जर तुम्ही एलआयसी (Life Insurance Policy) खरेदी केली असेल तर तुम्हाला त्यासोबत एक बॉन्ड पेपर दिला जातो. ही एक फिजिकल कॉपी असून ती तुम्हाला घराच्या पत्त्यावर पाठवली जाते. यालाच इंन्शुरन्स बॉन्ड असे म्हटले जाते. यावर तुमच्या इंन्शुरन्ससंदर्भातील सर्व माहिती दिलेली असते. जसे की, तुमचे नाव, पॉलिसीचे नाव, पॉलिसीचा प्रीमियम, मॅच्युरिटी तारीख, नॉमिनी इत्यादी. त्यामुळे हा बॉन्ड पेपर जपून ठेवण्यास सांगितले जाते. कारण जेव्हा तुम्हाला क्लेम करायचा असतो तेव्हा हा पेपर दाखवावा लागतो. इंन्शुरन्स पॉलिसी मान्य झाल्यास कंपनी तुमच्याकडे बॉन्ड पेपर मागते. मात्र जर एखाद्या कारणामुळे तुमच्याकडून बॉन्ड पेपर हरवल्यास तर काय करावे त्याच संदर्भात तुम्हाला येथे अधिक माहिती मिळणार आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या इंन्शुरन्स कंपनीला याबद्दल कळवावे लागणार आहे. त्यानंतर कंपनीला सांगावे लागेल बॉन्ड पेपर हा तुमच्याकडून हरवला गेला आहे. तुम्ही कंपनीला थेट संपर्क साधू शकत नाही. त्याआधी तुम्हाला तुम्ही ज्याच्याकडून पॉलिसी खरेदी केली आहे त्याला संपर्क साधावाच. पण खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसात एफआयआर सुद्धा दाखल करुन त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवावावी. मात्र तुम्हाला लाइफ इंन्शुरन्स पॉलिसीची (Life Insurance Policy) डुप्लीकेट कॉपी हवी असल्यास कंपनी ती सहज देत नाही. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सादर करावे लागतात. त्याचसोबत तुम्हाला इनडेमनिटी बॉन्ड भरुन कंपनीला द्यावा लागणार आहे. यालाच हिंदीत क्षतिपूर्ती बॉन्ड असे म्हटले जाते. खरंतर या बॉन्ड पेपरवर स्टँम्प आणि मोहरसहित लिहिले जाते की, अर्जदाराद्वारे दिली गेलेली माहिती खरी आहे आणि पेपर हरवला आहे.
इनडेमनिटी बॉन्डवर अर्जदाराने स्वाक्षरी केल्यानंतर जर एखादा व्यक्ती मूळ बॉन्ड घेऊन इंन्शुरन्स कंपनीत पोहचल्यास आणि तोच खरा त्याचा हकदार असल्याचे त्याने सांगितल्यास अर्जदाराच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्याचसोबत मोठा भुर्दंड सुद्धा भरावा लागू शकतो.

हे देखील वाचा- आर्थिक संकटात असणाऱ्या ब्रिटनला भन्नाट उपयोजना करून या ‘पोलादी स्त्रीने’ सावरलं
इंन्शुरन्स पॉलिसी काढल्यानंतर पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा
-पॉलिसीचा मूळ पेपर जिथे कुठे ठेवाल त्याची माहिती नॉमिनीला जरुर द्या. कारण दुर्दैवाने पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्यावर नॉमिनीकडून क्लेम केला जाऊ शकतो. क्लेम तेव्हाच होईल जेव्हा नॉमिनीकडे बॉन्ड पेपर असेल. त्यामुळे बॉन्ड पेपर नीट सांभाळून ठेवा.
-पॉलिसीधारकाने नॉमिनीच्या माहितीशिवाय डुप्लीकेट पेपर तयार केला असल्यास त्याची माहिती नॉमिनीला दिलीच पाहिजे. डुप्लीकेट बॉन्ड पेपरवर डुप्लीकेट कॉपी असे लिहिलेले असते. त्यामुळे जरी पुढे जाऊन क्लेम करायचा झाल्यास तेव्हा नेमके काय करावे हे त्याला माहिती असले पाहिजे.
-या व्यतिरिक्त अतिसंकटाच्या प्रसंगी तुम्ही पॉलिसीसंदर्भात क्लेम करु शकता. त्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. मात्र तुम्हाला तुमच्या पॉलिसीचे पैसे मिळतात हे नक्की.