Home » लोकमान्य टिळक पुरस्कार नक्की काय आहे? का आणि कधी झाली याची सुरुवात?

लोकमान्य टिळक पुरस्कार नक्की काय आहे? का आणि कधी झाली याची सुरुवात?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

by Team Gajawaja
0 comment
lokmanya tilak award
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. येथे त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आयोजकांनी या पुरस्काराबद्दल आधीच सांगितले होते की, हा पुरस्कार त्यांच्या सर्वौच्च नेतृत्वासाठी दिला जाणार आहे. मात्र तुम्हाला या पुरस्काराबद्दल अधिक माहतेय का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. (Lokmanya tilak award)

पीएम मोदी यांना दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट द्वारे करण्यात आली होती. हा प्रतिष्ठीत पुरस्कार ट्रस्ट द्वारे प्रत्येक वर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिला जातो. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे २० व्या शतकाताच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख व्यक्ती होते.

का दिला जातोय हा पुरस्कार?
बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वराज्याचे प्रबळ समर्थक होते आणि त्यांनी जनतेला संगठीत करण्यासाठी फार महत्त्वाचे योगदान दिले. ट्रस्ट असे म्हणते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अनन्यसाधारण नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

ट्रस्ट मध्ये कोण कोण आहेत?
संस्थेचे अध्यक्ष लोकमान्य यांचे पणतू दीपक टिळक आहेत. टिळक हे परंपरांगत रुपात काँग्रेस समर्थक होते. लोकमान्य यांना असे व्यक्ती मानले जाते की, ज्यांनी काँग्रेसला जनतेपर्यंत पोहचवले. दीपक टिळक यांचे वडिल जयंतराव टिळक, ज्यांनी हिंदू महासभेची सुरुवात केली होती. 1950 च्या दशकात ते काँग्रेसमध्ये गेले आणि राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष झाले. (Lokmanya tilak award)

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार हा भारताच्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ शास्रज्ञ टेसी थॉमस यांना दिला गेला होता. त्यांनी अग्नि-4 आणि अग्नि-5 क्षेपणस्र प्रणालींसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले होते आणि देशाच्या संरक्षण क्षमतेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

हेही वाचा- अमेरिका झाली मोदीमय

पीएम मोदी यांच्याआधी हा पुरस्कार माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. शंकर दयाल शर्मा आणि प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंह यांना दिला गेला होता. या व्यतिरिक्त प्रसिद्ध व्यावसायिक एन. आर. नारायणमुर्ती आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना पुरस्कार दिला गेला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.