हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी आढाष महिन्याच्या द्वितीय तिथीला भगवान जगन्नाथ (Lord jagannath) यांची रथ यात्रा काढण्यास सुरुवात केली जाते. ओडिशामधील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरातून तीन सजवलेले रथ निघतात. त्यामध्ये भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रा यांचा सुद्धा रथ असतो. या भव्य दिव्य यात्रेत देश-विदेशातील लोक सहभागी होतात. जगन्नाथ मंदिरासंदर्भात काही रहस्य आहेत त्याबद्दल लोक वेळोवेळी ऐकतात. त्यापैकीच एक असलेले रहस्य म्हणजे भगवान जगन्नाथ यांची मुर्ती बदलताना पंडितांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. परंतु असे का केले जात असावे याबद्दलचेच पौराणिक कारण आपण येथे पाहूयात.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान कृष्ण यांचा जन्म मानव रुपात झाला बोता. त्यामुळेच एका मानवाचा जन्म झाला म्हणजे मृत्यू सुद्धा होणार. अशातच भगवान श्रीकृष्ण यांचा मृत्यू झाल्याने पांडवांनी विधिवत पद्धतीने त्यांचे अंतिमसंस्कार केले होते. परंतु त्यावेळी चमत्कार झाला. श्रीकृष्णाचे संपूर्ण शरिर हे पंचतत्वात विलिन झाले. परंतु तरीही त्यांच्या हृदयाचे ठोके सुरुच होते. असे मानले जाते की, हेच हृदय आज ही जगन्नाथ यांच्या मुर्तीत आहे.
हे देखील वाचा- मैनपुरी गावात सापडली भगवान श्रीकृष्णाच्या काळातील ‘शस्त्रे’…
याचसोबत श्रीकृष्ण यांच्या हृदयाला ब्रह्म पदार्थ असे म्हटले जाते. अशातच परंपरेनुसार प्रत्येक १२ वर्षात जगन्नाथ (Lord jagannath) यांची मुर्ती बदलली जाते. तेव्हा खुप नियमांचे पालन केले जाते. अशातच तो ब्रह्म पदार्थ नव्या मुर्तीत लावला जातो. नव्या मुर्तीत ब्रह्म पदार्थ लावतेवेळी आजूबाजूच्या परिसरात काळोख केला जातो. त्याचसोबत जे पंडित हे कार्य करतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी सुद्धा बांधली जाते. असे मानले जाते की, यावेळी जर पंडिताने ब्रह्म पदार्थ पाहिला तर त्याचा मृत्यू आवश्य होते. या अनुष्ठानला नव कलेवर नावाने ओळखले जाते.
काय आहे नव कलेवर अनुष्ठान?
नव कलेवर अनुष्ठान मध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या जुन्या मुर्ती काढून नव्या ठेवल्या जातात. या अनुष्ठानचे आयोजन फक्त अधिक महिन्यातच होते. हा संयोग १२ किंवा १९ वर्षातून एकदा येतो.
उडीसा मधील ज्या शहरातून भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा काढली जाते त्याला श्रीजगन्नाथ पुरी, पुरुषोत्तम पुरी, शंख क्षेत्र, श्रीक्षेत्र नावाने ओळखले जाते. जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला गुण्डीचा यात्रा, पतितपावन यात्रा, जनकपुरी यात्रा, घोषयात्रा, नवदिवसीय यात्रा आणि दशावतार यात्रा अशा विविध नावाने ओळखले जाते. आणखी महत्वाचे म्हणजे या यात्रेत सहभागी झाल्यास आयुष्यातील सर्व दु:ख कष्ट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते. त्याचसोबत जे भक्त भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेतील रथ ओढतात त्यांना १०० यज्ञांऐवढे पुण्य मिळते.