Home » लेबनॉनमध्ये होतोय हाहाकार ..!

लेबनॉनमध्ये होतोय हाहाकार ..!

by Team Gajawaja
0 comment
Lebanon Blast
Share

आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे, लेबनॉनमधील एका पाठोपाठ एक होणारे स्फोट.  अद्याप स्फोट म्हणजे, फक्त बॉम्बचेच असे समजले जात होते.  मात्र इस्रायलनं आपल्या शत्रूंभोवती असं काही जाळं विणलं की आता लेबनॉनमधील हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेला साधा टिव्ही लावायलाही भीती वाटत आहे. कारण तेथील बहुतांश साधनांचे स्फोट होत आहेत.  इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे सैनिक आत्तापर्यंत आपला संपर्क शत्रूच्या हाती लागू नये म्हणून मोबाईल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरत असत. मात्र हेच हजारो पेजर एकाचवेळी फुटले.  मग वॉकी-टॉकींचा स्फोट होऊ लागला. त्यानंतर असं कुठलं विद्युत साधन राहिलं नाही, ज्यांचा स्फोट झाला नाही.  फारकाय लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मोठ्या संख्येने घरांवर सौर यंत्रणा बसविण्यात आली आहे, त्यातही स्फोट सुरु झाल्यानं अवघ्या लेबनॉनमध्ये हाहाकार उडाला आहे.  (Lebanon Blast)

इस्रायल देश आपल्या शत्रूंना बंदोबस्त कशापद्धतीनं करु शकतो याचे उदाहरण सध्या जगासमोर आले आहे. पॅलेस्टिनमधील हमासनं केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायल हमासच्या मागे लागली आहे.  मात्र अशातच इस्रायलने आपला मोर्चा लेबनॉनमधील हिजबुल्ला या संघटनेकडे वळवला आहे.  अगदी काही दिवसाच्या अवघीत इस्रायलने लेबनॉनमध्ये (Lebanon Blast) 5 हजार पेजर फोडले. त्यानंतर वॉकीटॉकीत स्फोट घडवून आणले. मग रेडिओ, टिव्ही आणि लॅपटॉपमध्येही स्फोट घडवून आणले आहेत.  घरावरील सौर उर्जा प्रकल्पही धोकादायक बनले.  या सर्वांत हिजबुल्ला संघटनेला मोठा धक्का बसला आहे.  या स्फोटामध्ये ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी वापरण्यात आलेल्या मोबाईमध्येही स्फोट झाल्यानं सर्वत्र दहशत पसरली आहे.  आता हिजबुल्ला संघटनेनं त्यांच्या सर्व सदस्यांना मोबाईली बॅटरी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मात्र हे सर्व होत असतांना आता पुढचे स्फोट कशात होणार याची चिंता हिजबुल्लाला लागली आहे.  हे सर्व स्फोट इस्रायलने कशा पद्धतीनं घडवून आणले आणि आपल्या शत्रूला कशाप्रकारे नमते घ्यायला लावले याची चर्चा आता सुरु झाली आहे.  (International News)

इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू हमास मानला जातो.  पण या हमासला बाजूला ठेऊन इस्रायल हिजबुल्लाच्या मागे का लागले आहे, या. मग हमासला बाजूला ठेवून इस्रायल आपली ताकद आणि तयारी हिज्बुल्लाविरुद्ध का वापरत आहे, हा प्रश्नही आहे. याचे कारण 24 वर्षापूर्वी झालेल्या एका हल्ल्यामध्ये आहे.  2000 साली मे महिन्यात हिजबुल्लानं इस्रायलवर हल्ला केला होता.  तेव्हा दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलनं माघार घेतली.  त्यानंतर 2006 मध्ये, 34 दिवस हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे 62,000 हून अधिक इस्रायलींना आपली घरे सोडून आश्रयगृहांमध्ये रहावे लागले होता.  याच घटनेचा बदला इस्रायलनं आता घेतला आहे.  सध्या लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेचे संपूर्ण नेटवर्क पूर्णपणे ठप्प आहे.  कारण कुठे आणि कशात स्फोट होईल, याची खात्री देता येत नाही.  हिजबुल्लानं इस्रायलचा बदला घेण्यात येईल, अशी धमकी दिली तरी हिजबुल्लाला इस्रायलनं या गनीमी काव्याच्या युद्धात मोठी मात दिली आहे. (Lebanon Blast)

=============

हे देखील वाचा : तिरूपती मंदिराच्या प्रसादात वापरली जात होती प्राण्यांची चरबी ?

=============

या स्फोटामुळे मोबाईल फोनला हात लावायलाही भीती वाटत आहे.  वास्तविक  इस्रायली हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे सैनिक मोबाइल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरतात. त्यातच स्फोट झाल्यानं हिजबुल्लाचे नेटवर्क ठप्प झाले आहे.  लेबनॉनमध्ये सध्या गोंधळाचे वातावण आहे.  लेबनॉनची राजधानी बेरूतमधील रफिक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना वॉकी-टॉकी आणि पेजर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.  या सर्व हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचे सैनिक मोठ्याप्रमाणात जखमी झाले आहेतच पण इराणेच लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानीही जखमी झाले आहे.  इकडे इस्रायलमध्ये मात्र आनंद साजरा होतोय.  हिजबुल्लाचा बदला घेतल्याबद्दल इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी इस्रायल संरक्षण दल तसेच देशाची सुरक्षा एजन्सी शिन बेट आणि त्यांची गुप्तचर संस्था मोसाद यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.  हिजबुल्ला हा लेबनॉनमधील एक शक्तिशाली गट आहे. अमेरिका आणि अनेक देशांनी याला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.(Lebanon Blast)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.