स्वातंत्र्य चळवळ म्हटलं की, त्याबद्दल सतत जाणून घ्यावं असं वाटत राहतं. ‘युद्धस्य कथा रम्या:’ असं म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. जगभरात जी स्वातंत्र्य युद्धं झाली त्याबद्दल अभ्यासकांना नेहमीच आकर्षण वाटत आलंय. संशोधन, अभ्यास यामुळे नवनवीन गोष्टी समोर येत असतात. त्यातही हिंदुस्थानचं स्वातंत्र्य युद्ध हे एक मोठं स्वातंत्र्य युद्ध आहेत. ज्यामध्ये असंख्य आहुती पडल्या. या सगळ्यात महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचं, क्रांतीकारकांचं योगदान मोठं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे ‘लोकमान्य टिळक’.(Lokmanya Tilak)
लोकमान्य टिळकांचा उल्लेख ‘Father of Indian unrest’ म्हणजेच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असा केला जातो. त्यांनी संपूर्ण देशात इंग्रजांविषयी, त्यांच्या शोषणाविषयी जागृती निर्माण केली आणि स्वातंत्र्य युद्धासाठी सामान्य जनतेमध्ये उत्साह भरला. जनतेला वैचारिकरित्या सबळ बनवण्यासाठी तयार केलं. पण असं असलं तरी तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लोकमान्य टिळकांना राजकीय पुढारी बनायचं नव्हतं.
लोकमान्यांना राजकीय पुढारी व्हायचं नव्हतं म्हणजे तसं त्यांनी आधीपासून ठरवलं नव्हतं. ही माहिती त्यांनी परदेशात असताना एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी दिली होती. लोकमान्य टिळक परदेशात असताना त्यांची मुलाखत ‘ब्रिटन अँड इंडिया’ नावाच्या एका साप्ताहिकाच्या प्रतिनिधीने घेतली होती. लोकमान्यांची त्याकाळातील मुलाखत वाचणं हे आजच्या काळातही औत्सुक्याचा विषय आहे. तर त्याकाळात लोकमान्यांची मुलाखत ही किती महत्त्वाची असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.(Lokmanya Tilak)
या मुलाखतीवेळी विविध प्रश्नांवर बोलणं झाल्यानंतर लोकमान्यांनी सहज बोलता – बोलता सांगितलं, ”वस्तुत: माझ्या मनामध्ये ज्ञानदान हेच माझ्या आयु्ष्याचे ध्येय ठरवावे असा उद्देश होता आणि त्याप्रमाणे मी आयुष्याच्या सुरुवातीस शिक्षणाच्या कार्यात पडलों. जु्न्या-नव्या ध्येयाचे शिक्षण जनतेस द्यावे हा माझा हेतू होता. लोकांना खऱ्या राष्ट्रीय शिक्षणाची तीव्र आवश्यकता आहे असे 1880 साली माझ्या मनाला पटले होते. राजकीय पुढारी व्हावे असा माझा उद्देश त्यावेळी मुळीच नव्हता. 1882 सालच्या एज्युकेशन कमिशनपुढे मी माझे शिक्षणविषयक विचार मांडले असून ते त्या कमिशनच्या अहवालात नमूद आहेत.” अशी माहिती त्यांनी या मुलाखतकाराला दिली होती.
लोकमान्यांच्या जीवनात शिक्षणाला किती महत्त्व होते आणि हिंदुस्थानच्या भविष्यासाठी शिक्षणाची पद्धत, स्तर सुधारणे किती आवश्यक होते याबद्दल त्यांच्या मनात किती स्पष्टता होती हे यावरून दिसून येतं. केवळ जुने शिक्षण द्यावे अशा मताचे ते बिलकूल नव्हते हे ही यावरून स्पष्ट होतं. जुन्या नव्या शिक्षणाचा संगम ते साधण्याचा ते प्रयत्न करत होते.(Lokmanya Tilak)
====
हे देखील वाचा – ‘मिसाइल मॅन’ला अनोखा सलाम, डॉ. कलाम यांच्या जीवनावर संस्कृत भाषेत महाकाव्य
====
टिळक हे शाळेत गणित, संस्कृत, पदार्थविज्ञानआदि शास्त्रे शिकवत होते, अशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. ते शिकवत असलेले विषय लक्षात घेतल्यावर ते किती विषयांत पारंगत होते याचा अंदाज बांधता येतो.(Lokmanya Tilak)
शिक्षण हे राजाश्रित नसावे, ही वैदिक विचारधारेची मान्यता आहे. राजाश्रित शिक्षणातून गुलामी येते, स्वतंत्र बुद्धीमत्ता तयार होत नाही. त्यामुळे ‘सा विद्या या विमुक्तये’ अशी आपली मान्यता होती. लोकमान्य देखील राजाश्रित म्हणजेच सरकारच्या मताप्रमाणे त्यांच्या वित्तावर चालणाऱ्या शिक्षणाच्या ठाम विरोधात होते. याच मुद्यावरून त्यांचे शाळेतील इतर सहकाऱ्यांशी मतभेद झाले. शाळेसाठी सरकारी ग्रँट वरून त्यांचे आणि सहकाऱ्यांचे मत जुळले नाही. सरकारी ग्रँट घेऊ नये अशा आपल्या मतावर लोकमान्य अगदी ठाम होते. अखेर 1890 मध्ये त्यांनी शाळा सोडली.
लोकमान्य मुलाखतकाराला म्हणाले होते की, “माझी शाळा सरकारच्या ताब्यात गेली. त्यामुळे ज्या ध्येयासाठी शाळा अस्तित्त्वात आली होती ते मागे पडून देशाचे नुकसान झाले.” त्यांच्या या वचनानंतर त्यांना आपल्या शिक्षण पद्धतीवर किती जबरदस्त विश्वास होता हे स्पष्ट होतं.
लोकमान्यांचे विचार प्रखर होते आणि त्यामागे त्यांची ज्ञानसाधना हे मुख्य कारण होतं. त्यांच्या या ज्ञानाचाच परिणाम आपलाल्या त्यांच्या पुढील देशसेवेच्या कार्यातून, त्यांच्या विविध ग्रंथांच्या लिखाणातून आपल्याला अनुभवायला मिळतो. यावर अधिक गंभीरपणे विचार व्हावा आणि हे प्रयोग प्रत्यक्षात यायला हवेत. लोकमान्यांच्या या तत्त्वांवर आपला देश चालू लागला, तर त्यांच्या स्वप्नातील शिक्षण व्यवस्था आणि त्यातून देशाचा विकास होईल, यात काही शंकाच नाही.(Lokmanya Tilak)