Home » लेडी गागा हिच्या कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्याला सुनावला २१ वर्षांचा तुरुंगवास

लेडी गागा हिच्या कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्याला सुनावला २१ वर्षांचा तुरुंगवास

by Team Gajawaja
0 comment
Lady Gaga's Dog
Share

प्रसिद्ध गायिका लेडी गागा हिच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षात लेडी गागा हिच्या कुत्र्यावर काही आरोपींनी कुत्र्यावर हल्ला केला होता. त्याचसोबत लेडी गागा हिच्या एका कुत्र्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे लेडी गागा हिला अत्यंत दु:ख झाले होते. अशातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला २१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. खरंतर हे प्रकरण २०२१ मधील आहे. आरोपीला आता शिक्षा मिळाली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याचसोबत या घटनेतील अन्य लिप्त आरोपींना सुद्धा शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Lady Gaga’s Dog)

आरोपी जेम्स हॉवर्ड जॅकसन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षात लेडी गागा हिचा French Bulldog याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. जेम्स हॉवर्ड जॅकसन असे आरोपीचे नाव असून त्याने तो गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास केला असता आरोपीला त्यांनी ताब्यात घेतले.

Lady Gaga's Dog
Lady Gaga’s Dog

खरंतर हॉलिवूड स्ट्रिटवर २०२१ मध्ये रायन फिशर नावाच्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. रायन हा लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना घेऊन फिरण्यासाठी गेला होता. या दरम्यान काही आरोपींनी त्यावर हल्ला केला. यावेळी दोन कुत्र्यांचे अपहरण करण्यात आले आणि एका कुत्र्यावर गोळीबार केला गेला.

हे देखील वाचा- खाकी: द बिहार चॅप्टर ही वेबसिरीज चर्चेत

घटनेनंतर दुखावली गेली होती लेडी गागा
लेडी गागा हिला कुत्रे फार आवडतात. परंतु या घटनेने ती आतमधून खचली गेली होती. ऐवढेच नव्हे तर गागाने आपल्या कुत्र्यांबद्दल जो कोणीही माहिती देईल त्याला ५०००,००० डॉलरचे बक्षीस ही ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करण्यास सुरुवात केली होती. (Lady Gaga’s Dog)

त्यानंतर हल्ल्याची पूर्ण माहिती कळली. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. त्याचसोबत कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला ही ताब्यात घेतले आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता तेथे कुत्र्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला २१ वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे. त्याचसोबत अन्य आरोपींना ही शिक्षा सुनावली गेली आहे.

पोलिसांनी काय म्हटले?
एलएच्या पोलिसांच्या मते, त्यांना असे वाटत नाही की, मालकांच्या कारणास्तव त्यांनी कुत्र्यांना टार्गेट केले. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, मार्केटमध्ये या कुत्र्यांची किंमत खुप अधिक आहे. असे असू शकते की, त्यांचे अपहरण करुन ते ब्लॅक मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी हल्ला केला गेला असावा. लेडी गागा व्यतिरिक्त रीस विदरस्पून, लियोनार्डो डिकॅपरियो आणि मॅडोना सारख्या सेलिब्रेटीजकडे सुद्धा फ्रेंच बुलडॉग आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.