Lower Back Pain : जर एखाद्या महिलेला कंबरेखाली सातत्याने दुखत असल्यास यामागे काही कारणे असू शकतात. कधीकधी जड सामान उचलल्यानेही कंबरेखाली दुखण्यास सुरूवात होते. पीरियड्स किंवा हेव्ही वर्कआउट केल्याने स्नायूंवर ताण पडल्यानेही कंबर दुखण्यास सुरूवात होते. पण तुम्हाला कंबरेखाली सातत्याने दुखते का? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
महिलांमध्ये कंबरेखाली दुखण्यामागील कारण
पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज (पीआईडी), रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये जेव्हा इंफेक्शन होते त्यावेळी कंबरेखाली दुखण्यास सुरूवात होते. गर्भाशय, फेलोपियन ट्यूब आणि ओव्हरीजमध्ये इंफेक्शन झाल्यास महिलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते.
पीआयडी झाल्यानेही कंबरेखाली दुखते आणि अनियमित पीरियडस येण्यास सुरूवात होते. शरिरात अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
फाइब्रॉइड
फाइब्रॉइडच्या स्थितीत महिलांच्या कंबरेखाली भयंकर दुखते. याशिवाय पेल्विक भागातच्या खालच्या भागात दुखणे आणि दबाव पडल्यासारखे वाटत राहते. यामध्ये अत्याधिक रक्तस्राव आणि वारंवार लघवी होणे ही या समस्येची लक्षणे आहेत. यावर उपचार म्हणून महिलेची सर्जरी केली जाते. (Lower Back Pain)
ओव्हेरियन सिस्ट
ओव्हेरियनमध्ये सिस्ट तयार झाल्यास कंबरेखाली दुखण्यासी समस्या उद्भवते. खरंतर, ओव्हेरियन सिस्ट फ्लूइडने भरलेले असतात. यावेळी शरिरात काही खास लक्षणे दिसातात. यामुळे महिलेला पेल्विक पेन आणि कंबरेवर दबाव पडल्यासारखे वाटते. यामुळे ओव्हरियन सिस्टबद्दल कळण्यासाठी महिलांनी काही महत्त्वाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)