Home » हसण्यासाठी कायदा

हसण्यासाठी कायदा

by Team Gajawaja
0 comment
Laughter is the Best Medicine
Share

सकाळी बागेत फिरायला गेल्यावर एखादा तरी हास्यक्लब असतोच. ही मंडळी कुठल्याना कुठल्या कारणानं हसत असतात. जोरात टाळ्या वाजवात. हा असतो, हास्ययोगा. हसण्याच्या माध्यमातून आरोग्याला उत्तम ठेवण्यात येतं. त्यामुळेच नेहमी आनंदी रहा, प्रसन्न रहा असे सांगण्यात येते. आता तर चक्क या हसण्यावरच कायदा करण्याची वेळ आली आहे. जपानमध्ये चक्क निदान दिवसातून एकदा तरी हसावे यासाठी कायदा करण्याची वेळ आली आहे. येथील स्थानिक विद्यापीठात यासंदर्भात संशोधन करण्यात आले होते. यात हसण्यामुळे ह्दयरोगांला अटकाव राहू शकतो, असे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जपानमधील एका प्रांतात हसण्याचा कायदा लागू करण्यात आला आहे. यातून दिवसातून किमान एकदा तरी हसावे असा निकाल देण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे, जपानमधील विरोधी पक्षांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. यातून व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यांचे हनन होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Laughter is the Best Medicine)

गेल्या आठवड्यात जपानमधील एका प्रांतात लागू करण्यात आलेल्या कायद्यानं जगभर चर्चा सुरु झाली आहे. असा कायदा लागू करण्याची वेळ का आली, याचीच चर्चा अधिक होत आहे. कारण जपान देशाच्या एका प्रांतांत हसणे आवश्यक असल्याचे सांगून नागरिकांनी दिवसातून एकदा मनमोकळे हसावे असा निकाल देण्यात आला आहे. जपानच्या अनेक प्रांतात लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. यात विशेष करुन लहान मुलांचे प्रमाण कमी आहे. कुटुंबात फक्त वयोवृद्धांची संख्या येथे वाढत आहे. या सर्वांचा परिणाम जपानमधील जनतेच्या आरोग्यावर होत आहे. जपानी माणसांची वयोमर्यादा जास्त आहे, मात्र एकट्या रहाणा-या नागरिकांच्या आरोग्यावर आता अनेक परिणाम झालेले दिसून येत आहे. त्यामध्येच वयोवृद्धांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात येथील स्थानिक विद्यापीठांमध्ये संशोधनही करण्यात आले. त्यावरुन काढलेल्या अनुमानावर आता स्थानिक न्यायालयानं आपली मोहर उमटवली आहे. (Laughter is the Best Medicine)

जपानच्या यामागाता प्रांतातील प्रशासनाने हा हसण्याचा निकाल दिला आहे. दिवसातून एकदा तरी लोकांना हसावे असा कायदा प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात यामागाता विद्यापिठाचे संशोधन महत्त्वाचे आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, हसण्यामुळे हृदयाचे आजार कमी होतात आणि माणसाचे आयुर्मानही वाढते. याचाच दाखला न्यायालयानं देत थेट हसण्याचा कायदाच केला. या कायद्यांतर्गत हसण्यावर कोणतीही सक्ती नसून, या माध्यमातून नागरिकांना दिवसभर आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. विशेष म्हणजे, हा कायदा ज्या दिवशी झाला, त्या ८ जुलैला आता हास्य दिन साजरा होणार आहे. शहराच्या नागरिकांच्या शारीरिक आरोग्याबरोबर त्यांचे मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याची पुष्टी स्थानिक न्यायालयानं दिली आहे. यामागाता विद्यापीठाने जीवनात हसण्याचे महत्त्व किती आहे, हे सांगण्यासाठी २०१९ पासून संशोधन सुरु केले आहे. यात आढळून आले की, जे लोक आठवड्यातून किमान एकदा हसतात त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी असते.

संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात १५२ नागरिकांवर अभ्यास केला. १७ ते ४० च्या वयोगटातील या नागरिकांच्या सर्व सवयी आणि स्वभावही लक्षात घेण्यात आला. हा कायदा लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी सादर केला आणि पास केला. पण जपानमधील विरोधी पक्षही सत्ताधा-यांच्या चांगल्या निर्णयाला विरोध करतात. या कायद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली आहे. त्यांच्या मते, हा कायदा म्हणजे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे आहे. किंवा न हसणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे जो संविधानाने प्रदान केला आहे. असा कायदा आणल्यास व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र् संपुष्ठात येईल, अशीही भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने मात्र कायद्याचे समर्थन केले आहे. हा नियम पाळायचा की नाही हे प्रत्येक व्यक्तीने स्वतः ठरवायचे आहे. नव्या नियमात कोणालाही शिक्षा नाही, असेही स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Laughter is the Best Medicine)

====================

हे देखील वाचा : बॉस विकणे आहे…

====================

भारतीय योग शास्त्रातही या हास्य योगाचे महत्त्व सांगितले आहे. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हसण्यासारखे औषध नाही. त्यामुळे सकारात्मक विचारांमध्येही वाढ होते. पण त्यासाठी कायदा करण्याची वेळ आली तर तो समाज किती एकाकी अवस्थेकडे जात आहे, याचा अनुमान काढता येतो.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.