त्वचेवर येणारे डार्क स्पॉट आणि सनबर्न सारख्या समस्यांसाठी आता एलईडी लाइट थेरपीचा वापर केला जात आहे. तर एलईडी लाइट थेरपीसाठी तुम्ही डर्मेटोलॉजिस्ट म्हणजेच स्किन रोग तज्ञांची मदत घेऊ शकतात. अशातच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा घरीच तुम्ही डिवाइसचा वापर करुन ही ट्रिटमेंट करु शकता. या ट्रिटमेंटमध्ये काही प्रकारच्या लाइटच्या वेव लेंथचा वापर केला जात आहे. याच्या माध्यमातून नैसर्गिक हिलिंग प्रोसेसला ट्रिगर केली जाते. अशातच आज आपण याच थेरपी बद्दल अधिक जाणून घेऊयात. (LED Light Therapy)
काय आहे एलईडी लाइट थेरपी?
LED चे संपूर्ण नाव लाइट इमिटिंग डायओड असे आहे. एलईडी लाइट्चा वापर काही वर्षांपासून केला जात आहे. मात्र एलईडी लाइट थेरपीच्या माध्यमातून त्वचेवर ट्रिटमेंट करण्याची पद्धत ही अलीकडेच सुरु झाली आहे. एलईडी लाइट्स जखम भरणे आणि ह्युमन टिशू ग्रोथ वाढवण्यास मदत करते. एलईडी लाइट्स मध्ये असलेले वेवलेंथ त्वचेला विविध खोलासह पेनिट्रेट करतात. यामध्ये ब्लू आणि रेड लाइट असते.
एलईडी लाइट्स थेरपीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
कोणत्याही प्रकारची लाइट थेरपी घेण्यापूर्वी चेहरा स्वच्छ साफ करा. स्किन प्रोडक्टमध्ये असलेली सामग्री लाइटला पसरवते आणि ती त्वचेमध्ये मुरत नाही. अशातच तुम्ही मेकअप प्रोडक्ट जसे फाउंडेशनचा सुद्धा वापर करु नये. अशातच तुम्ही एलईडी लाइट थेरपी घेत असाल तर त्याची रिअॅक्शन होण्याची शक्यता वाढते.
मार्केटमध्ये काही प्रकारचे एलईडी मास्क आणि एलईडी डिवाइस उपलब्ध आहेत. जे वापरणे अत्यंत सोप्पे आहे. मात्र त्याच्या योग्य फायद्यासाठी ते ५-६ दिवस वापरावे. त्याचसोबत स्किन केअर रुटीन फॉलो करा. सेंसिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी प्रथम ही थेरपी घेण्यापूर्वी तज्ञांना सल्ला घ्या.
कशी करतात थेरपी?
त्वचेसाठी एलईडी लाइट थेरपी कोणत्याही प्रोफेशनल किंवा घरगुती डिवाइसच्या माध्यमातून घरी सुद्धा केली जाऊ शकते. प्रत्येक सेशन जवळजवळ २० मिनिटे चालते आणि कमीतकमी १० सेशन गरजेचे असतात. दरम्यान होम डिवाइसचा वापर करतेवेळी डिवाइस वापरणाऱ्याने काही सुचनांचे पालन करणे फार महत्वाचे असते. हे उपकरण सर्वसामान्यपणे एक मास्कच्या रुपात येते. ते व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावले जाते. एलईडी लाइट थेरपी चेहरा, हात आणि मान या भागासाठी वापर करतात. (LED Light Therapy)
हे देखील वाचा- जगात पुढील २० वर्षात T1D आजार पसरण्याची शक्यता? अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
एलईडी लाइट थेरपी सुरक्षित आहे?
तुमच्या लक्षात आले असेल की, एलईडी लाइट थेरपी अत्यंत सुरक्षित आहे. तज्ञ असे म्हणतात की, या एलईडी लाइटच्या माध्यमातून केली जाणारी थेरपी ही दीर्घकाळ परिणाम माहिती नाहीत.