आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते आणि ते म्हणजे स्वतःचे हक्काचे छोटेसे का असेना पण घर घ्यायचे. आज प्रत्येकाच्याच बकेट लिस्टमधील एक महत्वाची इच्छा म्हणून ‘घर’ या इच्छेला ओळखले जाते. मात्र घर घेणे हे प्रत्येकाच्याच बजेटमध्ये असते असे नाही. अनेकांचे स्वप्न फ्लॅट, बंगला घेण्याचे देखील असते. जेव्हा आपण लोकांचे मोठमोठे आणि अतिशय सुंदर असे घर बघतो तेव्हा नक्कीच आपल्याला देखील क्षणभर विचार येतो, काश असे माझे घर असते तर? जेव्हा कधी आपण कलाकारांचे, उयोगपतींचे आलिशान घरं बघतो तेव्हा आपल्याला त्यांचा नक्कीच हेवा वाटतो. मात्र आपण जर पाहिले भारतात सर्वात मोठे घर कोणाचे तर सगळ्यांच्याच तोंडावर एकच नाव येईल अंबानी. (Marathi)
जगातील सर्वच सुखसोयींनी युक्त असे अतिशय मोठे, आलिशान घर म्हणजे अंबानी यांचे ‘अँटिलीया’. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात अँटिलीया पेक्षा देखील मोठे घर आहे. किंबहुना अँटिलियाच नाही तर इंग्लंडच्या बँकिंगहॅम पॅलेसपेक्षा देखील मोठे घर आहे तर? हो, भारतात सर्वात मोठे घर आहे, ज्याचे नाव आहे ‘लक्ष्मी पॅलेस’. भारतातील सर्वात मोठे घर आहे बडोद्यामधील ‘लक्ष्मी पॅलेस’. गुजरातमधील वडोदरा शहरात असलेला लक्ष्मी विलास पॅलेस हे केवळ भारतच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे. (Marathi News)
लक्ष्मी विलास पॅलेस हा बडोद्यामधला एक भव्य राजवाडा आहे. सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या या राजवाड्यात पंतप्रधान मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची २८ ऑक्टोबर २०२४ रोजी भेट घेतली आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती. या राजवाड्यात सुमारे १७० खोल्या, भव्य बागा, हॉल्स, आणि गोल्फ कोर्ससह अनेक आकर्षक जागा आहेत. आजही या महालात फक्त ५ लोक राहतात, आणि त्याची बाजारातील किंमत अंदाजे ३५० कोटी रुपये आहे. (Todays Marathi Headline)
लक्ष्मी विलास पॅलेस हे गायकवाड घराण्याचे आहे, जे १८व्या शतकापासून वडोदरा संस्थानावर राज्य करत होते. या राजवाड्यात ४ गायकवाड महाराजांचे राज्याभिषेक झाले आहेत. महाराजा समरजीत सिंह रणजीत सिंह गायकवाड यांचा शेवटचा राज्याभिषेक २०१२ मध्ये येथे झाला. पूर्वी हे राजवाडे लोकांसाठी बंद होते, पण आता महाराजा आणि महाराणी यांनी ते सामान्य जनतासाठी खुले केले आहे. (Latest Marathi News)
ब्रिटीश राजघराण्याचा राजवाडा, बकिंगहॅम पॅलेस, बद्दल सर्वांना माहिती आहेच. इंग्लंडमधील हा आलिशान राजवाडा ब्रिटिश राजघराण्याचे निवासस्थान आहे पण, भारतातील लक्ष्मी पॅलेस हा राजवाडा बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा राजवाडा आहे. हे जगातील इतके मोठे घर आहे, ज्यामध्ये चार बकिंघम पॅलेस सामावून शकतात. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानाचा मान या बडोद्याच्या ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ किंवा बडोदा पॅलेसला मिळाला आहे. हा राजवाडा गायकवाड राजघराण्याचे निवासस्थान आहे. (Top Marathi News)
ऐतिहासिक लक्ष्मी विलास राजवाडा माजी बडोदा राजघराण्याचे निवासस्थान आहे. हा राजवाडा सहा दशलक्ष रुपये खर्चून १९ व्या शतकात इंडो सारासेनिक शैलीत बांधण्यात आला आहे. या राजवाड्याला गुजरातचा सर्वात सुंदर आणि आकर्षक राजयुग राजवाडा म्हणून ओळखले जाते. राजवाड्याच्या आतील भागात शस्त्रसंग्रहालय, तसेच विविध कलाकृती आहेत; ज्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची छाप स्पष्टपणे दिसून येते. राजवाड्यात प्रसिद्ध कलाकार राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा संग्रह देखील पाहायला मिळतो. (Trending News)
लक्ष्मी विलास राजवाडा संगमरवरी, मोजेक टाइल्स आणि असंख्य कलाकृतींनी सजवलेला आहे. यात तळवे, कारंजे, गोल्फ कोर्स आणि सयाजीरावांचे वैयक्तिक संग्रहालय देखील आहे. या राजवाड्याच्या मैदानात नवलखी पायरी विहीर आहे. गुजरातमधील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी बांधलेली ही एक प्राचीन जलव्यवस्था असल्याचे सांगितले जाते. (Top Stories)
=========
Ganesh Chaturthi : गणपती म्हणून सुपारी का पूजतात?
=========
राजवाड्याच्या परिसरात बँक्वेट्स, मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेह सिंग संग्रहालय देखील आहे. मोतीबाग क्रिकेट मैदानात बडोदा क्रिकेट असोसिएशनची कार्यालये आणि टेनिस, बॅडमिंटनचे इंडोअर कोर्ट आहे. बडोद्यावर राज्य करणाऱ्या गायकवाड घराण्याने १९ व्या शतकात बांधलेल्या या राजवाड्याची रचना मुख्य वास्तुविशारद मेजर चार्ल्स मांट यांनी इंडो सारासेनिक रिव्हायव्हल शैलीमध्ये केली होती. रिपोर्टनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस राजवाडा ३,०४,९२,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेला असून, इंग्लंडचा बकिंगहॅम पॅलेस ८,२८,८२१ चौरस फूटमध्ये बांधला आहे. तर मुकेश अंबानीचे अँटिलीया, १५ हजार कोटी आणि जगातील सर्वात महागडे निवासस्थान म्हणून ओळखले जाते हे घर ४८,७८० चौरस फूटमध्ये पसरले आहे. (social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics