आजच्या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. यापूर्वी जॉइंट फॅमिलीची कॉन्सेप्ट फॉलो केली जायची. पण आता प्रत्येकाला सेपरेट रहायचे असते. याचाच परिणाम कुठे ना कुठेतरी मुलांच्या आयुष्यावर पडतो याबद्दल बहुतांश पालक अज्ञात असतात. त्याचसोबत मुलांची मानसिकता सध्या का बिघडली जातेय याचेही कारण पालकांना कळत नाही. काही वेळेस ज्ञात-अज्ञातपणे मुलांकडे लक्ष न देणे महागात पडू शकते. (Loneliness in child)
ऐकटेपणाची लक्षणे
एकटे पडलेले मुलं स्वत:ला एका ठिकाणी कोंडून घेतात. त्यांना एकांत आवडतो आणि असे करणे त्यांना सुरक्षित वाटते. ते बाहुतांशवेळा बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यांना एखादा व्यक्ती जरी आला तरीही आवडत नाही. काही वेळेस ते खुपच शांत राहतात. ऐवढेच नव्हे तर मित्रांसोबत जाणेही टाळतात.
एकटेपणाची कारणे
सर्वसामान्यपणे मुलांची दुसऱ्या मुलांसोबत तुलना कधीच करू नये. असे केल्याने मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. त्यांना आतमधल्या आतमध्ये स्वत: बद्दल हिन वाटू लागते. त्याचसोबत दुसऱ्या मित्रांमध्ये मिक्स होण्यासही ते घाबरतात. त्यांना नेहमीच एकटे राहणे आवडते.
हेल्थच्या कारणास्तव
काही वेळेस थायरॉइड, लठ्ठपणा, थकवा आणि ब्लड प्रेशर सारख्या समस्येमुळे मुल दुसऱ्या मुलांसोबत मिक्स होण्यापासून दूर राहतो. काही मुलं दुसऱ्यांपेक्षा आपण वेगळे आहोत असे मानून एकटे राहतो. यामुळे काही मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
सतत बदलांशी जुळवून घेणे
वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास जाणे. शाळा असो किंवा घर अथवा पालकांच्या नोकरीच्या बदलत्या ठिकाणामुळे मुलं सामाजिक संबंधत व्यवस्थितीत प्रस्थापित करू शकत नाही. यामुळे त्याला अशा प्रकारच्या बदलावामुळे एकटे राहणे आवडू लागते. (Loneliness in child)
एकटेपणाचा प्रभाव
-एकटेपणामुळे तणाव, स्ट्रेस आणि डिप्रेशनची समस्या होऊ शकते. मुलांमधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढू लागते.
-मुलांमधील एकटेपणाची कारणे वेळीच पालकांनी जाणून घेतली तर या स्थितीतून ते मुलांना बाहेर काढू शकतात.
-यासाठी पालकांनी त्याच्या आवडीचे छंद, कला, क्रिडा यामध्ये त्याला पाठवावे. नव्या मित्रमैत्रीणींशी मैत्री करण्यास सांगावे.
-मुलांना कधीच एकटे वाटणार नाही अशा काही गोष्टी करावे. मुलाला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून ठेवावे.
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवावे. कारण याच्या माध्यमातून सायबर बुलिंग आणि अन्य काही कारणास्तव मुलांमध्ये एकटेपणा वाढू शकतो. त्यामुळे पालकांनी याची काळजी घ्यावी.
हेही वाचा-पालकांच्या भांडणांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होईल परिणाम