इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नरसाल्लाह ठार झाला. लेबनानमधील हा इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला ठरला. यासाठी इस्रायली सैन्याने लेबनानची राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 80 टन वजनाच्या बॉम्बने हल्ला केला. आता याच लेबनानमधील हिजबुल्लाच्या अंतर्गत सर्व साधनांना तोडण्यासाठी इस्रायलने लढाई सुरु केली आहे. इस्रायलच्या बॉम्बमुळे लेबनान उध्वस्त होत आहे. एकेकाळी हेच लेबनान अरब देशांचे स्वित्झर्लंड म्हटले जात असे. येथे शिया-सुन्नी आणि ख्रिश्चन एकत्र रहात असत. लेबनानच्या समुद्रकिना-यावर बिकीनी घालून फिरणा-या महिला हे नेहमीचे दृष्य होते. (Lebanon)
याच लेबनानमध्ये स्टार्टअपचा पहिला पाया पडला. जगभरातील व्यापारी या लेबनानमध्ये उद्योगधंदे सुरु कऱण्यासाठी येत असत. खुली अर्थव्यवस्था असलेल्या लेबनानच्या बॅंकामध्ये जगभरातील अनेक गर्भश्रीमंतांनी पैसे ठेवले होते. पण आता हाच लेबनान हिजबुल्ला सारख्या अतिरेकी संघटनेच्या हाती गेला आहे. पॅलेस्टाईनची मैत्री आणि इस्रायलबरोबरचे वैर यामुळे एकेकाळी संपन्न आणि समृद्ध असलेल्या लेबनानला उध्वस्त केले आहे. जगभरातील वृत्तवाहिन्यांवर सध्या एकाच देशाचे नाव गाजत आहे, तो देश म्हणजे लेबनान. जगातील सर्वात लहान जे देश आहेत, त्यात या देशाचा समावेश होतो. आता हा अवघा देश रणभुमी झाला आहे. इस्रायलचे रणगाडे या देशात घुसले असून लेबनानमध्ये हिजबुल्ला या संघटनेने तयार केलेले भुयारांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. या लेबनान देशाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा समृद्धीचा काळ ही माहिती जाणून घेण्यासारखी आहे. (International News)
शिया, सुन्नी आणि ख्रिश्चनांचा देश असलेल्या लेबनानला मध्य पूर्वेचे स्वित्झर्लंड म्हणून गौरवले गेले होते. रोमन, ग्रीक, तुर्क आणि फ्रेंच सत्तांनी या देशावर राज्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेचे आणि संस्कृतीचे वर्चस्व अजूनही या देशावर आहे. लेबनानची लोकसंख्या अवघी 55 लाख आहे. या देशाचा जन्म पहिल्या महायुद्धानंतर झाला. पहिल्या महायुद्धात तुर्कांचा पराभव झाल्यानंतर, 1916 मध्ये, पाश्चात्य देशांनी मध्य पूर्वेच्या सीमांचे विभाजन केले. त्यात फ्रान्सने सीरियावर कब्जा केला. पुढे फ्रान्सने 1920 मध्ये सीरियाचा पश्चिम भाग तोडून लेबनान देशाची निर्मिती केली. पण लेबनानवरील फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव कायम राहिला आणि आत्ताही आहे. या देशाच्या उत्तरेला आणि पूर्वेला सिरीया आहे. दक्षिणेला इस्रायल आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. यादेशात एकेकाळी अर्धी लोकसंख्या ख्रिश्चन होती, आणि बाकीच्या लोकसंख्येमध्ये सुन्नी आणि शिया मुस्लिमांचा समावेश होता. (Lebanon)
पण कालांतरानं ख्रिश्चन लोकसंख्या निम्यावर आली आणि शिया, सुन्नी लोकसंख्या वाढली. त्यानंतर या देशात गृहयुद्ध सुरु झाले. लेबनानला 1943 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा देशाचा राष्ट्रपती ख्रिश्चन, सुन्नी पंतप्रधान, शिया संसदेचा अध्यक्ष होईल असे निश्चित करण्यात आले. लेबनानचा संबंध येशु क्रिस्ताबरोबरही आहे. लेबनानच्या काना गावात येशु ख्रिस्ताच्या अनेक आठवणी पहाता येतात. बायबलनुसार, येथेच येशूने पहिला चमत्कार केल्याचे सांगण्यात येते. येशूने लग्नात पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर केले. जेव्हा येशूला मारण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याने आपल्या अनुयायांसह या शहरात बांधलेल्या गुहेत आश्रय घेतला, त्यामुळे लेबनानबद्दल सर्वच ख्रिश्चनांमध्ये आदराचे स्थान आहे. लेबनॉनचा हा भाग आता हिजबुल्लाहच्या ताब्यात आहे. येथील ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियही मदर मेरीची पूजा करतात. (International News)
