इंग्रज सरकारकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार होते आणि देशाच्या विभाजनानंतर भारत जेथे प्रजासत्ताकाच्या दिशेने पुढे जात होता, पण पाकिस्तानला एक स्थिर सरकार हवे होते. भारताच्या पहिल्या लढाईत पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान (Liaquat Ali Khan) यांना पंडित नेहरुंसोबत करार करावा लागला होता. या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानातील सोशललिस्ट आणि कमूनिस्ट गटात लियाकत अली यांची प्रतिमा एक कमकूवत पंतप्रधान म्हणून अशी निर्माण झाली होती.
जवळजवळ ४ वर्षापर्यंत लियाकत यांना काही चढउतारांचा सामना करावा लागला होता. तारीख होती १६ ऑक्टोंबर १९५१, जागा- कंपनी गार्डन. लियाकत लोकांमध्ये जाऊन भाषण देणार होते. ते माइकच्या समोर उभे राहिले आणि समोरुन त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. लिकायत मंचावरच कोसळले. त्यांना तातडीने सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. ऑपरेशन झाले. काही तासानंतर रुग्णालयातून बातमी आली की, लियाकत अली यांचा मृत्यू झालाय.
कधीच मृत्यूचे गुढ उकलले नाही
आज लियाकत अली खान यांची जयंती आहे. १९८५ मध्ये आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. लियाकत जे आधी भारताचे अर्थमंत्री राहिले होते आणि नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पाकिस्तानात राजकरण हे आधीपासूनच अस्थिरतेचे होते. पाकिस्तानाचा इतिहास सांगतो की, कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करत नाही. ५ वर्षाच्या आधी सरकार कोसळले अथवा सत्तापालट झाली असो किंवा राजकरणामुळे जीव गमवावा लागलेला असो. लियाकत अली यांच्यासोबत सुद्धा तेच झाले होते.
लियाकत अली (Liaquat Ali Khan) यांच्या मृत्यूचे गुढ आजही उकलले गेलेले नाही. कंपनी गार्डन मध्ये गोळी कोणी झाडली हे स्पष्टच झाले नाही. कंपनी गार्डनमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल असे म्हटले जाते की, लियाकत अली खान यांच्यावर सईद अकबर नावाच्या व्यक्तीने गोळी चालवली होती. समोरील गर्दीत जेथे व्यक्ती उभा होता तेथूनच गोळी आली होती. एका पोलिसाने तेव्हा तेथेच पकडले. दरम्यान, हत्येनंतरच्या तपासात हे स्पष्ट झाले नाही की, गोळी ही अकबरनेच चालवली होती.
हे देखील वाचा- फिरोज गांधींवर कशा प्रकारे करण्यात आले अंतिम संस्कार? ज्याबद्दल खोटे बोलले जाते
पंतप्रधान राहिले पण…
अविभाजित भारतात जेव्हा जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात अखेरचे सरकार बनले होते तेव्हा नेहरु हे पंतप्रधान झाले. याच सरकारमध्ये लियाकत अली खान देशाचे अर्थमंत्री झाले होते. दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर लियाकत अली खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले होते. लियाकत अली हे बहुतांश लोकांच्या नजरेत खटकायचे. त्यांची खुर्ची नेहमीच डगमगायची. काही लोकांना ते पंतप्रधान म्हणून नको होते. मोहम्मद अली जिन्ना यांचा सुद्धा नंतर त्यांच्यासोबत मोहभंग झाला होता.