Home » Lilavati Hospital : लीलावतीमधील काळीलीली !

Lilavati Hospital : लीलावतीमधील काळीलीली !

by Team Gajawaja
0 comment
Lilavati Hospital
Share

मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागातील लीलावती हॉस्पिटल हे श्रीमंताचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. लीलावती हॉस्पिटलमध्ये मुंबईतील चित्रपट सृष्टीतील तारे तारकांसह अनेक उद्योगपतीही उपचारासाठी दाखल होतात. आधुनिक उपचार पद्धतीसाठी ओळखल्या जाणा-या या हॉस्पिटलमध्ये फक्त मुंबई, महाराष्ट्र येथील रुग्ण येतात, असे नाही, तर येथे देशभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. कारण लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टतर्फे या हॉस्पिटलमध्ये अनेक गरजवंतांनाही आरोग्य सुविधा देण्यात येते. तसेच येथील डॉक्टरही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे लीलावती हॉस्पिटल हे विश्वासार्ह हॉस्पिटल म्हणून ख्याती प्राप्त आहे. (Lilavati Hospital)

मात्र या हॉस्पिटलमध्ये उघड झालेल्या एका प्रकारानंतर येथे भरती असलेल्या रुग्णांना घाम फुटला आहेच, पण या हॉस्पिटलमधून ठणठणीत होऊन घर गाठलेल्या रुग्णांनाही घाम फुटला आहे. त्याला कारण झालं आहे ते काळ्याजादूचे. होय, रुग्णांवर उपचार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणा-या या रुग्णालयात आपापसातील वादांवर मात करण्यासाठी काळ्या जादूचा वावर करण्यात आला आहे. येथील काही विभागात खोदकाम केल्यावर आठ कलश मिळाले आहेत. या कलशांमध्ये राख, हाडे, लिंबू आणि काळी जादू करण्यासाठी जे सामान वापरले जाते, ते सापडले आहे. हे सर्व सामान मिळताच, मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय लीलावती हॉस्पिटलची विश्वासाहर्ता धोक्यात आली आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकारानं येथील सर्व कर्मचारी धोक्यात आहेतच, पण रुग्णांनाही मोठा धक्का बसला आहे. (Marathi News)

मुंबईतील प्रख्यात लीलावती हॉस्पिटलमध्ये काळ्या जादूचा प्रकार उघडकीस आला, आणि एकच खळबळ उडाली. लीलावती हॉस्पिटलची ख्याती ही आधुनिक उपचार घर असे आहे, तिथेच अंधश्रद्धेचा बाजार चालत असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय या हॉस्पिटलच्या माजी विश्वस्तांवर निधाची गैरवापर करण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटलचा मालकी हक्क आणि एकमेकांवर कुरघोडी कऱण्यासाठी थेट काळ्या जादूचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार होत असले तरी या हॉस्पिटलच्या ट्रस्टमधील काहींची मानसिकता ही हीनदर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांबाबत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि लीलावती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी माहिती दिली आहे. लीलावती ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी गेल्या 20 वर्षात सुमारे 12 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Lilavati Hospital)

यातील सर्व आरोपी आता दुबई आणि बेल्जियममध्ये असून त्यांच्याविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहितीही सिंग यांनी दिली. शिवाय यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच, ईडीकडेही तक्रार दाखल केली आहे. लीलावती रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींच्या फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे येथील सर्व कर्मचारी मानसिक धोक्यात आहेत. लीलावती रुग्णालयाची स्थापना 1997 मध्ये लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने केली. हे रुग्णालय सर्व क्षेत्रातील लोकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशानं बांधण्यात आले. हिरे उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक कीर्तिलाल मेहता यांच्या आई, लीलावती मेहता यांच्या नावावरून या रुग्णालयाचे नाव ठेवण्यात आले. कीर्तिलाल मेहता यांनी लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टची स्थापना केली. त्यातून रुग्णालयाचा कारभार चालवला जातो. (Marathi News)

=============

हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..

Wilhelm Rontgen यांनी X-ray चा शोध चुकून लावला होता !

=============

गेल्या काही वर्षापासून विश्वस्तांकडून गैरव्यवहार होत असल्याची कुणकुण होती. त्यातच काहींनी विश्वस्तांच्या कार्यालयात फरशीखाली काही वस्तू दडवून ठेवल्याची माहिती सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर व्हिडिओग्राफी करत विश्वस्तांचे कार्यालय आणि अन्यही काही कार्यालयात खोदकाम कऱण्यात आले, तेव्हा फरशीखालून आठ कलश मिळाले. यात राख, हाडे, केस अशा वस्तू सापडल्यानं खळबळ उडाली. या वस्तू सीलबंद करून पुरावा म्हणून पोलिसांकडे पाठवण्यात आल्या आहेत. सोबतच लीलावती ट्रस्टच्या ऑडिट तपासणीत आर्थिक अनियमितता सिद्ध झाली आहे. ऑडिटमध्ये ट्रस्टच्या माजी विश्वस्ताने मोठ्या प्रमाणात अनियमितता, आर्थिक फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे. सोबतच गुजरातमधील लीलावती रुग्णालयाच्या सुविधेतून मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचाही खुलासा करण्यात आला आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून देशभरात ओळख मिळवणा-या लीलावती हॉस्पिटली विश्वासाहर्ता यामुळे धोक्यात आली आहे. (Lilavati Hospital)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.