Home » ट्रांन्सजेंडर आणि समलैंगिक करु शकत नाहीत रक्तदान

ट्रांन्सजेंडर आणि समलैंगिक करु शकत नाहीत रक्तदान

by Team Gajawaja
0 comment
LGBTQ Blood Donation Issue
Share

ट्रांन्सजेंडर, समलैंगिक लोक आण महिला लैंगिक कर्मचाऱ्यांना रक्तदान निषेध श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यांना या श्रेणीतून हटवण्यात यावे म्हणून सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली. यावर केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करत सुप्रीम कोर्टाला असे सांगितले की, हे सर्व लोक एचआयवीसाठी जोखिमीच्या श्रेणीत येतात.केंद्राने असे म्हटले की, त्यांना वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर रक्तदान करण्यास मनाई आहे. ऐवढेच नव्हे तर हे सर्व हेपेटाइटिस बी किंवा सी संक्रमणासाठी सुद्धा जोखिमीच्या श्रेणीत येतात. केंद्र सरकारची ही प्रतिक्रया ट्रांन्सजेंडर समुदायातील सदस्य थंगजाम सिंह यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आली आहे. (LGBTQ Blood Donation Issue)

याची थंगजाम सिंह यांनी रक्तदात्याची निवड आणि रक्तदात्यासाठीी गाइडलाइन्सचे कलम-१२ आणि ५१ अंतर्गत समलैंगिक व ट्रांन्सजेंडर लोकांन रक्तदान करण्यावर घालण्यात आलेली बंदी हटवण्याची मागणी केली आहे. या गाइडलाइन्स नॅशनल ब्लड ट्रांन्सफ्युजन काउंसिल आणि नॅशनल अॅन्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनकडून ११ ऑक्टोंबर २०१७ रोजी जारी करण्यात आल्या होत्या. एनबीटीसीच्या गवर्निंग बॉडी यांनी १ जून २०१७ रोजी आपल्या २६ व्या बैठकीत ब्लड ट्रांन्सफ्युजन सर्विस आणण्यासाठी या गाइडलाइन्सला मंजूरी तर दिली. जेणेकरुन गरजू लोकांना रक्त आणि ब्लड कंपोनेंट्सच्या सुरक्षित, पुरेश्या आणि वेळेवर त्याची पुर्तता करता येईल.

काय सांगतात २०१७ च्या या गाइडलाइन्स
गाडइलान्सनुसार सर्वाधिक कमी जोखमी असणाऱ्या दात्यांकडून ते दान सुरुक्षित करण्यासाठी ब्लड ट्रांन्सफ्यजन सर्विसेस मध्ये उत्तम पद्धतीच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी बनवण्यात आले होते. सध्याच्या काळआत गाइडलाइन्सच्या क्लॉज-१२ आणि ५१ ला संविधानच्या कलम-१४ ,१५ आणि २१ चे उल्लंघन असल्याचे सांगत आव्हान दिले जात आहे. याचिकेत असे म्हटले गेले आहे की, हा नियम ट्रांसजेंडर, पुरुषांसह लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आणि महिला लैगिंक कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्यापासून वेगळे ठेवले जाते. क्लॉज-१३ रक्तदात्याची निवड ही मानदंडाअंतर्गत येते. हे अनिवार्य करते की, रक्तदाता एचआयवी, हेपेटाइसिस बी अथवा सी च्या जोखमीच्या श्रेणीत येत तर नाही ना. हा क्लॉज रक्तदात्यांना काही दुसरे आजार होण्यापासून ही रक्तदानासाठी अडवले जाते. (LGBTQ Blood Donation Issue)

हे देखील वाचा-भारतात समलैंगिक विवाहाला केंद्र सरकारचा विरोध

क्लॉज-१२ मध्ये कोणाला रक्तदानाची परवानगी?
क्लॉज-१३ मध्ये असे सांगितले गेले आहे की, समलैंगिक, महिला लैंगिक कर्मचारी अथवा ट्रांन्सजेंडरसह अंमली औषध घेणारे, काही लैंगिक पार्टनर्स असणे अथवा दुसऱ्या अतिगंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या कोणत्याही लोकांना रक्तदान करता येत नाही. मात्र काही विशेष परिस्थइतीत जर ते एखाद्या क्वालिफाइड डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट सादर करत असतील तर त्यांना रक्तदान करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. क्लॉज-१५ समलैंगिक आणि ट्रांन्सजेंडरसह एनआयवी संक्रमण जोखीमीच्या श्रेणीत येणाऱ्यांना रक्तदान करता येत नाही. त्यांना कधीच रक्तदान करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.