श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे.खरंतर श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित केलेला असतो. संपूर्ण महिन्यात शिवभक्त सकाळ ते रात्री पर्यंत पूजा-अर्चना करण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. खासकरुन श्रावण महिन्यात शंकराच्या मंदिरात खुप भाविकांची गर्दी होते. श्रावणी शनिवार आणि सोमवार हा फार महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपवास केले जातात. तर श्रावणातील उपवासाचे फळं आयुष्यात नक्कीच मिळते असे मानले जाते. तर भारतात शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांच्या कथा या रहस्यमी आहेत. अशातच भारतात असे ही एक शंकराचे मंदिर आहे त्याबद्दल असे म्हटले जाते की, मंदिरांच्या दगडांवर वाजवल्यास त्यामधून डमरुचा आवाज येतो. (Lord Shiv Temple)
ज्या मंदिराबद्दल आपण बोलत आहोत ते मंदिर एखाद्या राज्यात नव्हे तर हिमाचल प्रदेशात आहेत. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या चमत्कारी मंदिराचे नाव ‘जलोटी शिव मंदिर’ असे आहे. दक्षिण द्रविड शैली असलेले हे मंदिर एखाद्या चमत्कारिक मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराची निर्मिती कला ही एक अद्वितीय नमुना मानला जातो.
सोलन मध्ये असलेले हे जलोटी शिवमंदिर एशियातील सर्वाधिक उंच शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. डोंगरांवर असलेल्या या मंदिराची उंची जवळजवळ १११ फूट आहे. काही लोकांचे असे मानणे आहे की, या अद्भूत मंदिराच्या निर्मितीसाठी पाच ते दहा वर्ष नव्हे तर तब्बल ३९ वर्ष लागली होती.
जलोटी मंदिराबद्दलची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, भगवान शंकर येथे आले होते. त्यांनी येथे काही काळ विश्राम ही केला होता. त्यानंतर स्वामी कृष्णानंद परमहंस नावाचे एक बाबा येथे आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची निर्मिती सुरु झाली होती.
या मंदिरातून डमरुचा आवाज येतो असे ही म्हटले जाते. खरंतर काही लोक असे ही मानतात की, दगडांना स्पर्श जरी केला तरीही यामधून डमरुचा आवाज येऊ लागतो. मंदिराच्या या रहस्यमयी कथेमुळे प्रतिदिन हजारो भाविक दर्शनासाठी येतात. खासकरुन श्रावण महिन्यात येथे लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. (Lord Shiv Temple)
हेही वाचा- सात जन्माच्या पापांपासून मुक्त करणारी सुरकंदा देवी
जलोटी शिव मंदिराला भेट देणे अगदी सोप्पे आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यांमधून सोलनसाठी बस सुद्धा असतात. दिल्ली कश्मीर गेट येथून हिमाचल रोडवेज बस सुद्धा आहे. सर्वात जवळ शिमला विमानतळ सुद्धा आहे. तुम्ही येथून कॅब किंवा टॅक्सीने सुद्धा प्रवास करु शकता.