Home » Lions Guardians : मुलीला ७ जणांनी किडनॅप केलं वाचवायला आले ३ सिंह..

Lions Guardians : मुलीला ७ जणांनी किडनॅप केलं वाचवायला आले ३ सिंह..

by Team Gajawaja
0 comment
Lions as Guardians
Share

२००५ साली अशी एक घटना घडली की, ऐकून विश्वासच बसणार नाही. काही लोकांना ऐकताना ही काल्पनिक कहाणी वाटेल, नाही तर एखाद्या फिल्मची स्टोरी वाटेल, पण ही खरी गोष्ट आहे. युथोपिया देशात २००५ साली, एक १२ वर्षांची मुलगी आपल्या घरी यायला निघाली होती. ती चालत असताना ७ जणं तिच्या समोर अचानक येऊन उभे राहिले. ते तिचा रस्ता अडवून होते. त्यांनी तिला जबरदस्ती उचललं, एका गाडीत टाकलं आणि ती किडनॅप झाली. पण ती किडनॅप होण्यामागचा हेतु काय? तर एकाला त्या मुलीशी जबरदस्ती लग्न करायचं होतं. ती १२ वर्षांची मुलगी जिवाच्या आकांताने ओरडत होती. पण कोणी मदतीला यायच्या आधीच ती किडनॅप झाली होती. ही बातमी गावभर पसरली आणि त्या मुलीचा शोध सुरू झाला.

हा शोध तब्बल ६ दिवस चालला आणि सातव्या दिवशी ती सापडली. पण स्टोरीत इथे एक ट्विस्ट आला. ती जेव्हा सापडली तेव्हा तिच्या आजूबाजूला ते सातही किडनॅपर्स नव्हते, म्हणजे ती तिथे एकटी असायला हवी होती. बरोबर!.. तिला ज्या अवस्थेत पाहिलं, ते बघून सगळे घाबरले. असं चित्र कोणी कधीच बघितलं नव्हतं, ते दृश्य असं होतं, ती मुलगी सुखरूप तर होतीच, पण तिच्यासोबत ३ सिंह होते. तिने सिंहांंनी काय केलं ते सांगितलं, ते ऐकून सगळे शॉक झाले. आता ते ३ सिंह तिथे का होते? आणि तिने त्या तिन्ही सिंहांबद्दल नक्की काय सांगितलं? हे जाणून घेऊ. (Lions as Guardians)

ईस्ट आफ्रिकेतला युओपिया हा देश, हा देश तसा गरीब देश म्हणून ओळखला जातो. इथे ७२% गरीबी तर आहेच आणि मुलांची संख्या जर पाहिली, तर ती तिथल्या मुलींपेक्षा जास्त आहे. या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत, त्यातले २ प्रॉब्लेम्स म्हणजे बालविवाह आणि दूसरं म्हणजे जबरदस्तीने होणारं बालविवाह. इथे मुलींची ते वयात येण्याआधीच जबरदस्तीने लग्न लावलं जातं. या भागात एक ‘टेलिफा’ नावाची प्रथा चालते. (Top Stories)

Lions as Guardians

आता टेलिफा काय आहे? तर सोप्या शब्दात सांगायचं तर Forced Child Marriage, टेलिफा प्रथेत होतं असं की, एखादा पुरुष आणि त्याचे साथीदार एखाद्या मुलीचं अपहरण करतात, तिच्यावर शारीरिक आणि मानसिक दबाव आणतात आणि जबरदस्ती तिला लग्न करायला भाग पाडतात आणि कधी कधी तर त्या मुलीवर रेप सुद्धा होतो. असंच काहीसं त्या मुलीबाबतीत झालं होतं. पोलिसांनी आणि इतर गावकऱ्यांनी तिला पाहिलं तेव्हा तीन सिंह तिच्या बाजूला होते. आता ते सिंह असताना ते तिच्याजवळ जाऊ शकत नव्हते. त्यांनी हल्ला केला तर? म्हणून सगळे घाबरून झाडाच्या मागे लपले होते. बरंच वेळ गेला, नंतर त्या सिंहांंनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते जंगलाच्या दिशेने निघून गेले. त्यांनी कोणाला काहीच केलं नाही, ते शांतपणे निघून गेले. पोलीस आणि गावकरी त्या मुलीजवळ गेले. तिच्या शरीरावर जखमा होत्या. त्या जखमा म्हणजे त्या सात जणांनी केलेल्या शारीरिक जबरदस्तीमुळे झाल्या होत्या आणि बरेच दिवस काही खाल्लं नाही, म्हणून ती शरीराने कमजोर झाली होती. तिला तिथून दवाखान्यात नेलं. तिथे तिच्यावर उपचार झाले. (Lions as Guardians)

