Home » ५ हजार रुपयांत ५० लाखांचा बीमा, संपूर्ण परिवाराच्या सुरक्षिततेसाठी LIC चा खास प्लॅन

५ हजार रुपयांत ५० लाखांचा बीमा, संपूर्ण परिवाराच्या सुरक्षिततेसाठी LIC चा खास प्लॅन

by Team Gajawaja
0 comment
lic tech term plan
Share

भारतीय जीवन बीमा म्हणजेच एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना लॉन्च करत असते. जेणेकरुन लोकांचे भविष्य सुरक्षित रहावे आणि त्यांना उत्तम रिटर्न्सह देण्याचे आश्वासन देते. एलआयसी एक विश्वासू नाव सून प्रत्येक वेळी सुरक्षित रिटर्न मिळण्यासाठी यावर डोळेबंद करुन गुंतवणूक केली जाते. अशातच एलआयसीने गेल्या वर्षात एक टर्म प्लॅन लॉन्च केला होता. Teach-Term 954 नावाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला फार कमी प्रिमियमम द्यावा लागतो. तर कमीतकमी यामध्ये ५० लाखांचा बीमा दिला जातो. ही योजना बीमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी अथवा परिवाराला डेथ बेनिफिटच्या रुपात ही रक्कम दिली जाते. (LIC Tech Term Plan)

दरम्यान, ही एक हाय रिस्क लाइफ इंन्शुरन्स प्लॅन आहे. ज्यामध्ये पॉलिसीच्या काळात आपत्कालीन स्थितीत बीमाधारकाचा मृत्यू झाल्यास परिवाराला आर्थिक सुरक्षा दिली जाते. एलआयसीच्या टेक टर्म प्लॅनला दोन बेनिफिट ऑप्शन लेवल सम एश्योर्ड आणि इंक्रिजिंग सम एश्योर्डसह खरेदी केले जाऊ शकते.

टर्म प्लॅनची खासियत
-एलआयसीच्या टेक टर्म प्लॅन मध्ये पॉलिसी धारकाकडे एक नियमित प्रीमियम आणि लिमिटेड प्रिमियम पेमेंट पैकी कोणताही एक ऑप्शन निवडण्याची संधी मिळते
-या प्लॅन अंतर्गत पॉलिसी धारक हप्त्यांमध्ये याचे पेमेंट करु शकतो
-या प्लॅनमध्ये पॉलिसी धारत काही अतिरिक्त प्रीमियमचे पेमेंट करुन एक्सीडेंट राइडरचा ऑप्शन निवडत आपला पॉलिसी कवरेज वाढवू शकतो
-या प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वय १८ वर्ष आणि अधिकाधिक ६५ वर्ष आहे.
-एलआयसीच्या टर्म प्लॅनमध्ये कमीतकमी ५० लाखांचा इंन्शुरन्स दिला जातो. या प्लॅनचा कालावधी १० ते ४० वर्ष आहे
-पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतो
-या प्लॅनमध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यानंतर डेथ बेनिफिट २ प्रकारचे मिळतात. त्यामध्ये परिवाराला एकरकमी पेमेंट केले जाते किंवा हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात (LIC Tech Term Plan)

हे देखील वाचा- गुंतवणूकीशिवाय करता येईल ‘हा’ व्यवसाय, होईल उत्तम नफा

महिलांना प्रीमियममध्ये विशेष सूट
एलआयसीच्या या प्लॅनमध्ये महिलांना प्रीमियमवर विशेष सूट दिली जाते. त्याचसोबत धुम्रपान न करणाऱ्या ग्राहकाला ही सूट मिळते. एलआयसीच्या प्लॅन क्रमांक ९५४ मध्ये धुम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगळा प्रीमियम दर आणि धुम्रपान करणाऱ्यांसाठी एक वेगळा प्रीमियम दर ठरवण्यात आला आहे. एलआयसीचा टेक टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्ही थेट एसआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.