अरुणाचल प्रदेशातील तवांग मध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर वातावरण तापले आहे. डोकलाम आणि गलवान नंतर ही तिसरी जागा आहे जेथे दोन्ही देशांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या झटापटीत दोघांचे सैनिक जखमी झाले आहेत. हिंसक झटापट झाली तरी ही गोळीबार करण्यात आलेला नाही. अखेर भारत आणि चीन मध्ये गोळीबार चालवण्यासाठी बंदी का घातली आहे? तसेच एलएसी आणि एलओसी मधील फरक नक्की काय? याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.(LoC & LAC)
काय आहे लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)
भारत आणि चीन मध्ये जी सीमा दोन्ही देशांना एकमेकांपासून विभक्त करते त्याला लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल असे म्हटले जाते. हे नाव सर्वात प्रथम १९९३ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानंतर समोर आले होते. दोन्ही देशांमध्ये सीमा रेषेसंदर्भात अद्याप कोणताही करार झालेला नाही. म्हणजेच कोणत्या देशाची सीमा कुठ पर्यंत आहे, यावरच आज ही वाद आहे. याच कारणास्तव दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये ५० ते १०० किमी असा एक परिसर आहे जेथे दोन्ही देशांचे सैन्य त्याची निगराणी करतात. भारत आणि चीन मध्ये ३४८८ किमी लांब बॉर्डर आहे. पण चीन त्याला केवळ २ हजार किमी असल्याचे मानतो.
काय आहे लाइन ऑफ कंट्रोल (LoC)
भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी रेषा दोन्ही देशांना जम्मू-कश्मीला एकमेकांपासून विभक्त करतात त्याला लाइन ऑफ कंट्रोल असे म्हटले जाते. त्याची लांबी जवळजवळ ७७६ किमी आहे. ही रेषा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या करारानंतर ठरवली गेली आहे. १९४७ मध्ये विभागणीनंतर ही रेषा अस्तित्वात आली होती. दरम्यान, १९७१ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झाले तेव्हा शिमला करारात यावर अधिकृतपणे उदयास आली. खरंतर एलओसी कोणतीही अधिकृत सीमा नाही. पण सैन्य नियंत्रणातील हा हिस्सा असा असतो डो वादाविदापासून दूर राहतो.
चीन-भारत सीमेवर गोळीबार का होत नाही?
भारत-चीन दरम्यान एलएसीवर शांतीचे वातावरण रहावे यासाठी काही करार केले गेले. यामधील पहिला करार १९९३ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर १९९६,२००५, २०१२ आणि २०१३ मध्ये सुद्धा करार झाले. १९६२ च्या युद्धानतर भारत आणि चीनच्या नात्यात कटुता आली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना तणाव कमी करण्यासाठी खुप प्रयत्न केले. १९८८ मध्ये त्यांनी चीनचा दौरा ही केला होता.मात्र त्यांच्या निधनानंतर काही काळापर्यंत चीनसोबतची बातचीत बंद झाली होती. पीवी नरसिम्हा राव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा चीन सोबतची बातचीत पुन्हा सुरु झाली. १९९३ मध्ये नरसिम्हा राव यांनी चीनचा दौरा केला. या दरम्यान पहिल्यांचा दोन्ही देशांमध्ये करार झाला. यामध्ये शांती कायम
टिकवून ठेवण्यावर जोर दिला गेला.(LoC & LAC)
हे देखील वाचा- सौदी अरेबिया बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच इमारत बांधणार
करारात काय ठरवले गेले?
या करारात असे ठरवले गेले की, दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात सैन्याचा वापर करणार नाही. त्याचसोबत जर एखाद्याने देशाच्या सैनिकाने चुकून एसएसी पार केल्यास तर दुसरा देश त्यांना सांगेल आणि ते सैनिक लपगेच आपल्या येथे परतेल. या करारत असे ही ठरवले गेले की, तणाव वाढल्यास दोन्ही देश एलएसीवर जाऊन स्थितीची आढावा घेतील आणि बातचीत करुन त्यावर तोडगा काढतील.