1943 मध्ये लेबनान स्वतंत्र झाला. त्याच्यापाठोपाठ 1947 इस्रायलची स्थापना झाली. तेव्हापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध सुरु आहे. हे वाद सुरु असतांनाच लेबनानची प्रगती सुरु होती. येथे 1956 मध्ये बँक गुप्तता कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांनी आपले पैसे लेबनॉनमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. या देशानं खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. यामुळे स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले. या दरम्यान लेबनानच्या भोवती असलेल्या इजिप्त, सिरिया आणि इराकमध्ये राजकीय अस्थरता वाढली परिणामी लेबनानमध्ये स्थलांतरितांचे मोठे लोंढे येऊ लागले. पण त्याचवेळी लेबनानमधील ख्रिश्चन, शिया आणि सुन्नी समुदायामधील दरी वाढली. (Lebanon)
त्याचा परिणाम म्हणून लेबनानमध्ये 1975 मध्ये गृहयुद्ध सुरु झाले, ते 15 वर्षे सुरू होते. त्या काळात या देशाची सर्व संपन्नता गायब होऊन हिजबुल्ला सारख्या संघटनेकडे या देशाचे नेतृत्व गेले. लेबनॉन हा अरब जगाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे लेबनान नकळतपणे इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात ओढला गेला. 1975 च्या अखेरीस लेबनानमध्ये 29 दहशतवादी तयार झाल्या होत्या. यातील 2 लाख लोक आपापसात लढत होते. गृहयुद्धाच्या पहिल्या वर्षात, 10 हजारांहून अधिक लोक मारले गेले. त्यात लाखभर ख्रिश्चन धर्मियांनी लेबनान सोडून अमेरिका आणि युरोपमध्ये स्थलांतर केले. या गृहयुद्धात 1976 साली सिरियाची एन्ट्री झाली आणि 2005 पर्यंत, सीरियन सैन्य लेबनानमध्ये राहिले. या सर्व काळात लेबनान एखाद्या युद्धभुमीसारखा वापरला गेला. इस्रायल, सीरिया आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनने या देशाला युद्धभूमी बनवले होते. या सर्वात लेबनानमध्ये 1982 मध्ये निवडणुकाही झाल्या. (International News)
======
हे देखील वाचा : इराणने इस्राइलवर हल्ला का केला?
======
त्यात इस्रायलशी जवळीक असलेले बशीर गेमेल राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, परंतु त्यांची शपथविधी आधीच हत्या झाली. त्यानंतर सत्तेवर आलेल्यांनी ख्रिश्चन, सुन्नी, शिया संघर्ष अधिक पाहिला. याचा परिणाम म्हणजे, लेबनानमध्ये एकाचवेळी दोन धर्मियांची सरकारे होती. या सर्वात सौदी अरेबियानं लेबनानमधील गृहयुद्ध संपवण्यासाठी पुढाकार घेतला. या सर्वात 1 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याहून दुप्पट नागरिक जखमी झाले. पण या सर्वात तेथील अतिरेकी संघटना मजबूत झाल्या. त्यांच्याच हल्यातून 2000 मध्ये जेव्हा इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतली. तेव्हा झालेला हा घाव इस्रायलने आता भरुन काढायला सुरुवात केली आहे. मात्र त्याचा परिणाम काहीही असो, पण लेबनानचे मात्र भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे. या देशातील महिलांचे स्वातंत्र हिरावण्यात आले आहे. ज्या देशात गुंतवणूक करायला जगभरातील उद्योजक आघाडीवर होते, तोच देश आता इतर देशांच्या मदतीच्या आशेवर आहे. (Lebanon)
सई बने