ती थोडी सेटल झाली, तेव्हा तिने सगळी हकीकत सांगितली. ती म्हणाली की, पाच दिवस तिच्यावर प्रत्येकानेच जबरदस्ती केली होती. सहाव्या दिवशी ती झोपडीत असताना सगळे बाहेर आराम करत होते आणि ती आत जोरजोरात रडत होती. तेवढ्यात तिला मोठा आवाज ऐकायला आला आणि मग गोळ्यांचा आवाज सुरू झाला. त्या आवाजांंनी ती घाबरली. तिने बाहेर पाहिलं तर, एखाद्या फिल्ममध्ये जसा हीरो व्हिलनला मारायला एंट्री घेतो, तशीच सिंघम टाइप एंट्री त्या तिन्ही सिंहांंनी घेतली होती. तसा सिंह इथल्या प्रमुख प्राण्यांपैकी एक… पण हा प्राणी माणसाळलेला बिलकुल नाही, तर तो समोरच्याला फाडूनच खातो. मोगलीला कसे लांडगे वाचवतात. (Top Stories)

तसेच कदाचित ते तीन सिंह त्या मुलीला वाचवायला आले होते. आता एवढे बलाढ्य सिंह पाहून त्यांची चांगलीच तंतरली. सिंह एवढ्या जवळ आल्यावर बंदूक कशी चालवायची हेसुद्धा ते विसरले होते. त्याचवेळी त्यांना घाबरून एकाने गाडी सुरू केली आणि सगळे पळत त्या गाडीत बसले आणि त्यांनी धूम ठोकली. आता ते तिन्ही सिंह त्या मुलीजवळ आले आणि तिच्या शेजारी येऊन बसले. तिला थोडी शुद्ध होती. ती आपल्या बाजूला सिंह अनुभवत होती. यावेळी तिला वाटलं होतं की, हे सिंह मला आता खाऊन टाकतील. पण ते वेगळ्याच कारणाने तिथे आले होते. जसं काय ते तिचं रक्षण करायला बसलेत. तिच्या घरचे खुश झाले. यावर एका गावकऱ्याचं म्हणणं आलं, ते सिंह आले नसते तर परिस्थिती खूपच वाईट झाली असती. बऱ्याचदा या तरुण मुलींवर बलात्कार केला जातो आणि त्यांना लग्न स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी त्यांना क्रूरपणे मारहाण केली जाते.” (Lions as Guardians)

=============

हे देखील वाचा : Saudi :२० वर्ष कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे निधन

=============

दुसऱ्या दिवशी न्यूजचॅनलवर ही बातमी आली. पोलिसांनी लगेचच चौघांना ताब्यात घेतलं. पण बऱ्याच लोकांचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. कारण ही सिचुएशन लोकांना मुद्दाम क्रिएट केली की काय? असं वाटत होतं. पण ही सत्य घटना होती, पोलिसांनी आणि काही गावकऱ्यांनी ती आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. पण असं घडण्यामागे कारण काय असेल याचे काही तर्क लावले गेले. रूरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे वाइल्डलाइफ एक्स्पर्ट स्टुअर्ट विलियम्स यांनी एक तर्क मांडला, तो असा की, ती मुलगी वाचण्यामागे कारण म्हणजे ती रडत होती. त्याचं म्हणणं होतं, “एका लहान मुलीचं रडणं हे सिंहाच्या पिल्लासारखं वाटू शकतं, ज्यामुळे सिंहानी तिला खाल्लं नाही.” (Lions as Guardians)

आजही इथिओपियात ही टेलिफा प्रथा सुरू आहे. मुलींचा जबरदस्ती बालविवाह केला जातो. तिथे आजही अशी परिस्थिती आहे की, ४५% मुलींची लग्न १८ वर्षांआधी केली जातात. पण एक गोष्ट खरी की, अगदी गुगलवर सुद्धा याचे आर्टिकल्स सापडतील, त्या सिंहांमुळे ती १२ वर्षांची मुलगी वाचू शकली.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.