जर तुम्ही म्युचअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर याचा मोठा फायदा जरुर होतो. जर तुम्हाला अचानक एखाद्या कामासाठी पैशांची गरज भासली तर तुम्ही त्यामधून अगदी सहज पैसे काढू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे का, म्युचअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज ही घेऊ शकता. बहुतांश भारतीय हे प्रॉपर्टी, शेत जमीन, सोन किंवा वाहनासारख्या गोष्टींसाठी कर्ज घेतात. जसे की, डिजिटलकरण होत आहे तसे ग्राहकांना कर्ज घेणे सुद्धा अगदी सोप्पे झाले आहे. अशातच म्युचअल फंडाच्या माध्यमातून ते अगदी सहज मिळते. (Loan against Mutual Fund)
-ओव्हरड्राफ्टच्या सुविधेच्या रुपात
म्युचअल फंड युनिट्स ऐवजी तुम्ही कर्ज ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या माध्यमातून घेऊ शकता. क्रेडिटच्या रुपात घेतलेल्या रक्कमेवर व्याज लावले जाते. या प्रकरणी कर्जाची रक्कम काही प्रमाणात कर्जाच्या बदल्यात वापरल्या जाणाऱ्या म्युचअल फंड युनिट्सच्या वॅल्यूवर निर्भर करते.
-म्युचअल फंड युनिट्सच्या बदल्यात कर्ज
गुंतवणूकदार कोणत्याही बँक किंवा आर्थिक संस्थेतून होल्ड म्युचअल फंड युनिट्सच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज करु शकतात. कोणत्याही बँकेत किंवा एनबीएफसीला संपर्क करुन इक्विटी किंवा हायब्रिड म्युचअल फंडाच्या बदल्यात कर्ज मिळवले जाऊ शकते. जेव्हा म्युचअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज अगदी सहज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने मिळवू शकता.
-कर्जाची रक्कम आणि व्याज दर
गुंतवणूकदारांना मिळणारी कर्जाची रक्कम ही म्युचअल फंडच्या कॅटेरीवर आधारित असते. ज्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. सर्वसामान्यपणे नेट असेट वॅल्यू (NAV) च्या ५०-७० टक्के असते. ज्या व्याजाने कर्ज फेडावे लागते, तेथे सुद्दा उधारकर्ता आणि बँकेद्वारे सहमत प्रारंभिक नियम आणि अटींचे पालन करावे लागते. (Loan against Mutual Fund)
-व्याज दर
पर्सनल लोनच्या तुलनेत म्युचअल फंडाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावरील व्याजदर कमी असतो. म्युचअल फंडाच्या माध्यमातून जर तुम्ही कर्ज घेतले तर १०-१२ टक्क्यांनी व्याज द्यावे लागते. त्याचसोबत ०.५-०.७ टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी सुद्धा भरावी लागते.
हे देखील वाचा- सरकार महिन्याला देणार ३ हजार रुपयांची पेंन्शन, केवळ जमा करावे लागणार ५५ रुपये
–सर्वात महत्वाचे
जर तुम्ही म्युचअल फंडावर कर्ज घेतले आणि तुम्ही ते फेडू शकला नाहीत तर बँकेकडून तुमचे युनिट्स विक्री केले जाऊ शकतात. ज्यामुळे ते आपल्या कर्जाची भरपाई करु शकतील. जर अतिरिक्त पैसे राहिले तर तुम्हाला ते परत दिले जातात. म्युचअल फंडाची विक्री करण्यापूर्वी तुम्हाला बँकेची परवानगी घेणे आवश्यक असते.