हिंदू धर्मामध्ये तीन मुख्य देव आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यातले ब्रह्मा विश्वाची निर्मिती करतात, विष्णू सृष्टीचे पालन करतात तर शंकर तिचा संहार करतात. यातल्या भगवान विष्णूचे पृथ्वीवर एकूण २४ अवतार झाल्याचे आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे. भगवान विष्णूचे २४ अवतार असले तरी त्यापैकी १० अवतार सर्वात महत्वाचे आणि मुख्य मानले जातात. विष्णूंच्या या १० अवतारांपैकी एक म्हणजे वराह अवतार. हा अवतार भगवान विष्णूचा तिसरा अवतार आहे. या अवतारात भगवान विष्णूने वराह म्हणजेच रानडुकराचे रूप धारण केले. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला वराह जयंती साजरी केली जाते. यंदा ही तिथी २५ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी सर्वत्र ‘वराह जयंती’ साजरी केली जाईल. (Lord Vishnu)
भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणजेच वराह अवतार उत्तर प्रदेशातील सोरोन येथे झाला. याला शुकर क्षेत्र असेही म्हणतात. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला. हिरण्याक्ष या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात बुडवले होते आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला. (Marathi News)
वराह अवताराची कथा
एकदा भगवान नारायणाच्या दर्शनासाठी वैकुंठभवनात सनकादिक ऋषी गेले असता, भगवंताचे द्वारपाल असणार्या जय आणि विजय यांनी सनकादिकांचा मार्ग अवरोध केला आणि त्यांच्याशी तर्क लढवू लागले. परिणामी संतप्त झालेल्या सनकादिक ऋषींनी या दोघांनाही शाप दिला की, ज्या असुरांसारख्या उन्मत्त वृत्तीचे प्रदर्शन तुम्ही केले आहे, त्याच असुरांच्या कुळात तीन जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. आता ऋषींच्या शापाची निवृत्ती तो शाप भोगल्याशिवाय होणे नाही, हे जाणलेल्या जय, विजय यांनी भगवान नारायणांचा धावा केला आणि या शापातून लवकरात लवकर मुक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी पतितपावन असणार्या नारायणांनी, प्रत्येक अवतारात तुमच्या मुक्तीसाठी अवतार घेण्याचे वचन जय आणि विजय यांना दिले आणि त्याचे पालनही केले. (Todays Marathi Headline )
या जय आणि विजय यांनी घेतलेला पहिला जन्म कश्यप ऋषींची दुसरी भार्या दिती यांच्या पोटी झाला. कश्यप ऋषींच्या अदिती या पत्नीची संतती ही सुर, तर दितीपासून झालेली संतती असुर समजली जाते. या दितीपासून पुढे आलेल्या वंशामध्ये हिराण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु असा जय आणि विजय यांचा पहिला जन्म झाला. यांपैकी हिरण्याक्षाने उग्र तपसाधना करून स्वतःच्या सामर्थ्यात इतकी वाढ केली की, या पृथ्वीचे राज्य त्याने जिंकले. त्यानंतर पृथ्वीचे साम्राज्य हाती आल्याने, उन्मत्त झालेल्या हिराण्याक्षाने अत्याचारांचा कळस गाठायला सुरुवात केली. त्याच्या पापांचा भार इतका वाढला की, त्या पापाचरणाने संपूर्ण पृथ्वी बुडाली. (Top Marathi News)
सर्वत्र हिराण्याक्षाच्या पापांचाच जाच होता. अशावेळी पृथ्वीवरील पापाचा भार कमी करून धर्मसंस्थापना करण्यासाठी, श्रीहरी नारायणाच्या दशवतारांपैकी तिसरा अवतार म्हणजेच वराह अवतार पृथ्वीवर अवतरित झाला. या अवतारात हिरण्याक्ष दैत्याचा वध करून, पृथ्वीवरती पुन्हा एकदा धर्माची स्थापना केली. या वराह अवतरात भगवंतानी रानडुकराचे रुप धारण केले होते. या अवतारात विष्णूनी बुडालेल्या पृथ्वीला आपल्या शक्तिशाली सुळ्यांवर अलगद उचलून वर आणले आणि तिचे रक्षण केले. पापांचे परिमार्जन करून न्यायाची, सत्याची, धर्माची स्थापना करणारा भगवंतांचा वराह हा अवतार भाद्रपद महिन्याच्या तृतीया या तिथीला अवतरित झाला, म्हणून हा दिवस ‘वराह जयंती’ म्हणून साजरा करण्यात येतो. (Top Trending News)
भारतात वराहपूजन हे फार पूर्वीपासून सुरु असून, देशातील विविध भागांत भगवान वराहांची मंदिरे देखील आहेत. तामिळनाडूमधील श्रीमुष्नम येथे ‘भू- वराहस्वामी’ मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. कर्नाटकात ‘भू-वराहनाथ’ नावाने भगवान वराहांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश येथील वराहांची मंदिरे देखील प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे देखील भगवान वराह यांचे मंदिर आहे. (Latest Marathi Headline)
आपल्याला चार वेद, सहा शास्त्रे आणि १८ पुराणे याबद्दल माहिती आहे. मात्र या १८ पुराणांपैकी वराह पुराण एक आहे. या पुराणातील श्लोकांची एकूण संख्या ही २४ हजार इतकी आहे. आपल्या तिसर्या अवतारात, म्हणजेच वराह अवतारात भगवान नारायणांनी भूदेवी पृथ्वीला हे पुराण सांगितले, असे मानले जाते. या पुराणाची सुरुवात वराह आणि पृथ्वी यांच्यातील संवादाने झालेली आहे. यामध्ये त्रेतायुग आणि सत्ययुगाची वर्णने आली आहेत. (Top Marathi News)
==============
हे देखील वाचा : Lord Shiva : महादेवाचे वाहन असणाऱ्या नंदीबद्दल रंजक माहिती
Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===============
भगवान वराह यांचे देशात मोजकेच मंदिर असून त्यापैकी मथुरेत एक प्राचीन मंदिर आहे. वराह जयंतीच्या दिवशी याठिकाणी उत्सव साजरा केला जातो. तिरुमला येथे आणखी एक मंदिर आहे. त्याचे नाव भू-वराह स्वामी मंदिर आहे. जेथे वराह स्वामींच्या मूर्तीला या दिवशी पवित्र स्नान केले जाते. तूप, लोणी, मध, दूध आणि नारळाच्या पाण्याने अभिषेक आणि स्नान केले जाते. मान्यतेनुसार वराहाची उपासना केल्याने आरोग्य, सुख, शांती, संपत्ती आणि सर्व प्रकारची कल्याणकारी कामे होतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics