणि ते खाण्यापूर्वी त्यांचा दर्जा तपासणे कधीही फायदेशीर ठरते. पण याकडे दुर्लक्ष झाले आणि असे दूषित अन्न् खाण्यात आल्यास काही तासांत बोटुलिझमची लक्षणे दिसू शकतात. (Luigi Di Sarno)

==============

हे देखील वाचा :  Chennai : या मंदिरात आहे, भगवान श्रीकृष्णाचे पार्थसारथी रुप !`

============

मात्र हा रोग फसवा असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगतात. कारण काही रुग्णांमध्ये दोन आठवड्यांनंतर अन्नजन्य बोटुलिझमची लक्षणे दिसू लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. यात पोटात दुखणे किंवा अस्वस्थता, अस्पष्ट किंवा दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, घसा खवखवणे, चेहऱ्याच्या स्नायूंचा अर्धांगवायू, मळमळ किंवा उलट्या, बोलण्यास त्रास होणे अशा लक्षणांचा समावेश आहे. इटलीमधील बोटुलिझमच्या या घटनेनंतर तेथील आरोग्य पथकानं फूड ट्रक चालकांना अनेक सूचना दिल्या आहेत. त्यात कच्चे अन्नपदार्थ मॅरिनेट करतांना काय काळजी घ्यावी याचा समावेश आहे. मात्र संगीतकार लुइगी डी सारनो यांच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये ब्रोकोलीच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. परिणामी ब्रोकोलीच्या खाद्यपदार्थांची विक्री घटली आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.