Home » Learn To Trust Yourself : स्वतःवर विश्वास कसा ठेवावा? फॉलो करा या ५ सवयी

Learn To Trust Yourself : स्वतःवर विश्वास कसा ठेवावा? फॉलो करा या ५ सवयी

by Team Gajawaja
0 comment
Learn To Trust Your Self
Share

Learn To Trust Yourself : आजच्या वेगवान जीवनात आत्मविश्वास हे  यश, आनंद आणि मानसिक स्थैर्याचा पाया आहे. अनेकदा आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही, त्यामुळे संधी हुकतात आणि मनावर ताण वाढतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवणे आणि तो एका दिवसात तयार होत नाही. दररोजच्या छोट्या, सकारात्मक सवयींमुळे हा आत्मविश्वास हळूहळू वाढवता येतो.

सर्वात पहिली सवय म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे आपण दिवसभर स्वतःशी किती वेळा नकारात्मक बोलतो हे लक्षात येत नाही मी नाही करू शकत, माझ्यात आत्मविश्वास नाही असे विचार सतत मनात फिरतात. हे थांबवून मी प्रयत्न करतोय, मी सक्षम आहे अशा वाक्यांचा सराव करावा. आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलण्याची सवय लावा. हे साधं पण प्रभावी पाऊल आत्मविश्वासाला मजबुती देतं.

दुसरी सवय म्हणजे छोटे-छोटे उद्दिष्टं ठरवून ती पूर्ण करणे. रोजच्या जीवनात साध्य होणारी उद्दिष्टं जसं की  सकाळी १० मिनिटं चालणे, दररोज एक नवीन गोष्ट शिकणे, काम वेळेत पूर्ण करणे  हे  केल्याने स्वतःवरचा  विश्वास वाढतो.  यश, कितीही लहान असो, मी करू शकतो अशा यशांची साखळी तयार झाली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. (Learn To Trust Yourself)

Learn To Trust Yourself

Learn To Trust Yourself

तिसरी सवय म्हणजे आपल्या शरीराबद्दल आणि आरोग्याबद्दल काळजी घेणे. नियमित व्यायाम, योगा, योग्य झोप आणि पौष्टिक आहार यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. निरोगी शरीरात सकारात्मकतेचे   विचार वाढतात आणि आत्मविश्वास ही  बळकट होतो. सेल्फ-केअर म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे, तर स्वतःचा सन्मान करणं. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो, तेव्हा आपल्याला स्वतःची  जाणीव होते.

चौथी सवय म्हणजे भीतीकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिला स्वीकारणे. प्रत्येकाला काहीतरी भीती असते अपयशाची, लोकांच्या मतांची, किंवा बदलाची. पण आत्मविश्वासी व्यक्ती ती भीती ओळखते आणि तरीही पुढे पाऊल टाकते. दररोज एखादी छोटी भीती ओलांडण्याचा प्रयत्न करा जसे की नवीन लोकांशी बोलणे, मीटिंगमध्ये मत मांडणे, किंवा काहीतरी नवीन शिकणे. या छोट्या प्रयत्नांनी भीती कमी होते आणि धैर्य वाढते.(Learn To Trust Yourself)

=====================

हे देखील वाचा :

 World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?        

 NATO Dating : नाटो डेटिंग म्हणजे काय आणि त्याचे संकेत कसे ओळखावे?                            

 Galapagos Affair : दोघे बेटावर गेले पण ती आली आणि भलतंच घडलं…          

===================

शेवटी कृतज्ञतेची सवय जोपासा दिवसाच्या शेवटी तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. हे आत्मविश्वास वाढवण्याचा अप्रत्यक्ष पण परिणामकारक मार्ग आहे. कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देतो, तेव्हा नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होते. तर दररोज या छोट्या सवयींवर काम केल्यास आत्मविश्वास वाढतोच, पण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आत्मविश्वास म्हणजे परिपूर्ण होणे नव्हे, तर अपूर्णतेसह स्वतःवर विश्वास ठेवणे होय.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics                   


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.