भारतात चहा म्हणजे जणू अमृतच समजले जाते. चहा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आता चहा म्हटल्यावर प्रत्यके व्यक्तीला तो वेगवेगळ्या पद्धतीचा, प्रकारचा आवडतो. कोणाला मसाला चहा आवडतो, कोणाला आल्याचा चहा आवडतो तर कोणाला वेलची टाकलेला चहा आवडतो. मात्र यामध्ये गवती चहा टाकून चहा पिणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील मोठे आहे. बऱ्याच लोकांना चहामध्ये गवती चहा टाकून चहा प्यायला फार आवडतो. गवती चहा म्हटले की अनेकांना फक्त चहाच आठवतो. गवती चहाचा सुगंध दूरवर पसरतो. त्यामुळे गवती चहा अगदी सहज ओळखता येतो. (Health)
याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. गवती चहाचे सेवन केल्याने कोणते फायदे आपल्याला शरीराला होतात पाहूया. (Lemon Grass)
पचनशक्ती
गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. गवती चहाचा उपयोग ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केला जातो. ते पाच प्रणाली मजबूत बनवते. गवती चहा पोटातील वात कमी करण्यास मदत करतो आणि पोटाचे कोणतेही आजार उद्भवत नाही. (Marathi)
वजन कमी
गवती चहा वजन कमी करण्यास मदत करते. त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते. विशेष म्हणजे गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याच्या वापराने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जर तुम्ही सकाळी लवकर याची पाने चहाच्या स्वरूपात घेतली, तर यामुळे तुमच्या शरीराला आयर्न आणि व्हिटॅमिन सी सोबत अनेक पोषक तत्वे मिळतील. (Todays Marathi Headline)

कॅल्शियम वाढवते
लिंबू आणि गवती चहा घेण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत. जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते. मासिक पाळीच्या समस्या आणि डोकेदुखी यामुळे दूर होते. शिवाय, लेमनग्रास पेस्ट त्वचेच्या समस्यांवर लावता येते आणि औषध म्हणून वापरली जाऊ शकते.
हृदयरोग
गवती चहाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हे हृदय निरोगी ठेवते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. जर कोणाला सांधेदुखी, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार किंवा सर्दी-पडशाची वारंवार तक्रार असेल, तर याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. (Top Marathi News)
केसांच्या वाढीसाठी
गवती चहामध्ये अ आणि सी जीवनसत्त्वे असतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. हे केस वाढण्यास उपयुक्त आहे.
सर्दी खोकला
गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. गवती चहा घेतल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते. गवती चहाच्या तेलाचा वापर दातदुखीवर केला जातो. ज्यामुळे त्वरित दातदुखी कमी होते आहे आराम मिळतो. (Marathi Trending Headline)
========
Summer Care : उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, आधीच घ्या आरोग्याची काळजी
========
बॅड कोलेस्ट्रॉल
गवती चहाचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. शिवाय संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, गवती चहा कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठीही उपयुक्त आहे. (Top Stories)
एकाग्रता
गवती चहामध्ये अँटीऑक्सीडेंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. हे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. झोपेच्या समस्या आणि ताणतणावावर उपचार करण्यासाठी लेमनग्रास तेल देखील एक उत्तम पर्याय आहे. ते चेहऱ्यावर किंवा कपाळावर हलक्या हातानं मसाज करून लावता येतं. (Social NEws)
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
