काहीवेळेस असे होते की, कर्ज घेताना एखाद्याला साक्षीदार व्हावे लागते. परंतु तुम्ही एखाद्याचे साक्षीदार होता किंवा समोरच्या व्यक्तीला बनवता. कर्ज घेताना साक्षीदार असणे अनिवार्य असते. आता असा प्रश्न निर्माण होतो की, आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी तो कर्ज घेत असेल तर साक्षीदार व्हावे की नाही. पण मुख्य प्रश्न असा की, कर्ज घेताना साक्षीदाराची गरज का भासते आणि यामुळे काय धोका उद्भवू शकतो.(Loan Guarantor)
खरंतर कोणतेही कर्ज देणारी संस्था किंवा बँक हे साक्षीदार मागतात. ही व्यक्ती अशा रुपात आपण सादर करतो तो आर्थिक संस्थांना आश्वासन देतो की, कर्जदाराने जर कर्ज फेडले नाही तर तो हे कर्ज फेडेल. म्हणजेच कर्जासाठी साक्षीदार म्हणून उभा राहिलेला व्यक्ती सुद्धा कर्जाच्या अर्जदाराप्रमाणे होते. कर्जाच्या अर्जावर त्याची सुद्धा स्वाक्षरी असते. खासकरुन आर्थिक संस्था कर्जासाठी साक्षीदार अशावेळी मागतात जेव्हा अर्जदाराचा क्रेडिट स्कोर हा कमी असल्याने त्याची कर्ज फेडण्याच्या क्षमतेबद्दल त्यांना विश्वास नसतो. या व्यतिरिक्त काही अर्जदार नोकरीच्या कारणास्तव आपले शहर वारंवार बदलत असतात. त्यांच्यावर जर कर्जाची रक्कम असेल तर त्या स्थितीत सुद्धा साक्षीदार हा बँकेला दाखवावा लागतो.
हे देखील वाचा- पॅन कार्डच्या माध्यमातून फुकटात कसा तपासून पहाल तुमचा CIBIL Score?

लोन गॅरंटरची भुमिका काय असते?
लोकन गॅरंटरची जबाबदारी ही एका कर्ज अर्जादारासारखीच असते. जर एखाद्या कारणास्तव अर्जदार कर्ज फेडू शकला नाही तर आर्थिक संस्था या साक्षीदाराकरुन कर्जाची रक्कम वसूल करु शकतात. मात्र त्यासाठी साक्षीदाराने नकार दिल्यास कर्ज देणाऱ्याला कोर्टात धाव घ्यावी लागू शकते. त्याचसोबत कोर्टाकडून लोन गॅरंटरला कर्ज भरण्यासाठी सांगितले जाऊ शकते.
संपत्तीचा लिलाव करण्याचा सुद्धा अधिकार
जर कर्जाचा अर्जदार कर्ज फेडण्यास अयशस्वी झाल्यास तर आर्थिक संस्था गॅरंटरला ते भरण्यास सांगतात. तर गॅरंटर सुद्धा कर्ज फेडू शकला नाही तर आर्थिक संस्थेकडे आपल्या पैशांसाटी त्यांची संपत्ती लिलाव करण्याचा अधिकार असतो. एखाद्याचा लोन गॅरंटर झाल्यानंतर त्याचा परिणाम क्रेडिट रिपोर्टवर दिसतो. म्हणजेच जर कर्जदाराने कर्ज न फेडल्यास याचे परिणाम साक्षीदाराला भोगावे लागतात.(Loan Guarantor)
कर्जासाठी गॅरंटर कोण होऊ शकतो?
गॅरंटरचे वय हे १८ वर्षापेक्षा अधिक असावे आणि तो तेथील रहिवाशी असावा ज्या ठिकाणी तुम्ही कर्जासाठी अर्ज केला आहे. गॅरंटरचा सुद्धा क्रेडिट स्कोर पाहिला जातो. परंतु कर्जदाराने कर्ज न फेडल्यास आपण पाहिले त्यानुसार संपत्ती जप्त केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त कर्जाची उशिराने कर्जदाराने परतफेड केल्यास गॅरंटरकडून अतिरिक्त व्याज किंवा पेनल्टी वसूल केली जाऊ शकते.