Home » Longest Flights : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब आणि वेळ खाऊ विमान प्रवास

Longest Flights : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब आणि वेळ खाऊ विमान प्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Longest Flights
Share

आपल्या सर्वांनाच प्रवास करायला खूपच आवडते. अनेकांना तर प्रवासाचे जणू व्यसनच असते. प्रवास करण्यासाठी आपण सामान्य लोकं कार, रेल्वे, बस आदी साधनांचा वापर करतात. मात्र आता तसे पाहिले तर विमान प्रवास देखील खूपच सामान्य झाला आहे. अनेकदा मध्यमवर्गीय लोकं देखील सर्रास विमानाने प्रवास करतात. परंतु आजही अनेकांसाठी विमान प्रवास स्वप्नच आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचे वेगवान साधन म्हणजे विमान. खूपच कमी वेळात आपण विमानाने प्रवास करत वेळेची बचत करू शकतो. (Travelling)

देशांतर्गत विमान प्रवास जास्तीत जास्त २/३ तासांचा असतो. ज्यामुळे अनेकदा विविध कामांसाठी लोकं विमान प्रवास करून दुसरे शहर गाठतात आणि आपले काम करून पुन्हा त्याच दिवशी घरी देखील येतात. मात्र ते देखील लोकं आहेत ज्यांना विमानात जास्त काळ राहून हा प्रवास एन्जॉय करायचा. या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असतो. (Longest Flights)

विमानाने प्रवास जरी खूपच सोपा आणि वेळेची बचत करणारा असला, तरी हा प्रवास देखील कंटाळवाणा ठरू शकतो. जर तुम्हाला कोणी सांगितले की, आकाशात उडणाऱ्या विमानामध्ये तुम्हाला १२ तासांपेक्षा जास्त वेळ बसायचे असल्यास तुम्हला आवडेल का? तर जवळपास सर्वच लोकांचे उत्तर ‘नाही’ असेल. केवळ ढग बघत कोण आपला १२ तासांपेक्षा जास्त वेळ घालवण्यात इंटरेस्टेड असेल? मग अशी कोणती ठिकाणं आहेत, जिथे विमानाने प्रवास करून देखील सर्वात जास्त तास लागतात? चला जाणून घेऊया जगातील सर्वात लांब विमान प्रवास कोणता आहे. (Latest Marathi News)

Longest Flights

* सिंगापूरहून न्यूयॉर्कसाठी प्रवास करणाऱ्या विमानाला जवळपास १५,३४४ किलोमीटर (९,५३४ मील) चे अंतर पार करत जावे लागते. या प्रवासासाठी जवळपास १८ तास ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. (Trending News)

* पर्थवरून लंडनला जाण्यासाठी जेव्हा तुम्ही निघत तेव्हा ते विमान जवळपास १४,४९८ किलोमीटर म्हणजेच ९००९ मील इतका दूरचा प्रवास करते आणि हा प्रवास करण्यासाठी तब्बल १७ तास २० मिनिंटांचा कालावधी लागतो. (Social News)

* ऑकलॅंड ते दोहामधील अंतर विमानातून जवळपास ९०३२ मील, म्हणजेच १४,५३५ किलोमीटर आहे. एवढा मोठा आणि लांबचा प्रवास पार करण्यासाठी विमानाला जवळपास १७ तास ४० मिनिटांचा कालावधी लागतो.(Marathi Top News)

=======

हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !

Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

* ऑकलॅंडवरून दुबईला जाण्यासाठी जवळपास १४,१९३ किलोमीटर म्हणजेच ८,८२४ मील इतकं अंतर पार करावं लागतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानाला जवळपास १७ तास आणि ५ मिनिटांचा कालावधी लागतो. (Top Stories)

* लॉस एंजिल्स ते सिंगापूर हे अंतर ८,७,७० मील म्हणजेच १४,११५ किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे विमानाला हा लांबचा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास १७ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो.(Latest Top Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.