संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेनेत स्वदेशी रुपात विकसित पहिले लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर (Light Comat Helicopters) दाखल झाले आहे. लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर सोमवारी जोधपुर एअर बेसवर औचारिक रुपात भारतीय वायु सेनेत दाखल करुन घेण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आयएएफ यांनी या दरम्यान प्रेरण कार्यक्रमातील एक सर्व-धर्म प्रार्थनेमध्ये सहभागी झालेय स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर हे शत्रूंपासून हवाई संरक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्याचसोबत काउंटर इंसर्जेंसी स्ट्राइकसह काही नवी तंत्रज्ञान सुद्धा त्यामध्ये आहे.
पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएसने मार्च २०२२ मध्ये १५ स्वदेशी लाइट अटॅक हेलीकॉप्टटर खरेदी करण्यास मंजूरी दिली होती. हे १५ स्वदेशी लाइट अटॅक हेलीकॉप्टर ३३८७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. यापैकी १० हेलीकॉप्टर वायुसेनेत दाखल करण्यात आली. तर ५ भारतीय सैन्यात दाखल झाली आहेत.

लाइट कॉम्बॅटची खासियत काय?
-लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर म्हणजे एलसीएचच्या निर्मात्यांच्या मते, एलसीएच जगातील एकमात्र अटॅक हेलीकॉप्टर आहे, जे भारतीय सशस्र बलाद्वारे हत्यारे आणि इंधनाच्या मोठ्या प्रमाणात भार एकत्रित घेऊन ५ हजार फूट उंचीवर उडू शकते.
-या स्वदेश निर्मित लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टरचे नाव ‘प्रचंड’ असे ठेवण्यात आले आहे.
-एलसीएचला ५.८ टन वर्ग असलेले दोन इंजिन आणि लढाऊ हेलीकॉप्टरच्या रुपात डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये कोपिलॉट वेपन सिस्टिम ऑपेटर सुद्धा आहे. LCH आणि ALH मध्ये काही खासियत आहेत.
-लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टरचे वजन जवळजवळ ६ टन आहे. यामुळेच ते खुप हलके आहे. तर अमेरिकेचे अपाचे हेलीकॉप्टरचे वजन १० टन आहे. (Light Comat Helicopters)
-आपल्या हलक्या वजनामुळे एलसीएच हाय ऑल्टिट्यूर एरियामध्ये आपले क्षेपणस्र टाकू शकतात. तर शस्रांसह टेकऑफ आणि लँन्डिग सुद्धा करु शकतात.
-लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टरला ७० एमएमच्या १२-१२ केटचे दोन पॉड लावण्यात आले आहेत. एलसीएचची पुढील बाजूस २० गन लावण्यात आल्या आहेत. त्या ११० डिग्रीमध्ये कोणत्याही दिशेला फिरु शकतात.
हे देखील वाचा- वाहनातील एअर बॅगला कसे कळते अपघात झाल्याचे, जाणून घ्या अधिक
दरम्यान, एलसीएचला एक सार्वजनिक उपक्रम हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिडेटने विकसित केले आहे. तर खासकरुन उंच परिसरात तैनात करता येईल अशा रुपाने ते डिझाइन केले आहे. १९९९९ च्या कारगिल युद्धानंतर अशा हेलीकॉप्टरची आवश्यकता होती.