जेव्हा कधी आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज भासते तेव्हा आपल्याकडे सर्वात प्रथम ऑप्शन कोणते उपलब्ध आहेत हे पाहतो. अशातच जर बँकेत एफडी असेल तर ती मोडण्याचा विचार आपण करतो. परंतु तुम्हाला माहितेय का, एफडी मोडल्यानंतर तुमचे किती नुकसान होऊ शकते? या स्थितीत तुम्हाला पर्सनल लोन महागात पडते. अशातच तुमच्याकडे ऑप्शन राहतो की, एफडीवर कर्ज घेणे. जर तुम्ही बँकेत एफडी केली असेल तर गरज भासल्यास त्यावर कर्ज घेऊ शकता. अशी सुविधा बँकेकडून उपलब्ध करुन दिली जाते. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Loan on FD)
तुम्हाला पैशांची गरज असेल तर एफडी मोडल्यास १ टक्के पेनल्टी
भरावी लागते. या व्यतिरिक्त काही बँका चार्जेस सुद्धा घेतात. एफडी मोडल्याने त्याचे व्याजदर प्रभावित होतात. तुम्हाला निश्चित दरापेक्षा कमी व्याज मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन वर्षांसाठी एफडी केली आहे. त्यावर तुम्हाला ७ टक्के दराने व्याज दिले जात आहे. अशातच असे होऊ शकते की, बँक १ वर्षात एफडीवर ६.५ टक्के व्याज देत असेल. तर ती मोडल्यानंतर तुम्हाला केवळ ५.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. अशाप्रकारे वेळेआधीच एफडी मोडल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Loan on FD
जर तुम्हाला एफडीच्या एकूम रक्कमेच्या २०-३० टक्के पैशांची गरज असेल तर एफडी बिलकुल मोडू नका. जर तुमची एफडी तयार करून सहा महिने किंवा अधिक काळ झाला तर ती मोडण्याची चूक करू नका. त्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. जर तुमच्या एफडीला काही महिने झाले असतील तर आपत्कालीन स्थितीत तुम्ही ती मोडण्याचा निर्णय घेऊ शकता. असे तेव्हाच करावे जेव्हा तुमच्याकडे कोणता दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. (Loan on FD)

Loan on FD
हेही वाचा- सिनेमासंदर्भातील कठोर बिल संसदेत पास, असे केल्यास होणार 3 वर्षांची शिक्षा
तुम्हाला एफडीवर कर्ज घेतल्यास ते पर्सनल लोनपेक्षा स्वस्त पडते. जर तुम्हाला एफडीवर सात टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला त्यामधून १.५ ते २ टक्के व्याज अधिक मिळेल. दरम्यान, हे थोडं महाग वाटू शकते. परंतु तुमची बचत सुरक्षित राहू शकते आणि मेच्योरिटी पर्यंत जारी राहील. अशा प्रकारे तुम्हाला एक कर्ज तर भरावेच लागेल. मात्र सिक्युरिटीच्या रुपात तुमची एफडी सुरक्षित राहील जी भविष्यात तुमच्या कामी येऊ शकते.