नासाने आर्टेमिस-1 द्वारे आपलं चंद्र मिशन (Moon Mission) चालू केलं आहे. तीन प्रयत्नांनंतर आर्टेमिस-1 प्रक्षेपित करण्यात आले. या यशानंतर 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहण्यास आणि काम करण्यास सुरवात करेल, असा दावा नासातर्फे करण्यात आला आहे. नासासाठी ओरियन चंद्र अंतराळ यान कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे हॉवर्ड हू यांनी हा दावा केला आहे. माणसांना चंद्रावर पाठवण्यासाठी आम्ही तयारी करत असून येत्या काही वर्षात हे स्वप्न साकार होणार आहे. नासा फक्त माणसांना चंद्रावर पाठवण्यासाठी उत्सुक नसून,चंद्रावर मानवी वस्तीही करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. चंद्रावर राहून तिथे संशोधन करण्याचा नासाचा मानस आहे, आणि यासाठी नासानं तयारी सुरु केली आहे.
अमेरिका आपल्या चंद्र मिशन (Moon Mission) आर्टेमिस-1 द्वारे 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे.याचा पुढचा टप्पा म्हणजे अंतराळवीर 2024 च्या मिशनमध्ये चंद्रावर पाठवले जाणार आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मानव 2030 पर्यंत चंद्रावर राहण्यास आणि काम करण्यास सुरवात करणार आहे. चंद्रावर घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे असेल. हे स्वप्न सध्या नासा आपल्या आर्टेमिस-1 मिशन द्वारे पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आता फक्त चंद्रावर मानव पाठवण्याबाबत नासा विचार करत नसून, तिथे कायमस्वरुपी वस्ती कशी करता येईल, याबाबतही संशोधन सुरु आहे.

अमेरिकन स्पेस सेंटर नासाने नुकतेच मिशन मून (Moon Mission) कार्यक्रमांतर्गत आपले आर्टेमिस-1 रॉकेट प्रक्षेपित केले आहे. हे मिशन 2030 पर्यंत माणसाला चंद्रावर रहाण्यासाठी आणि तिथे संशोधन करण्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा नासानं केला आहे. नासासाठी ओरियन चंद्र अंतराळ यान कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे हॉवर्ड हू यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नासा ज्यांना चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवणार आहे, तिथे राहून ही मंडळी संशोधन करणार आहेत. त्यातून 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची जागा तयार होईल, असा अंदाज आहे. नासाच्या या मिशनसाठी चंद्राच्या पृष्ठभागावरील पाठवण्यात आलेले रोव्हर्स मानवाला मदत करणार आहे. मानवाला चंद्रावर राहता येईल अशी जागा आणि वातावरण निर्मिती हे त्यांचे प्रमुख लक्ष असणार आहे.

गेल्या आठवड्यातच नासाने आर्टेमिस-१ रॉकेट प्रक्षेपित केले आहे. ही संपूर्ण मोहीम 3 भागात असणार आहे. आर्टेमिस-1, आर्टेमिस-2 आणि आर्टेमिस-3 मध्ये त्याची विभागणी करण्यात येणार आहे. आर्टेमिस-1 च्या यशावर मानवाचे चंद्रावर पाऊल पुन्हा पडू शकते की नाही हे अवलंबून आहे.आर्टेमिस-१ कडून चंद्रावर कॅप्सूल उतरवण्याच्या क्षमतेची चाचणी करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सात संशोधकांना चंद्रावर पाठवले जाईल. सध्या आर्टेमिस-1 चे ओरियन चंद्राच्या कक्षेत वेगाने पुढे जात आहे. 2030 पर्यंत चालणारा हा सर्व प्रकल्प प्रचंड खर्चिक आहे. पण माणसाची वस्ती चंद्रावर करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी काहीही करण्याची नासाची तयारी आहे. भविष्यात चंद्रसफारी करण्याचाही नासाचा मानस आहे. हे सर्व आर्टेमिस-1 च्या यशावर अवलंबून आहे. (Moon Mission)
=======
हे देखील वाचा : आडनावाशिवाय ‘या’ देशात आता मिळणार नाही एन्ट्री, एअर इंडियाकडून अॅडवायजरी जारी
=======
आर्टेमिस-१ ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. आर्टेमिस-1, 42 दिवसांनी चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत पृथ्वीवर येणार आहे. 50 वर्षांपूर्वी अपोलो मोहिममधून अमेरिकेने चंद्रावर अंतराळवीरांना पाठवले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून ही आर्टेमिस-1 मोहीम असली तरी त्यासाठी नासाला 50 वर्षाचा काळ लागला हे लक्षात घ्यावे लागेल. अमेरिकेपाठोपाठ चीन, रशिया आणि भारतही चंद्रावर मानव पाठवण्याबाबत तयारी करत आहे. त्यामुळे अमेरिकेनं आर्टेमिस-1 मोहीम अतिशय प्रतिष्ठेची मानली होती. मात्र, पहिल्या दोन प्रयत्नात नासाला यश मिळाले नाही. दोन्हीवेळा आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नासानं मोहीम पुढे ढकलली होती. तिस-या प्रयत्नात या यानाला यश आले असून अंतराळयान प्रथम पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 4.50 लाख किमी प्रवास करेल. अर्थात मुख्य चंद्र मोहिमेसाठी ही एक चाचणी असणार आहे. चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे का आणि चंद्राला भेट दिल्यानंतर अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येऊ शकतात का हे या मोहिमेतून तपासण्यात येणार आहे. एकूण आर्टेमिस-1 पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या परत आल्यावर आर्टेमिस-2 यावर नासा काम सुरु करणार आहे. या मोहिमांच्या यशातूनच मानव चंद्रावर रहाण्याचे स्वप्न साकार करु शकणार आहे.
सई बने