यश चोपडा याचा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा ‘लम्हे’ (Lamhe Movie) एक एक्सपेरिमेंटल सिनेमा होता. भले ही तो बॉक्स ऑफिसवर खास प्रतिक्रिया दिल्या नाहीत. परंतु समीक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले, नंतर तो एक कल्ट चित्रपट असल्याचे सिद्ध झाले. या सिनेमासाठी यश चोपडा यांना फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला तेव्हा श्री देवीला सुद्धा उत्तम अभिनेत्रीचा ही पुरस्कार मिळाला. बेस्ट कॉमेडियनसाठी अनुपम खेर यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. अनिल कपूरचे सुद्ध या सिनेमासाठी कौतुक केले गेले. पण तुम्हाला माहीत आहे का की या एका चित्रपटासाठी अनिल कपूरला खूप त्रास सहन करावा लागला होता.
यश चोपडा यांच्या या सिनेमात अनिल कपूर आणि श्री देवी यांच्या केमिस्ट्रिला फार पसंद केले होते. श्रीदेवीचे सौंदर्य आणि अभिनय पाहून लोक तिच्या प्रेमात पडले होते. आजही हा सिनेमा कोणीही विसरु शकला नसेल. या सिनेमाने ५ फिल्मफेअर आणि एक नॅशनल अवॉर्ड आपल्या नावावर केला होता. परंतु ज्यामुळे अनिल कपुरला नुकसान सहन करावे लागले होते त्यामागील कारण श्रीदेवी होती. परंतु त्यांनी असे मुद्दाम केले नव्हते. या सिनेमाच्या शुटिंसाठी अनिल कपूरला २० दिवसांपर्यंस कोणत्याही शूटिंगशिवाय लंडनमध्ये रहावे लागले होते.
दरम्यान, अनिल कपुरने या सिनेमाला तीन दशक पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने शुटिंग संबंधित जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या. या सिनेमाला झालेल्या नुकसानीबद्दल ही सांगितले होते. त्याने लिहिलेले होते की, मी या सिनेमासाठी आपल्या कमिटमेंटला पूर्ण करण्यासाठी खुप त्याग केला होता. या सिनेमा आपल्या काळात सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाबद्दल सांगताना अनिल कपुरने असे सुद्धा सांगितले की, या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान श्रीदेवी यांच्या वडिलांचे निधन झाले होते.त्यावेळी यश चोपडा यांनी त्यांना लंडनमध्येच थांबण्यास विनंती केली होती.(Lamhe Movie)
हेही वाचा: DEV D सिनेमामुळे अभय देओलला मिळाली प्रसिद्धी पण वर्षभर होता नशेत
याव्यतिरिक्त अनिल कपुरने असे ही म्हटले की, त्यावेळी त्यांना मुंबईत दोन सिनेमांच्या शुटिंगसाठी सुद्धा जायचे होते. एकतर त्यांच्या स्वत:च्या प्रोडक्शनचा सिनेमा रुप की रानी चोरो का राजा सुद्धाहोता. अशातच त्यांनी आपल्या सर्व तारखा रद्द केल्या होत्या. असे केल्याने त्यांना फार मोठे नुकसान झाले होते. कमिटमेंट पूर्ण करण्याच्या नादात फार नुकसान झाल्याचे ही अनिल यांनी सांगितले. खरंतर सिनेमाच्या बजेटमुळे एखाद्या हॉटेलमध्ये नव्हे तर एका मित्राच्या घरी थांबले होते. युनिटच्या अन्य लोक सुद्धा एकमेकांच्या नातेवाईकांकडे थांबले होते. अशाप्रकारे त्यांनी पैसे वाचवले. कारण श्रीदेवी या नसल्याने त्यांना शुटिंग थांबवावे लागले होते. पण जेव्हा श्रीदेवी पुन्हा आल्या तेव्हा शुटिंग पुन्हा सुरु करण्यात आली होती.