Home » Loan Guarantor : लोन गॅरंटर होण्यापूर्वी जाणून घ्या हे ५ मोठे धोके; नाहीतर होईल आयुष्यभर पश्चात्ताप!

Loan Guarantor : लोन गॅरंटर होण्यापूर्वी जाणून घ्या हे ५ मोठे धोके; नाहीतर होईल आयुष्यभर पश्चात्ताप!

by Team Gajawaja
0 comment
Loan Guarantor
Share

Loan Guarantor: आजच्या काळात कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. घर, वाहन, शिक्षण किंवा व्यवसायासाठी अनेक जण बँकेकडून लोन घेतात. मात्र लोन मिळवण्यासाठी कधी कधी बँका गॅरंटरची (हमीदार) मागणी करतात. मित्र, नातेवाईक किंवा सहकारी यांच्या आग्रहाखातर आपण हमीदार होतो, पण त्यामागील जोखीम समजून घेत नाही. लक्षात ठेवा, एकदा तुम्ही कोणाचं गॅरंटर झालात की त्या व्यक्तीच्या कर्जाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येते. त्यामुळे गॅरंटर होण्यापूर्वी या पाच मोठ्या धोक्यांची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

कर्ज न फेडल्यास जबाबदारी तुमच्यावरही येते: जर कर्ज घेणारा व्यक्ती वेळेत हप्ता फेडू शकला नाही, तर बँक थेट गॅरंटरकडे वळते. म्हणजेच त्याने घेतलेले लोन फेडण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. यामुळे तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडू शकते. बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या खात्यातून थेट रक्कम वसूल करण्याची कारवाईही करू शकते. (Loan Guarantor)

Loan Guarantor

Loan Guarantor

 क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम: अनेकांना वाटते की गॅरंटर होणं म्हणजे फक्त नावापुरती हमी देणं, पण प्रत्यक्षात तुमच्या CIBIL स्कोरवर त्याचा थेट परिणाम होतो. जर मुख्य कर्जदाराने हप्ता वेळेत न भरला, तर त्या नोंदीत तुमचे नावही जोडले जाते आणि तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो. पुढे तुम्ही स्वतः लोन घेण्याचा प्रयत्न केल्यास, बँक तुम्हाला “high-risk borrower” म्हणून पाहू शकते.

Loan Guarantor

Loan Guarantor

कायदेशीर अडचणी आणि मालमत्तेचा धोका:  जर कर्जदाराने मोठी रक्कम थकवली, तर बँक कायदेशीर मार्गाने वसुली प्रक्रिया सुरू करते. यात गॅरंटरलाही नोटीस मिळू शकते. काही प्रकरणांमध्ये गॅरंटरची मालमत्ता किंवा बँक खाते जप्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅरंटर होण्यापूर्वी कर्जदाराची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि त्याची विश्वासार्हता नीट तपासणे गरजेचे आहे. (Loan Guarantor)

नातेसंबंधांवर परिणाम: अनेक वेळा आर्थिक व्यवहारांमुळे नातेसंबंधात कटुता येते. जर कर्जदाराने पैसे न भरल्याने बँक तुमच्यावर कारवाई केली, तर तणाव, वाद आणि राग निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही भावनिक कारणामुळे गॅरंटर होऊ नका. आधी सर्व कागदपत्रे नीट वाचा, अटी समजून घ्या आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवा.

==================

हे देखील वाचा :

Cyber Crime : सायबर फसवणुकीवर येणार निर्बंध? सरकारची नवे नियम आणण्याची तयारी; काय बदलणार तुमच्या सुरक्षेत?                                    

Honey Trap : रशियन हनी ट्रॅपच्या जाळ्यात अमेरिका !                                    

Panic Attack : गर्दीत एखाद्याला पॅनिक अटॅक आल्यास काय करावे? वाचा उपाय                                    

===================

 गॅरंटर म्हणून तुमच्या आर्थिक मर्यादा घटतात: जेव्हा तुम्ही कोणाचं लोन गॅरंटी देता, तेव्हा ती जबाबदारी तुमच्या स्वतःच्या आर्थिक प्रोफाइलमध्येही नोंदवली जाते. म्हणजेच, तुम्हाला स्वतःला पुढे कुठलेही मोठे लोन हवे असल्यास, बँक विचार करते की तुमच्याकडे आधीपासून एक अप्रत्यक्ष जबाबदारी आहे. त्यामुळे तुमच्या क्रेडिट लिमिटवर मर्यादा येऊ शकते. लोन गॅरंटर होणं ही फक्त औपचारिकता नाही, तर एक मोठी आर्थिक जबाबदारी आहे. म्हणूनच कोणाच्याही विश्वासात येऊन हमीदार होण्यापूर्वी विचार करा. कर्जदाराची पात्रता, परतफेडीची क्षमता आणि तुमच्या स्वतःच्या जोखमीचा अंदाज घ्या. लक्षात ठेवा हमीदार होण्यापूर्वी विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप करा. (Loan Guarantor)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.