ज्योतिषनुसार हनुमानाला शेंदूर लावणे फार महत्वपूर्ण असल्याचे सांगितले जाते. अशी मान्यता आहे की, हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर लावल्याने भक्तांसह सर्वांच्या इच्छा-मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या भक्तीचे त्यांना फळं मिळते. सर्वसामान्यपणे लोक पूजेसह हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर लावून आपल्या इच्छा त्याच्या समोर व्यक्त करतात. मात्र जेव्हा हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर लावले जाते तेव्हा काही जणांना असा प्रश्न पडतो की, यामागे नक्की काय कारणं असावे. तर याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Lord Hanuman)
हनुमानाला का प्रिय आहे केशरी शेंदूर
पौराणिक कथेनुसार, लंकेतून परतल्यानंतर एक दिवस जेव्हा माता सीता आपल्या भांगात सिंदूर लावत होत्या तेव्हा हनुमानाने त्यांना त्याचे कारण विचारले. याचे उत्तर देत सीतेने असे म्हटले होते की, प्रभू श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी भांगात सिंदूर लावत आहे.
सीतेचे हे बोलणे ऐकून हनुमानाने विचार केला की, जर थोडेसे जरी सिंदूर लावल्याने प्रभू श्रीरामांना ऐवढा लाभ होतो तर संपूर्ण शरिरावर सिंदूर लावल्याने ते अमर होतील. त्याच दिवसापासून त्यांनी आपल्या शरिराला शेंदूराचा लेप लावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा ही प्रचलित झाली.

केशरी रंगाचे शेंदूर का अर्पण केले जाते?
शेंदूर हे मुख्यत्वे दोन रंगाचे असतात. एक लाल आणि दुसरा नारंगी. अशी मानत्या आहे की, हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर लावावे. खरंतर लाल सिंदूर हे श्रृंगार आणि विवाहाचे प्रतीक मानले जाते. तर केशरी रंगाचे शेंदूर समर्पण दर्शवते. खरंतर हनुमान हे ब्रम्हचारी असून त्यांना लाल नव्हे तर केशरी रंगाचे शेंदूर लावण्याचा सल्ला दिला जातो.
हनुमानाला शेंदूर अर्पण करण्याचे फायदे
मान्यता अशी आहे की, हनुमानाला लाल सिंदूर लावल्याने वैवाहिक आयुष्यात सुख, सौभाग्य आणि विवाह लवकर होतो. मात्र त्यांच्या शरिरावर केशरी रंगाचे शेंदूर लावल्याने आधात्म्याची प्राप्ती होते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. (Lord Hanuman)
हे देखील वाचा- वर्षातील १२ संक्रांतींपैकी मकर संक्रात का असते खास?
ऐवढेच नव्हे तर केशरी शेंदूरचा लेप लावल्याने सर्व प्रकारची भीती आणि रोगापासून मुक्ती मिळते. ज्योतिषनुसार, हनुमानाला अर्पण करण्यात आलेला शेंदूर हा घरी जरुर लावला पाहिजे. त्याचसोबत आपण ही लावला पाहिजे. यामुळे नशीब तुमची साथ देते.