टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या दीपिका कक्करला यकृताचा अर्थात लिव्हरचा स्टेज-२ कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आणि तिच्या कुटुंबाने याबद्दल सगळ्यांना माहिती दिली. दीपिका टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध चेहरा आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम करत आपली वेगळी ओळख तयार केली. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून तिला अफाट लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्ध असलेली दीपिका, सतत तिच्या रोजच्या आयुष्यातील माहिती तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. (Liver Cancer)
तिला मागील काही दिवसांपासून सतत पोट दुखीची समस्या होती. तिने त्यावर उपचार देखील केले मात्र तिला फरक पडला नाही. अखेर काही टेस्ट झाल्यानंतर तिला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. दीपिकाचा नवरा असलेल्या अभिनेता शोएब इब्राहीमने याबद्दल माहिती दिली आहे. मागच्यावर्षी मराठी अभिनेता असलेल्या अतुल परचुरेचे देखील याच लिव्हर कॅन्सरमुळे निधन झाले होते. सध्या कॅन्सर हा आजार खूपच बळावला अनेक अनेक कलाकार या आजाराला बळी पडताना दिसत आहे. (Marathi News)
लिव्हरचा कॅन्सर खूपच गंभीर आणि जीवघेणा देखील ठरू शकतो. यासाठी आपण काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. यकृताचा कर्करोग आणि यकृताचा ट्यूमर या दोन वेगवेगळ्या आजार आहेत. यकृताचा कॅन्सर हा एक कॅन्सर आहे जो खूप उशिरा आढळतो. रुग्ण डॉक्टरकडे येतो तोपर्यंत हा कर्करोग शेवटच्या टप्प्यात असतो. जाणून घेऊया याच आजाराबद्दल. (Top Stories)
लिव्हर कॅन्सर म्हणजे काय?
लिव्हर हा शरीरातील सगळ्यात मोठा आणि महत्वाचा अवयव आहे. या अवयवाचे कार्य बिघडले तर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. लिव्हर कॅन्सर हा यकृतातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा गंभीर आजार आहे. लिव्हरचे मुख्य काम काय असते तर, रक्तातील विषारी पदार्थ नष्ट करून पित्ताची निर्मिती करणे आणि पोषक तत्वांचे शोषण करणे. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टप्पे असतात. त्यातील हेपेटोसेल्युलर कॅरिसिनोमा हा सगळ्यात सामान्य आहे. (Top Marathi Headlines)
लिव्हर कॅन्सरची लक्षणं
वजन कमी होणे
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. सोबतच शरीरात अनेक बदल दिसायला सुरुवात होते. कोणत्याही कारणांशिवाय कमी झालेले वजन नेहमीच आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे वजन कमी झाल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर भूक सुद्धा कमी होते. अन्न पाहिल्यानंतर नॉशिया वाटणे. (Todays Marathi News)
पोटाच्या वरच्या भागात वेदना
आपण अनेकदा पोट दुखीकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र वारंवार पोटाच्या वरच्या भागात वाढलेल्या वेदनाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ल्या घेणे आवश्यक असते. पोटाच्या वरच्या भागात बऱ्याचदा ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यामुळे सुद्धा वेदना होऊ लागतात. मात्र या समस्येकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. (Latest Marathi News)
उलट्या मळमळ होणे
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर वारंवार उलट्या किंवा मळमळ होते. जेवण पचायला अधिकचा वेळ लागतो. त्यामुळे शरीरात लिव्हर कॅन्सरची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आराम मिळवावा. दुर्लक्ष केल्यास शरीराचे नुकसान होईल.
ओटीपोटात दुखणे
ओटीपोटामध्ये सतत दुखणे किंवा ओटी पोटावर सूज येणे या कॅन्सरचे एक लक्षणं होऊ शकते. महिलांमध्ये पाळी नसताना देखील सतत ओटीपोटात दुखणे जाणवत असेल आणि तिथे सूज येत असेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवा.
मल आणि मूत्राचा रंग बदलणे
यकृताचा कॅन्सर झाल्यास युरिनचा रंग अति पिवळा होणे आणि मलाचा राग पांढरा होणे, हे या कॅन्सरचे मुख्य लक्षण आहे.
कावीळ होणे
यकृताचा कॅन्सर होण्याचे मुख्य लक्षण म्हणजे कावीळ होणे. यात त्वचा, डोळे पिवळे पडतात. प्रत्येक कावीळ ही कॅन्सर नसते. मात्र कावीळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
लिव्हर कॅन्सरची कारणे
* हिपॅटायटीस बी आणि सी संसर्ग
* जास्त मद्यपान
* सिरोसिस
* फॅटी लिव्हर डिसीज
* विषारी पदार्थ
* अनुवांशिक घटक
========
हे देखील वाचा : Post Workout Tips : वर्कआउटनंतर मसल्स पेन होत असल्यास काय करावे?
Hair Cut Tips : चेहऱ्याच्या आकारानुसार असा करा हेअरकट, खुलेल लूक
========
लिव्हर कॅन्सर टाळण्यासाठी आहार
कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून स्वतःच बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ, फळे, भाज्यांचे सेवन करणे खूपच आवश्यक आहे. उत्तम आणि सकस आहार घेतल्यास कॅन्सर सारखे गंभीर आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. फळे भाज्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, यामुळे शरीराचे हानिकारक पेशींपासून नुकसान होत नाही. रोजच्या आहारात पनीर, दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. (Social News / Updates)
(टीप : हा लेख सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)