मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते विवेक लागू यांचे दुःखद निधन झाले आहे. विवेक यांनी १९ जून रोजी रात्री उशिरा शेवटचा श्वास घेतला. विवेक यांच्या निधनाची बातमी पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. दरम्यान २० जून रोजी सकाळी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती पत्रकार विक्की लालवानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. (Vivek Lagoo)
विवेक यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक प्रभावी अभिनेते असण्यासोबतच विवेक उत्तम दिग्दर्शक देखील होते. मुख्य म्हणजे विवेक हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. मराठीसोबतच विवेक यांनी हिंदी मनोरंजनविश्वात देखील काम केले होते. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी मनोरंजनविश्वातील ओळखीचा चेहरा आणि प्रगल्भ अभिनेते अशी त्यांची ओळख होती. दरम्यान विवेक लागू यांच्या निधनाचे कारण समोर आलेले नाही. (Marathi Trending News)
‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ’31 दिवस’ या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘चार दिवस सासूचे’ , ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय. विवेक लागू यांनी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या शांत स्वभावामुळे खूपच प्रसिद्ध होते. त्यांनी अतिशय प्रभावी आणि दमदार भूमिका साकारल्या. (Marathi News)
विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. सुरुवातीपासूनच विवेक यांना लेखन आणि दिग्दर्शनाची खूप आवड होती. त्यामुळेच ते या क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने मुंबईत आले. इथे आल्यानंतर त्यांना विजया मेहता यांच्या नाट्य शिबिरात येण्याची संधी मिळाली. मात्र त्या शिबिरात त्या अभिनयच शिकवणार होत्या. मुंबईत एक महिना फ्री राहायची संधी या शिबिराच्या निमित्ताने त्यांना मिळणार होती, म्हणूनच त्यांनी हे शिबीर जॉइन केले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांचा अभिनयही प्रभावी होता. या शिबिरानंतर त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. चल आटप लवकर, प्रकरण दुसरं, सर्वस्वी तुझीच या गाजलेल्या नाटकांचं लेखन विवेक लागू यांनी केले होते. त्यांनी ‘तर तुला मी … मला मी’ हे नाटक दिग्दर्शित केले होते. ‘आबोल झाली सतार’, ‘आपलं बुवा असं आहे’, ‘कोपता वास्तुदेवता’, ‘जंगली कबुतर’, ‘बीज’, ‘रानभूल’, ‘सूर्यास्त’, ‘स्पर्श’ सारख्या नाचकात विवेक यांनी काम केले. (Celebrity News)
मनोरंजनविश्वात विवेक आणि रीमा लागू यांची जोडी कमालीची प्रसिद्ध होती. विवेक आणि रीमा या दोघांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक वर्ष काम केले होते. दोघेही मालिका आणि सिनेविश्वातील मोठं नाव होते. रीमा लागू या हिंदी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ‘आई’ होत्या. रीमा लागू यांची बरीच माहिती लोकं आहे. मात्र विवेक लागू यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. विवेक आणि रीमा यांनी प्रेमविवाह केला होता आहे. या दोघांची पहिली भेट आणि प्रेमकहाणी कशी होती? त्यांचा घटस्फोट का झाला? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. (Todays Top Headline)
रीमा या सुरुवातीच्या काळात अभिनयसोबतच बँकेत देखील काम करायच्या. १९७६ साली एका बँकेत काम करत असताना त्यांची आणि विवेक यांची भेट झाली होती. बँकेत काम करत असतानाच रीमा आणि विवेक मराठी नाटकांमध्ये काम करत होते. बराच काळ एकत्र काम करत असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि १९७८ साली रीमा आणि विवेक यांनी लग्न केले. या दोघांना मृण्मयी नावाची एक मुलगी आहे. (Marathi Top Headline)
मात्र त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर काही वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाते जास्त न ताणता डिवोर्स घेण्याचे ठरवले. जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी ते कायम मुलीसाठी एकत्र यायचे. असे असले तरी या दोघांनी कारण कधीच मीडियासमोर त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण येऊ दिले नाही. डिवोर्सनंतरही त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. या दोघांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. “प्रेम आणि लग्न एकदाच होते आणि ते एकदा संपले की संपले”, असे विवेक लागू यांनी सांगितले होते. २०१४ साली या दोघांनी घटस्फोटानंतर ‘दुसरा सिलसिला’ या नाटकात एकत्र काम देखील केले होतं. (Marathi Latest News)
रीमा आणि विवेक यांना मृण्मयी नावाची मुलगी असून, तिने देखील आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत मनोरंजविश्वात पदार्पण केले आहे. नाटक, अभिनय आणि दिग्दर्शनात मृण्मयी काम करते. मृण्मयीने तिच्या कमालीच्या लिखाणाने हिंदी मनोरंजनविश्वात नाव कमावले आहे. मृण्मयीने थप्पड, स्कुप सारख्या सिनेमांचे लेखन केलं आहे. दरम्यान २०१७ साली रीमा लागू यांचे हॉर्ट अटॅकने निधन झाल्यानंतर मृण्मयीच वडिलांची काळजी घेत होती. (Social News)