Home » अलिगढचे लड्डूगोपाल

अलिगढचे लड्डूगोपाल

by Team Gajawaja
0 comment
Laddu Gopal of Aligarh
Share

उत्तर प्रदेश राज्यातील अलिगढ हे शहर प्रसिद्ध आहे. अलिगड हे उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्रही मानले जाते. अलिगढ मध्ये पारंपारिक पद्धतीनं कुलूप बनवण्यात येतात. धातुंचा वापर करुन बनवण्यात येणारी ही अलिगडची कुलूपं जगभर निर्यात केली जातात. इंग्रजांनी हा व्यवसाय अलिगढमध्ये आणल्याचे सांगितले जाते. आता त्यात पितळेच्या वस्तुंचीही भर झाली आहे. शिल्पकलेसाठी सुद्धा हे शहर ओळखलं जातं. अलिगढमध्ये अनेक पितळ, कांस्य, लोखंड, आणि ॲल्युमिनियमवर आधारीत उद्योग आहेत. पण यासर्वांसोबत सध्या अलिगढच्या गल्लीबोळात एक उद्योग मोठ्या प्रमाणात बहरला आहे, तो म्हणजे धातूंच्या मुर्ती करण्याचा उद्योग. त्यातही अलिगढमध्ये तयार होणा-या भगवान श्रीकृष्णांच्या मुर्तीला मोठी मागणी आली आहे. अलिगढमध्ये तयार होणारी भगवान श्रीकृष्णाची बालवयातील मुर्ती सर्वात लोकप्रिय आहे. या अलिगढच्या लड्डू गोपाळांच्या मुर्तीला परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता जन्माष्ठमी जवळ येत असतांना या लड्डू गोपाळाच्या मुर्तीला मोठी मागणी येऊ लागली आहे. (Laddu Gopal of Aligarh)

उत्तर प्रदेशमधील अलिगढ हे शहर कुलूप आणि मुर्तींसाठी जगभरात ओळखले जाते. पण, कुलुपांच्या व्यवसायासोबतच अलिगढमध्ये तांबे, पितळ आणि मिश्र धातूंपासून बनवलेल्या मूर्तीही मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात. परदेशात या मुर्ती सर्वाधिक निर्यात होतात. आता याच अलिगढमध्ये जन्माष्टमीसाठी लड्डू गोपाळांच्या मुर्ती तयार करण्यात येत आहेत. अलिगढच्या गल्लीबोळात या मुर्ती करण्याचे कारखाने आहेत. सध्या या सर्वच कारखान्यात श्रीकृष्णाच्या बालरुपातील मुर्ती बनवण्यात येत आहेत. आता अलिगढमध्ये लड्डू गोपाळांच्या मुर्तींची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली आहे. यावर्षा जवळपास १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ऑर्डर नोंदवण्यात आल्या आहेत. (Laddu Gopal of Aligarh)

अलिगढमधील लड्डू गोपाळाची मुर्ती ही खास असल्याचे सांगितले जाते. ही मुर्ती संपूर्ण भारतात फक्त अलिगढ मध्येच तयार केली जाते. त्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांव्यतिरिक्त कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीयांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अलिगढच्या लड्डू गोपाळांच्या मुर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय मथुरा आणि वृंदावनमध्येही याच लड्डू गोपाळांच्या मुर्तीला मोठी मागणी आहे. अलिगढमधून वर्षभरात ५०० ते १,००० कोटी रुपयांचा फक्त मुर्तींचा व्यवसाय होतो. सर्वात लहान असलेल्या लड्डू गोपाळांची मुर्ती ३०० रुपयांची असते. त्यापासून ते लाखापर्यंत किंमतीच्या या मुर्ती आहेत. यासोबतच या लड्डू गोपाळाच्या मुर्तीची सजावट करण्याचेही कारखाने या भागात मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. काही ठिकाणी घरगुती व्यवसायही बहरले आहेत. या मुर्तींसाठी पोशाख आणि त्यांच्या अंगावरची कलाकुसर करण्यासाठी या भागातील महिला कलाकारांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे घराघरात लड्डू गोपाळांचे कपडे आणि दागिने तयार करण्याचे व्यवसाय सुरु झाले आहेत. या सर्वांनाही देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. (Laddu Gopal of Aligarh)

यातच जन्माष्टमीला तर अलिगढमध्ये लड्डू गोपाळांची मुर्ती तयार करणारे कारखाने दिवसरात्र चालत असल्याचे चित्र आहे. यावेळी येथील कलाकारांना अपेक्षेपेक्षा जास्त मागणी आल्यानं आनंदी वातावरण आहे. सोबतच लड्डू गोपाळांसाठी वेगवेगळे दागिने आणि सजावटीच्या वस्तूंचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या हातांना काम मिळाले आहे. या व्यवसायातून साधारण ५,००० कुटुंबांना कायमस्वरुपी असा रोगजार उपलब्ध झाला आहे. तसेच अन्यही कुटुंब या व्यवसायात येण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेत आहेत. या व्यवसायातील भरभराट पहाता, पुढच्या काही वर्षात अलिगडचा मुर्ती व्यवसाय देशातील अव्वल व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

====================

हे देखील वाचा : श्रावणी शनिवारची माहिती आणि पूजा विधी

===================

जन्माष्टमीपर्यंत येथील सर्व मुर्ती बनवण्याच्या कारखान्यात भगवान श्रीकृष्णाच्या मुर्ती तयार होतात. मात्र नंतर अन्य देव-देवतांच्या मुर्तीही मोठ्या प्रमाणात तयार होतात. तसेच घरसजावटीसाठी लागणा-या धातुच्या वस्तुही अलिढगमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. या वस्तूंना इंग्लड, अमेरिका येथून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या अलिगडच्या कारखान्यात ब्रास इंगॉट, ब्रास मेल्टिंग स्क्रॅप, ब्रास सीट स्क्रॅप, ब्रँडेड फ्रेश सीट, तांबे, ॲल्युमिनियम, पितळ यांच्या मुर्ती तयार केल्या जातात. या वाढत्या उद्योगामुळे येथे कुशल कामगारांची मागणीही वाढली आहे. (Laddu Gopal of Aligarh)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.