Home » Lal Bahadur Shastri : लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

Lal Bahadur Shastri : लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lal Bahadur Shastri
Share

आज, २ ऑक्टोबर रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. आजच्याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीही जयंती असते. २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील मुघलसराय प्रांतात शास्त्री यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ १६ व्या वर्षी त्यांनी आपले शिक्षण सोडून ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाले. गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनापासून ते १९४२ च्या असहकार चळवळीत शास्त्री यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यादरम्यान त्यांना अनेकदा अटकही झाली. मात्र शास्त्री यांनी कायमच आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला. जय जवान, जय किसान’ हा नारा देऊन शास्त्री यांनी जवानांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान मिळवून दिला. लाल बहादुर शास्त्रींवर गांधीवादाचा मोठा प्रभाव झाला होता. अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य जगलेल्या लाल बहादुर शास्त्रींच्या यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. (Lal Bahadur Shastri)

– लाल बहादूर शास्त्री यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. त्यांचे मूळ नाव हे लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होते. मात्र, १९२५ मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठातून ते जेव्हा संस्कृत शिकून बाहेर पडले तेव्हा त्यांना ‘शास्त्री’ या पदवीने गौरवण्यात आलं. पुढे त्यांनी शास्त्री हेच आडनाव वापरलं आणि तेच नाव प्रचलित झाले. (Marathi)

– शास्त्रींनी देशाच्या स्वातंत्र्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी आपले शिक्षण बंद केलं आणि गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत सुमारे सात वर्ष ते तुरुंगात राहिले. (Lal Bahadur shastri News)

– लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी यांना गुरु मानत. योगायोग असा की लालबहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म एकाच दिवशी झाला. त्यामुळे दोघांचीही जयंती एकाच दिवशी साजरी केली जाते. दोघांनीही आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले.

– १९४६ मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांची उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९५१ साली लाल बहादूर शास्त्री नवी दिल्लीत गेले. येथे त्यांनी रेल्वे, वाहतूक आणि दळणवळण, वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात अनेक पदे भूषवली.

Lal Bahadur Shastri

– केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशातील पहिल्या समितीची स्थापना केली होती. १९६४ मध्ये देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. देशाची अन्न आणि दुग्ध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी हरित क्रांती आणि श्वेतक्रांती यांना प्रोत्साहन दिले. (Latest Marathi Headline)

– १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, त्यांनी ‘जय जवान’ ‘जय किसान’चा नारा देशातील ‘अन्न टंचाई’ दरम्यान सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. त्यावेळी त्यांनी पगार घेणेही बंद केले होते. तसेच देशातील जनतेला दिवसातून एक वेळ उपवास करण्याचं आवाहन केलं होतं. Top Marathi Headline

– लालबहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घरखर्च भागवणे कठिण जात होते. त्यावेळी खासदारांना ५०० रुपये पगार होता आणि घरात भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी असायची. त्यावेळी घर खर्च भागावा म्हणून लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहित होते. त्यातून महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २ हजार रुपये मिळायचे. त्यातून शास्त्रींजीचा अतिरीक्त घरखर्च भागायचा. (Todays Marathi Headline)

– लाल बहादुर शास्त्रींचा विवाह 1928 साली ललिता शास्त्री यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुली आणि चार मुलं अशी सहा अपत्यं होती.

– शास्त्रींजीचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यासोबत घनिष्ठ संबध होते. वडिलांच्या अधिकार पदाचा वापर करुन त्याने काही कामे केल्याचा आरोप हरीवर लागला. हे सर्व लाल बहादुर शास्त्री यांच्या कानावर पडताच, पत्नीचा विरोध असूनही आपली तत्व जपण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यावरुन मुलाला हाकलून दिले होते. (Top Marathi News)

– एकदा लाल बहादूर शास्त्रीना तेव्हाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी त्यांच्या ‘पाकीजा’ च्या फिल्म सेटवर येण्याचे आमंत्रण दिले होते. ‘पाकीजा’ च्या अभिनेत्री मीना कुमारी या त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या. कमाल अमरोही यांनी शास्रींजींचे स्वागत केले आणि त्यांना मिना कुमारी यांच्यावर एक छोटेखानी भाषण देण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी देशात सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या मिना कुमारीबद्दल शास्त्रीजींना काहीचं माहिती नव्हते. त्यांनी हळूच कुलदीप नायर यांना या सदर अभिनेत्रीचे नाव काय आहे, हे विचारले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच, मला माफ करा मात्र मी आयुष्यात पहिल्यांदाचं, मिना कुमारी यांचे नाव ऐकले अशी थेट आणि जाहिर कबूलीही शास्त्रीजीनी दिली होती. (Latest Marathi News)

– ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे त्यांचा मृत्यू झाला. १० जानेवारी १९६६ ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे सांगण्यात आले. दिल्लीत लाल बहादूर शास्त्रींचे समाधीस्थळ असून ‘विजय घाट’ नावाने ते ओळखले जाते. (Top Trending News)

========

Dussehra : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते?

========

– गृहमंत्री, पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदावर काम केलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचा बँक बँलेन्स अगदी शुन्य होता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते कामराज यांनी कुलदीप नायर यांना फोन करुन शास्त्रींच्या पश्चात त्यांच्या कुंटुबियांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारणा केली. शास्त्रींजीनी आयुष्यभरात काहीच कमावले नसल्याचे ऐकुण त्यांना धक्काच बसला. कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारीत करुन शास्त्रींजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानाची पेंन्शन त्यांच्या पत्नीला लागू केली. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.