Home » चोरी झालेला iPhone पुन्हा मिळेल, पण ‘या’ करा सेटिंग्स

चोरी झालेला iPhone पुन्हा मिळेल, पण ‘या’ करा सेटिंग्स

जर तुम्ही आयफोन युजर आहात तर फोन चोरी होईल अशी भीती मनात असतेच. कारण ते ऐवढे महाग असतात की, खरेदी करतानाचा आपण  खुप वेळा विचार करतो.

by Team Gajawaja
0 comment
Lost iPhone find
Share

जर तुम्ही आयफोन युजर आहात तर फोन चोरी होईल अशी भीती मनात असतेच. कारण ते ऐवढे महाग असतात की, खरेदी करतानाचा आपण  खुप वेळा विचार करतो. आयफोनच्या चोरीची प्रकरणे ऐकल्यानंतर हातातून आयफोन घेऊन मिरवायचे कसे असा प्रश्न पडतो. मात्र तुम्ही तसे करू शकता. कारण फोनमध्ये अशा काही सेटिंग्स आहेत ज्या करून तुम्ही चोरी झालेला फोन पुन्हा मिळवू शकता.यासाठी अधिक काही करण्याची गरज नाही केवळ फोनमध्ये दिलेले काही ऑप्शन तुम्हाला स्टार्ट करायचे आहेत. हे फिचर्स सुरु केल्यानंतर तुमची फोन चोरी होण्याची चिंता दूर होईल. (Lost iPhone find)

आयफोनमध्ये करा ही सेटिंग
फोन चोरी होण्यापूर्वी तुमच्या आयफोनच्या डिवाइसमध्ये सेटिंग्स मध्ये जा.त्यानंतर ID आणि पासकोडमध्ये Allow Access when locked च्या ऑप्शनवर क्लिल करा. आता कंट्रोल सेंटर आणि एसेसरीजला डिसेलेक्ट करा.

Phone Tracking Tips,चोरी के बाद iPhone हो गया स्विच ऑफ, तो भी कर पाएंगे उसे  ट्रैक, जान लें ये जुगाड़ - iphone tracking tips when phone switched off  after theft - Navbharat

आयफोनचे लोकेशन जाणून घेण्यासाठी पुढील काही स्टेप्स करा फॉलो
-यासाठी सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा आणि तेथे आपल्या नावावर क्लिक करा
-असे केल्यानंतर फाइंड माय आयफोनच्या ऑप्शनवर क्लिक करा
-फाइंड माय आयफोनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फायइंड माय नेटवर्कवर सेंड लास्ट लोकेशनवर क्लिक करा.

ई-सिम येईल कामी
या सेटिंग्सने तुमचा हरवलेला फोन शोधण्यासह त्याचे लोकेशन ही मिळेल. पण तुम्ही विचार करा, जर फोन स्विच ऑफ केल्यास तर काय होईल. कधी ना कधी चोरी करणारा व्यक्ती ते स्विच ऑफ करेलच. अशातच तुम्ही ई-सिम कामी येईल. जर तुम्ही आयफोनसाठी ई सिम कार्ड खरेदी केले असेल तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. फोन स्विच ऑफ जरी केला तरीही तुम्हाला त्याचे लास्ट नोटिफिकेशन मिळू शकते. (Lost iPhone find)

वेबच्या मदतीने असा शोधून काढा
आपल्या आयफोन सोबत लिंक केलेल्या अॅप्पल अकाउंटचा वापर करत www.icloud.com/find मध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर एक ग्रीन पॉइंट दिसेल जो तुम्हाला आयफोनचे लोकेशन दाखवेल. अधिक ऑप्शन पाहण्यासाठी तुम्ही डॉट आणि नंतर i बटणावर क्लिक करा. आता लॉस्ट मोड, प्ले ए साउंड आणि एरेज पहा. लॉस्ट मोड युजर्सला एक क्रमांक, मेसेज पाठवतो. ते एनेबल झाल्यानंतर आयफोन लॉक होईल आणि केवळ पासकोडला पुन्हा दाखल केल्यानंतर अनलॉक करू शकतो.


हेही वाचा- तुमचे WiFi हॅक झालेय असे शोधून काढा

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.