Home » करिअर ऐनभरात असताना पडद्यावरुन गायब झाली होती आएशा कारण…

करिअर ऐनभरात असताना पडद्यावरुन गायब झाली होती आएशा कारण…

by Team Gajawaja
0 comment
Ayesha Jhulka
Share

नव्वदच्या दशकातील बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक असलेली अभिनेत्री आयशा जुल्काचा आज वाढदिवस. ती ५० वर्षाची झाली. तिचा साधेपणा चाहत्यांना नेहमीच भुरळ घालतो. ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, अशा सुपरहिट चित्रपटांतून आयशा प्रकाशझोतात आली. मात्र करियर ऐन भरात असताना अचानक आयशाने चित्रपटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि ती पडद्यावरून गायब झाली. आयशाच्या या निर्णयाविषयी आणि तिच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींविषयी थोडंसं – (Ayesha Jhulka)

२८ जुलै १९७२ रोजी काश्मीरमध्ये जन्मलेल्या आयशाच्या वडिलांचे नाव इंदर कुमार जुल्का आणि आईचे नाव स्नेह जुल्का आहे. आयशाचे वडील इंदर हवाई दलात नोकरीला होते. परंतु आयशाला मात्र आकाशाचे नाही, तर बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेचं आकर्षण होतं. 

लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं स्वप्न बघणाऱ्या आयशाला पहिली संधी मिळाली ती १९८३ मध्ये आलेल्या ‘कैसा-कैसे लोग’ या चित्रपटातून. या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी आयशा ११ वर्षांची होती. याशिवाय आयशाने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. 

अभिनेत्री म्हणून तिला पहिला ब्रेक मिळाला तो सलमान खानच्या ‘कुर्बान’ या चित्रपटातून. चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही, परंतु आयशाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे खूप कौतुक झाले.(Ayesha Jhulka)

‘नरसिम्हा’ चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते

आयशाने २७ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ५२ चित्रपट केले, परंतु मोजक्याच चित्रपटांमध्ये तिला चांगली संधी मिळाली. कोणतीही ‘बॅकग्राउंड’ नसल्यामुळे तिला सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. ‘नरसिम्हा’ चित्रपटासाठीही कास्ट करण्यात आले होते, पण शेवटच्या क्षणी तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.  तेही कोणतेही कारण न देता! 

याबाबत काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “एक दिवस अचानक मला प्रॉडक्शन हाऊसचा फोन आला आणि त्यांनी मला या चित्रपटातून काढल्याचे सांगण्यात आलं. मी त्यंना कारण विचारलं, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे खूप त्रास झाला. या चित्रपटातून माझ्या करिअरची सुरुवात होणार होती.”

====

हे देखील वाचा – बॉलिवूडची ‘मुसु मुसु हासी गर्ल’ रिंकी खन्ना सध्या काय करते?

====

सहकलाकारांसोबत जोडले गेले नाव

आयशा जुल्का तिच्या चित्रपटांबरोबरच अफेअरमुळेही चर्चेत होती. आयशाचे नाव सलमान खान, अक्षय कुमार, अरमान कोहली, नाना पाटेकर अशा अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. ‘कुर्बान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सलमान खान आणि आयशा एकमेकांना डेट करत असल्याची बातमी चर्चेत होती. मात्र, काही दिवसांनी त्या बातम्यांना ब्रेक लागला. यानंतर आयशाचे नाव अक्षय कुमारसोबत जोडले गेले. (Ayesha Jhulka)

आयशा आणि अक्षयची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. ऑनस्क्रीन प्रेम करता-करता दोघे खऱ्या-खुऱ्या आयुष्यातही जवळ आले होते. मात्र त्यावेळी अक्षय कुमार या नात्याबाबत गंभीर नव्हता, त्यामुळे दोघेही विभक्त झाले. आयशाने हिंदी बरोबरच तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटातही भूमिका केल्या आहेत.

‘दलाल’ चित्रपटामुळे वादात सापडली होती आयशा

आयशा -मिथुन चक्रवर्ती या जोडीचा ‘दलाल’ चित्रपट सुपरहिट झाला होता. मात्र या चित्रपटामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या चित्रपटातील ‘चढ गया उपर रे…’ या गाण्यावरून वाद झाला होता.  त्या काळात आयशा आणि मिथुन यांच्या प्रेमाच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आएशा आणि मिथुन काही दिवस एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही बोलले जात होते. मात्र हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. कारण मिथुन चक्रवर्ती विवाहित होते.(Ayesha Jhulka)

नाना पाटेकरसोबत दिले होते इंटिमेट सीन

आयशाने नाना पाटेकरसोबत ‘आंच’ हा चित्रपट केला होता. यात तिच्यापेक्षा २४ वर्षांनी मोठ्या असलेल्या नाना पाटेकरसोबत तिने बरेच ‘इंटिमेट सीन’ दिले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या यशापेक्षा नाना पाटेकर आणि आयशा जुल्काचे अफेअर सर्वाधिक चर्चेत राहिले. दोघांमधील जवळीक खूप वाढली होती. त्यामुळे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र नाना पाटेकर आयशासह मनीषा कोईरालालाही डेट करत होते. मनीषाने दोघांना एकत्र पाहिल्यामुळे मनीषा खूप खचली होती, अशी चर्चाही तेव्हा रंगली होती.. मात्र, हे नातंही फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले.

बोल्ड सीनला नकार दिल्यामुळे गमावले स्टारडम

एका मुलाखतीत आयशा जुल्काने सांगितले होते की, मला एका पाठोपाठ एक बोल्ड सीनच्या ऑफर येत होत्या. मात्र मी त्या नकारल्या. त्यावेळी मला बोल्ड सीन करायचे नव्हते आणि बिकिनी घालून पडद्यावर  यायचे नव्हते. मात्र ‘रोजा’ आणि ‘प्रेम कैदी’ मध्ये मला बिकिनी घालावी लागेल असं सांगण्यात आल्यामुळे मी ते चित्रपट सोडले. 

बॉलिवूडमध्ये आलेल्या सततच्या अपयशानंतर आयशाने बांधकाम व्यावसायिक समीर वाशी यांच्यासोबत लग्न केले आणि आपल्या संसारात रमली आहे. आता आयशा पतीच्या व्यवसायात त्यांची मदत करत आहे.(Ayesha Jhulka)

– राजेश्वरी बोर्डे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.