फ्रान्समधील पॅरिस हे शहर कलाकारांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात पॅरिसमधील लूव्र संग्रहालय बघण्यासाठी जगभरातील कलाकारांची नेहमी रांग लागलेली असते. जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणून या लूव्र संग्रहालयाची ओळख आहे. या संग्रहालयात प्राचीन काळापासून ते 19 व्या शतकापर्यंतचा कलाकृतींचा खजिना आहे, याच संग्रहालयात लिओनार्डो दा विंची या जगप्रसिद्ध चित्रकारांनी काढलेले मोनालिसा हे चित्रही आहे. या लूव्र संग्रहालयाचे आता आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. 1980 मध्ये या संग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या संग्रहालयातील सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची दर्शकांची तक्रार आहे. या संग्रहालयात रोज लाखो प्रेक्षक येतात. मात्र त्यांना पुरेशा सुविधा मिळत नव्हत्या, याबाबत तक्रारी वाढल्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी लुव्र संग्रहालयाचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा केली आहे. शिवाय मोनालिसासाठी वेगळा कक्ष बनवण्यात येणार असल्याचीही माहिती दिली. (Louvre Museum)
लूव्र संग्रहालय हे पॅरिस शहरात स्थित जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे. जगातील सर्वात जास्त पर्यटक हे संग्रहालय पाहण्यासाठी येतात. हे एक ‘ऐतिहासिक’ संग्रहालय देखील आहे कारण त्यात प्राचीन काळापासून ते 19 व्या शतकापर्यंतच्या वस्तू आहेत. फ्रान्सच्या प्रसिद्ध सीन नदीच्या तीरावर असलेल्या या दगडी इमारतीला भेट देण्याचे स्वप्न जगातील प्रत्येक कलाकाराचे असते. ही भव्य इमारत आहे, त्या भागाचे क्षेत्रफळ 60600 चौरस मीटर आहे. येथे जगभरातील अनेक मान्यवर कलाकृती बघता येतात. यातच महान चित्रकार लिओनार्डो दा विंची यांची अजरामर कलाकृती मोनालिसाचाही समावेश आहे. या संग्रहालयाला आणि त्यातील कलाकृतींना बघायला लाखो प्रेक्षक येतात. मात्र त्या प्रेक्षकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. याबाबत अनेकवेळा तक्रार कऱण्यात येतात, तसेच सोशल मिडिवरही या संग्रहालयातील व्यवस्थेतील तुटींबाबत अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. (International News)
यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या सर्वांची दखल घेत लूव्र संग्रहालयाचे आधुनिकीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यात मुख्यत- लूव्र संग्रहालयात जाण्यासाठी आता सीन नदीजवळूनही एक नवीन प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या या आधुनिकीकरणाचे काम 2031 पर्यंत चालणार असून यामध्ये भूमिगत खोल्याही तयार कऱण्यात येणार आहेत. या संग्रहालयात मोनालिसासारख्या अन्यही कलाकृती आहेत. या कलाकृती बघण्यास येणा-या प्रेक्षकांची संख्या अधिक असते. त्यामुळे अन्य कलाकृती दुर्लक्षीत रहातात. म्हणूनच आता अशा मुख्य कलाकृतींसाठी वेगळा कक्ष तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे संग्रहालयात येणा-या प्रेक्षकांचेही वर्गीकरण होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लूव्र संग्रहालयाच्या आधुनिकीकरणाची घोषणा केली असली तरी या योजनेसाठी किती खर्च येणार हे स्पष्ट केलेले नाही. मात्र हा आखडा काही कोटी युरोच्या घरात असल्याची माहिती आहे. लूव्र संग्रहालयात शेवटचा मोठा बदल 1980 मध्ये केला होता. तेव्हा या संग्रहालयासमोरच प्रसिद्ध काचेचा पिरॅमिड बांधला गेला. (Louvre Museum)
आता त्यालाही 45 वर्ष झाली आहेत. या दरम्यान करोडो प्रेक्षकांनी लूव्र संग्रहालयाला भेट दिली आहे. या संग्रहालयाची रचना वार्षिक 40 लाख प्रेक्षकांना सामावून घेण्याची आहे. मात्र दरवर्षी किमान 85 लाख प्रेक्षक या संग्रहालयात येतात. त्यामुळे संग्रहालय प्रशासनावर भार पडत आहे. शिवाय संग्रहालयाच्या दुरुस्तीसाठीही वेळ मिळत नसल्याची तक्रार होत आहे. या संग्रहालयाच्या इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागते. त्यामुळे येथील कलाकृती खराब होण्याची भीती वाढली आहे. शिवाय फ्रान्समध्ये पडणा-या कडाक्याच्या थंडीपासूनही या कलाकृतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यातील अनेक दुर्मिळ कलाकृती सांभाळण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाय शोधण्याची मागणीही होत होती. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
याशिवाय लूव्र संग्राहलायत बांधलेला काचेचा पिरॅमिडही जुनाट असल्याची तक्रार करण्यात येत होती. या संग्रहालयाला बघायला 12 तासांचा अवघीही कमी पडतो. अशावेळी संग्रहालय बघायला येणा-या प्रेक्षकांना साध्या सुविधाही मिळत नाहीत. मुख्यतः संग्रहालयात शौचालयांची कमी आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना संग्रहालय पूर्णपणे बघता येत नाही. या सर्वांबाबत संग्रहालय प्रशासनानं सरकारकडे अनेकवेळा मागणी केली होती. आता त्याची दखल घेत लूव्र संग्रहालयाला आधुनिक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, मोनालिसा चित्रासाठी स्वतंत्र असा कक्ष तयार कऱण्यात येणार आहे. त्यामध्ये लिओनार्डो दा विंची यांनी 14 वर्ष या चित्राला कशापद्धतीनं तयार केले, याची माहितीही डिजिटल स्वरुपात देण्यात येणार आहे. (Louvre Museum)
सई बने